Samsung Galaxy M01 च्या लॉन्च नंतर या सीरीजचे दोन इतर स्मार्टफोन्स पण काही दिवसांपूर्वी समोर आले आहेत. या स्मार्टफोन्सची नावे Samsung Galaxy M01s आणि Samsung Galaxy M01 Core सांगण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी या दोन्ही मोबाइल्स संबंधित अनेक लीक्स पण समोर आले आहेत ज्यात दोन्ही फोन्सच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. तसेच आज पुन्हा सॅमसंग गॅलेक्सी एम01एस च्या बॅटरीचा पण खुलासा झाला आहे. बातमी अशी मिळाली आहे कि Samsung Galaxy M01s स्मार्टफोन 4,000एमएएच बॅटरी सह लॉन्च होईल.
Samsung Galaxy M01s बॅटरी सेफ्टी सर्टिफिकेशन्स वेबसाइट TÜV Rheinland वर दिसला आहे. इथे फोन SM-M017F/DS मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. वेबसाइट वर खुलासा झाला आहे कि गॅलेक्सी एम01एस 4,000एमएएच बॅटरी सह लॉन्च केला जाईल. लिस्टिंग मध्ये बॅटरी सोबतच 5V 1.55A चार्जरची माहिती पण मिळाली आहे. लिस्टिंग वरून असे पण स्पष्ट झाले आहे कि Galaxy M01s सह फास्ट चार्जर दिला जाणार नाही.
सॅमसंग गॅलेक्सी एम01एस च्या अन्य लीक्स मध्ये माहिती मिळाली आहे कि हा फोन 32 जीबी इंटरनल स्टोरेज सह बाजारात येईल. रिपोर्टनुसार Galaxy M01s क्वॉलकॉमच्या चिपसेट वर लॉन्च केला जाईल. सॅमसंग गॅलेक्सी एम01एस दोन कलर वेरिएंट्स मध्ये लॉन्च होणार असल्याचे समोर आले आहे ज्यात ब्लू कलर आणि ग्रे कलरचा समावेश असेल. लीक मध्ये दावा केला गेला आहे कि हा फोन $120 मध्ये लॉन्च होईल म्हणजे या फोनची किंमत पण 9,000 रुपयांच्या आसपास असेल.
Samsung Galaxy M01
Samsung Galaxy M01 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 5.7 इंचाच्या एचडी+ इनफिनिटी-वी डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन एंडरॉयड 10 ओएस वर लॉन्च केला आहे जो वनयूआई वर चालतो. त्याचप्रमाणे प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 1.95गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट देण्यात आला आहे.
फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे झाले तर Samsung Galaxy M01 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.2 अपर्चर असलेली 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे ज्या सोबत फोन मध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी सॅमसंग गॅलेक्सी एम01 एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
Samsung Galaxy M01 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी हा फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एम01 मध्ये 4,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंगने आपला फोन डॉल्बी एटमॉस टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे. त्याचबरोबर सॅमसंग हेल्थ ऍप पण फोन मध्ये प्री-इंस्टाल्ड आहे.
सॅमसंगने गॅलेक्सी एम01 3 जीबी रॅम लॉन्च केला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येते. भारतात हा फोन ब्लॅक, ब्लू आणि रेड कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे तसेच Samsung Galaxy M01 आज पासून फक्त 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.