एक्सक्लूसिव: खूपच स्वस्त असतील सॅमसंग गॅलेक्सी एम10 आणि गॅलेक्सी एम20, बेस किंमत असेल 10,000 रुपयांपेक्षा पण कमी

सॅमसंगच्या नवीन एम सीरीजच्या फोन बद्दल खूप चर्चा सुरु आहे. अशी बातमी आहे की कंपनी आपल्या गॅलेक्सी जे सीरीज आणि गॅलेक्सी ए सीरीज च्या जागी नवीन एम सीरीजचे फोन सादर करणार आहे. याअंतर्गत सर्वात आधी गॅलेक्सी एम10 आणि गॅलेक्सी एम20 सादर करणार आहे. जरी कंपनी ने याबाबतीत काही सांगितले नसले तरी 91मोबाईल्स बरीच एक्सक्लूसिव माहिती दिली आहे. नुकतेच आम्ही सांगितले होते की हा फोन सॅमसंगच्या नोएडा मधील फॅक्ट्री मध्ये मास प्रोडक्शनसाठी गेला आहे. त्यानांतर फोनचा स्क्रीन पॅनल पण आम्ही लीक केला होता. आता सॅमसंगच्या या फोन्सची किंमत पण आमच्यकडे आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम20 ची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी असेल तर गॅलेक्सी एम10 कंपनी 10,000 रुपयांपेक्षा कमी बजेट मध्ये लॉन्च करणार आहे. हि माहिती आम्हाला अशा सोर्स कडून मिळाली आहे जो कंपनीशी अनेक वर्षांपासून जोडला गेलेला आहे. त्यांचे म्हणणे आहे की ‘सॅमसंगच्या प्रोडक्ट बद्दल लोकांना कोणतीही तक्रार नाही पण ते ओवर प्राइस असल्याचे नेहमीच म्हटले जाते. त्यामुळे कंपनी आता नवीन एम सीरीज मध्ये नवीन प्राइस रेंज ने हि कमतरता दूर करणार आहे आणि याची सुरवात एम20 आणि एम10 पासून होणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम10 ची प्राइस 10 हजारांपेक्षा कमी आणि गॅलेक्सी एम20 ची प्राइस 15 हजार रुपये असेल यापेक्षा जास्त कंपनी किंमत ठेवणार नाही.’

काही दिवसांपूर्वी आम्ही एका बातमीतून माहिती दिली होती की सॅमसंग आपल्या आॅनलाइन आणि आॅफलाइन साठी नवीन योजना बनवणार आहे आणि अनेक नवीन इनोवेशन घेऊन येईल. नॉच स्क्रीन असेलेले फोन आणि अग्रेसिव प्राइसिंग त्यापैकीच एक आहे. जरी सॅमसंगने आपल्या फोनला नॉचचे नाव दिले नाही पण कंपनी ने याला इनफिनिटी नावाने पेटेंट केले आहे. म्हणजे सॅमसंगच्या गॅलेक्सी एम सीरीज मध्ये नॉच असलेली इनफिनिटी स्क्रीन दिसेल.

आतापर्यंत जी माहिती मिळाली आहे त्यानुसार सॅमसंग गॅलेक्सी एम20 मध्ये तुम्हाला वाटर ड्रॉप नॉच मिळेल. गॅलेक्सी एम10 मध्ये पण असेच काहीसे असेल. जरी फोनच्या स्पेसिफिकेशन आणि फीचर्सची जास्त माहिती मिळाली नसली तरी गीकबेंच वर काही मॉडल लिस्ट झाले होते त्यांमध्ये प्रोसेसर आणि रॅम ची माहिती मिळाली होती.गीकबेंच वर सॅमसंग गॅलेक्सी एम20 मॉडेल नंबर एसएम-एम205एफ सह लिस्ट करण्यात आला आहे. हा फोन सॅमसंगच्या एक्सनोस 7885 वर आधारित आहे आणि यात 1.5गीगाहट्र्ज प्रोसेसर क्लॉक स्पीड देण्यात आला आहे. इतर स्पेसिफिकेशन पाहता लिस्ट केलेल्या फोन मध्ये 3जीबी रॅम देण्यात आला आहे.

तसेच गॅलेक्सी एम10 बद्दल बोलायचे तर आता पर्यंत मिळालेल्या माहिती नुसार या फोन मध्ये पण तुम्हाला 3जीबी रॅम मिळेल. पण हा फोन एक्सनोस 7870 चिपसेट वर आधारित असेल. या फोन्सच्या लॉन्च बद्दल बोलायचे तर आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कंपनी हे नवीन वर्षाच्या सुरवातीला सादर करू शकते आणि कदाचित याची सुरवात भारतापासून होईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here