साउथ कोरियाची इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंग भारतात लवकरच आपल्या एम सीरीज मध्ये नवीन स्मार्टफोन्स सादर करण्याची योजना करत आहे. कंपनी या बहुप्रतीक्षित नव्या सीरीज मध्ये गॅलेक्सी एम10, गॅलेक्सी एम20 आणि गॅलेक्सी एम30 स्मार्टफोन लॉन्च करेल. बऱ्याच दिवसांपासून या सीरीज मधील डिवाइसची माहिती समोर येत आहे. आता कंपनीच्या ऑफिशियल इंडिया वेबसाइट वर सॅमसंग गॅलेक्सी एम10 चा सपोर्ट पेज लाइव झाला आहे.
हा सपोर्ट पेज सर्वात आधी ड्रॉइड शाउट ने स्पॉट केला होता. या सपोर्ट पेज वरून डिवाइस बद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. पण या पेज वरून एक बाब स्पष्ट झाली आहे कि कंपनी सॅमसंग गॅलेक्सी एम10 लवकरच सादर करणार आहे.
या किमतीती लॉन्च होऊ शकतो सॅमसंग गॅलेक्सी एम10
सॅमसंग गॅलेक्सी एम10 बद्दल बोलले जात आहे कि कंपनी हा स्मार्टफोन 10,000 रुपयांच्या आत सादर करू शकते. मेक इन इंडिया प्रोग्राम अंतर्गत हा डिवाइस बनवला जात असल्यामुळे याची किंमत कमी असू शकते. अजूनतरी डिवाइसच्या ऑफिशियल लॉन्च बद्दल माहिती मिळाली नाही.
सॅमसंग गॅलेक्सी एम10 गीकबेंच वर 3जीबी रॅम सह लिस्ट केला गेला आहे. आधी समोर आलेली माहितीनुसार हा फोन 16जीबी तसेच 32जीबी मेमरीच्या दोन वेरिएंट मध्ये बाबाजारात आणला जाईल. गीकबेंच नुसार हा फोन 1.59गीगाहट्र्ज ऑक्टा-कोर प्रोसेसर सह एक्सनोस 7870 चिपसेट वर सादर केला जाईल. गॅलेक्सी एम10 वाईफाई अलाइंस वर एसएम-एम105एफ मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. लिस्टिंग अनुसार कंपनी ने हा 2.5गीगाहट्र्ज वाईफाई कनेक्टिविटी साठी चेक केला आहे.
आईएएनएस ने आपल्या रिपोर्ट मध्ये दावा केला होता कि जानेवारीत सॅमसंग कंपनी भारतात आपली गॅलेक्सी एम सीरीज लॉन्च करेल. सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीज बाजारात आणेल आणि गॅलेक्सी जे सीरीज तसेच गॅलेक्सी ऑन सीरीज कंपनी बंद करेल. 91मोबाईल्स पण सर्वात आधी गॅलेक्सी एम सीरीजच्या एक्सक्लूसिव बातम्या देत आहे.
गॅलेक्सी एम20 बद्दल आम्ही आधीच सांगितले आहे कि गॅलेक्सी एम20 स्मार्टफोन मध्ये डुअल कॅमेरा, नॉच डिस्प्ले, 3.5एमएम जॅक आणि यूएसबी टाइप-सी सपोर्ट मिळेल. तसेच या फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर तसेच 5,000 एमएएच ची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते.















