Samsung Galaxy M11 आणि Galaxy A11 एंडरॉयड 10 सह Wi-Fi Alliance वर दिसले, लवकरच होऊ शकतात लॉन्च

Samsung ने नुकताच आपल्या फ्लॅगशिप Note सीरीजचा लाइट वर्जन नोट 10 लाइट भारतात लॉन्च केला आहे. तर आता माहिती समोर आली आहे कि कंपनी आपल्या दोन बजेट स्मार्टफोन Samsung Galaxy A11 आणि Samsung Galaxy M11 वर काम करत आहे, ज्यांना Wi-Fi सर्टिफिकेशन मिळाले आहे. Samsung Galaxy A11 आणि Galaxy M11 स्मार्टफोन बद्दल अफवा आहे कि डिवाइसचे मोठे वेरिएंट 128GB स्टोरेज सह येतील.

हे दोन्ही फोन यावर्षी फेब्रुवारी मध्ये लॉन्च होणार असल्याची अफवा काही दिवसांपूर्वी समोर आली होती. Wi-Fi Alliance सर्टिफिकेशन बद्दल बोलायचे तर यात समोर आले आहे कि Samsung Galaxy A11 आणि Samsung Galaxy M11 स्मार्टफोन एंडरॉयड 10 सह सादर केले जातील. OS बद्दल माहिती आहे कि कंपनी यात आपला इन-हाउस वन यूआई 2.0 देईल. तसेच दोन्ही डिवाइस मध्ये 2.4GHz फ्रिक्यूएंसी बॅंड असेल.

याव्यतिरिक्त सर्टिफिकेशन मध्ये अजून काही समोर आले नाही. बोलले जात आहे कि सॅमसंग गॅलेक्सी ए11 आणि गॅलेक्सी एम11 लवकरच मार्केट मध्ये सादर केले जाऊ शकतात. काही दिवसांपूर्वी एक रिपोर्ट समोर आला होता त्यानुसार Galaxy M11 आणि Galaxy M31 डेवलपमेंटच्या सुरवातीच्या स्टेज मध्ये आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी समोर आले होते कि Galaxy M11 चा 32 जीबी तर Galaxy M31 चा 64 जीबी स्टोरेज वेरिएंट सादर केला जाईल.

याव्यतिरिक्त रिपोर्ट समोर आला होता कि Samsung आपल्या Galaxy M20 आणि Galaxy M40 चे अपग्रेड वर्जन Galaxy M21 आणि Galaxy M41 स्मार्टफोन पण लॉन्च करण्याची तयारी करत आहे. यातील गॅलेक्सी एम21 मध्ये एक्सीनॉस 9609 प्रोसेसर सह 4 जीबी रॅम आणि फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप असेल. तसेच यात 24 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर असेल आणि सोबत 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर असेल.

गॅलेक्सी एम31 बद्दल समोर आले आहे कि हँडसेट मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 प्रोसेसर आणि 6 जीबी रॅम वेरिएंट सह येईल. फोटोग्राफी बद्दल बोलायचे तर Galaxy M31 च्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल. यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर, 12 मेगापिक्सलचा वाइड-अँगल कॅमेरा सेंसर आणि 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर दिला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here