शाओमी ने ट्वीट केला मी ए2 स्मार्टफोन चा फोटो, बघा कसा असेल हा स्वस्त आणि पावरफुल स्मार्टफोन

शाओमी च्या आगामी स्मार्टफोन मी ए2 बद्दल अनेक दिवसांपासून लीक्स येत आहेत. काही लीक्स मध्ये सांगण्यात आले आहे की कंपनी मी ए2 सोबत मी ए2 लाइट पण सादर करेल तर काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये 24 जुलै ला मी ए2 च्या ग्लोबल लॉन्च बद्दल सांगण्यात आले आहे. शाओमी ने आता पर्यंत मी ए2 स्मार्टफोन बद्दल कोणतीही माहिती दिली नव्हती पण आज कंपनी ने मी ए2 बद्दल आॅफिशियल बातमी शेयर केली आहे. शाओमी ने आपल्या ट्वीटर हँडल वरून मी ए2 च्या लॉन्च सोबतच फोन चा फोटो पण शेयर केला आहे.

शाओमी ने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडल वरून मी ए2 स्मार्टफोन चा फोटो शेयर करत याच्या लॉन्च ची माहिती दिली आहे. कंपनी ने फोन ची लॉन्च डेट सांगितली नाही पण आपल्या ट्वीट मध्ये 2 इज बेटर दॅन 1 हॅशटॅग सह ‘द नेक्स्ट जेनेरेशन इज कमिंग’ लिहिले आहे. या ट्वीट मध्ये फोन ची फ्रंट आणि साईड पॅनल दिसत आहे त्याचबरोबर फोन मध्ये एंडरॉयड वन असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शाओमी मी ए2 बद्दल आलेल्या लीक्स नुसार हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 5.99-इंचाच्या डिस्प्ले सह सादर केला जाईल जो 2160 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन ला सपोर्ट करेल.  या फोन मध्ये 4जीबी व 6जीबी रॅम सह 32जीबी, 64जीबी आणि 128जीबी ची इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते तसेच एंडरॉयड वन एडिशन सह फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट मिळू शकतो. फोन मध्ये 20-मेगापिक्सल आणि 12-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा व 20-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. तर पावर बॅकअप साठी यात 3,000एमएएच ची बॅटरी मिळू शकते.

शाओमी मी ए2 लाइट 5.84-इंचाच्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करू शकते. चर्चा अशी आहे की फोन च्या बॅक पॅनल वर 12-मेगापिक्सल तर फ्रंट पॅनल वर 5-मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. या फोन मध्ये प्रोसेसिंग साठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट आणि पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी मिळू शकते.

बोलले जात आहे की येत्या 24 जुलै ला शाओमी स्पेन मधील मॅड्रिड मध्ये एका ईवेंट चे आयोजन करून कंपनी चा नवीन स्मार्टफोन लॉन्च करू शकते. पण मी ए2 आणि मी ए2 लाइट च्या ठोस स्पेसिफिकेशन्स आणि लॉन्च डेट साठी सध्या शाओमी च्या पुढील घोषणेची वाट बघितली जात आहे. आशा आहे की येत्या काही आठवड्यांमध्ये कंपनी मी ए2 स्मार्टफोन वेरिएंट्स च्या भारत लॉन्च ची पण घोषणा करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here