Samsung बाबत गेल्या महिन्यात 91मोबाईल्सने आपल्या एक्सक्लूसिव बातमीमध्ये सांगितले होते कि हि कोरियन कंपनी ‘गॅलेक्सी एम’ सीरीजच्या दोन नवीन स्मार्टफोन्स वर काम करत आहे जे Samsung Galaxy M31s आणि Samsung Galaxy M51 नावाने भारतात लॉन्च केले जातील. दोन दिवसांपूर्वी यातील एक गॅलेक्सी एम51 बेंचमार्किंग साइट वर दिसला होता, जिथे फोनच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला होता. तर आज दुसरा फोन गॅलेक्सी एम31एस च्या गीकबेंच वर लिस्ट झाला आहे.
Samsung Galaxy M31s चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर लिस्ट केला गेला आहे. गीकबेंचची हि लिस्टिंग आज म्हणजे 12 जूनची आहे ज्यात गॅलेक्सी एम31एस SM-M317F मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. एमएसपी वेबसाइटने हि बेंचमार्क लिस्टिंग बघितली आहे जिथे लॉन्चच्या आधी Galaxy M31s च्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे.
Samsung Galaxy M31s
सॅमसंग गॅलेक्सी एम31एस बेंचमार्किंग साइट वर एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 सह दाखवण्यात आला आहे. लिस्टिंग मध्ये समजले आहे कि हा फोन 1.74गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह सॅमसंगच्या एक्सनॉस 9611 चिपसेट वर चालेले. गीकबेंच वर Galaxy M31s 6 जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एम31एस एकापेक्षा जास्त वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल हि गोष्ट नाकारता येत नाही. बेंचमार्किंग स्कोर बद्दल बोलायचे तर Samsung Galaxy M31s ला सिंगल-कोर मध्ये 347 स्कोर देण्यात आला आहे तर मल्टी-कोर मध्ये या फोनला 1256 स्कोर मिळाला आहे. गीकबेंच वर फोनची वरील माहिती मिळाली आहे तसेच इतर स्पेसिफिकेशन्स समोर येण्याची वाट बघितली जात आहे.
लक्षात असू दे कि 91मोबाईल्सने सर्वात आधी हि बातमी दिली होती कि सॅमसंग लवकरच Samsung Galaxy M31s आणि Galaxy M51 स्मार्टफोन लॉन्च करण्याची योजना बनवत आहे. हे दोन्ही फोन भारतीय बाजाराच्या माध्यमातून टेक मार्केट मध्ये पदार्पण करतील. मिळालेल्या माहितीनुसार Samsung Galaxy M31s येत्या काही दिवसांत देशात लॉन्च केला जाऊ शकतो आणि लॉन्च नंतर लगेचच हा डिवाईस विक्रीसाठी उपलब्ध होईल.
Samsung Galaxy M51 बाबत बातमी आली आहे कि कंपनी हा डिवाईस जूनच्या शेवटी लॉन्च करेल आणि हा फोन जुलैच्या सुरवातीला भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल. कोरोना वायरसमुळे या दोन्ही स्थितीवर शिकामोर्तब करता येणार नाही. स्टॉक व प्रोडक्शननुसार लॉन्च आणि विक्रीच्या तारखा थोड्या बदलू शकतात. सॅमसंग गॅलेक्सी एम31एस आणि गॅलेक्सी एम51 दोन्ही फोन 64 मेगापिक्सलच्या क्वॉड कॅमेऱ्याला सपोर्ट करतील.
















