Samsung Galaxy M55s फोनचे भारतीय लाँच आले जवळ, बीआयएस साईटवर झाला लिस्ट

सॅमसंगने काही महिन्यापूर्वी आपला गॅलेक्सी एम 55 स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केला होता. तसेच, आता आणि पण स्वस्त लो व्हेरिएंट Samsung Galaxy M55s लवकर भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. या डिव्हाईसला भारताच्या ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (BIS) वेबसाईटवर स्पॉट करण्यात आले आहे. ज्यामुळे हा भारतात येणार असल्याची बातमी जोर धरत आहे. चला, पुढे लेटेस्ट लिस्टिंग माहितीला सविस्तर जाणून घेऊया.

Samsung Galaxy M55s बीआयएस लिस्टिंग

  • सॅमसंग गॅलेक्सी एम 55 एस BIS सर्टिफिकेशन साईटवर मॉडेल नंबर SM-M558B/DS सह दिसला आहे. जो गीकबेंच आणि वाय-फाय अलायंस सर्टिफिकेशनशी मिळतो.
  • BIS लिस्टिंगवरून आगामी सॅमसंग स्मार्टफो बाबत कोणतीही माहिती मिळाली नाही, परंतु हा या गोष्टीचा संकेत आहे की फोन लवकरच भारतात लाँच होऊ शकतो.

Samsung Galaxy M55s चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

  • गीकबेंच लिस्टिंगनुसार सॅमसंग गॅलेक्सी एम 55 एस मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 चिपसेट लावली जाऊ शकते. यात ग्राफिक्ससाठी एड्रेनो 644 GPU मिळू शकतो.
  • स्टोरेजच्या बाबतीत डिव्हाईसमध्ये जवळपास 8GB रॅम दिली जाऊ शकते.
  • हा अँड्रॉईड 14 वर काम करू शकतो. तसेच फोनमध्ये 2.4GHz आणि 5GHz वाय-फाय बँडला सपोर्ट मिळू शकतो.
  • गीकबेंच लिस्टिंगमध्ये डिव्हाईसने सिंगल-कोर मध्ये 1003 अंक आणि मल्टी-कोर टेस्टमध्ये 2309 अंक मिळवले आहेत. म्हणजे हा चांगला परफॉरमेंस देऊ शकतो.

Samsung Galaxy M55 5G चे स्पेसिफिकेशन

सॅमसंग गॅलेक्सी एम 55 एस पूर्व मध्ये आलेल्या गॅलेक्सी एम 55 5जी चा लो व्हर्जन असू शकतो. याची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

  • डिस्प्ले: सॅमसंग गॅलेक्सी एम 55 5 जी मध्ये 6.7 इंचाचा FHD+ सुपर अ‍ॅमोलेड प्लस डिस्प्ले आहे. यात 120Hz रिफ्रेश रेट, 1000 निट्स पीक ब्राईटनेस आणि व्हिजन बूस्टर टेक्नॉलॉजी मिळते.
  • चिपसेट: स्मार्टफोनमध्ये परफॉरमेंससाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 प्रोसेसर आहे.
  • स्टोरेज आणि रॅम: Samsung Galaxy M55 5G स्टोरेजच्या बाबतीत 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.
  • कॅमेरा: फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा-वाईड कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर आहे. तसेच, सेल्फीसाठी 50MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
  • बॅटरी: हा स्मार्टफोन 5000mAh बॅटरी आणि 45W फास्ट चार्जिंगसह येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here