रिलायंस जियो ने नुकताच आपला रिपोर्ट शेयर केला होता ज्यात कंपनी ने सांगितले होते की जियो ने फक्त 25 महिन्यात 25,00,00,000 यूजर जोडले आहेत. एवढ्या वेगाने हा प्रगती करत जियो इंडियन टेलीकॉम बाजारात नवीन रेकॉर्ड केला आहे. हा पराक्रमाचे श्रेय जियो ने आपल्या यूजर्सना दिले आहे. तर आता दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना भेट देत जियो ने ‘रिचार्ज करा या दिवाळीला आणि फायदा मिळवा वर्षभर’ नावाची अनोखी आॅफर सादर केली आहे. या आॅफर मध्ये वर्षभरासाठी डेटा बेनिफिट आणि अनलिमिटेड कॉलिंग सोबतच रिचार्ज वर 100 टक्के कॅशबॅक देण्यात येत आहे.
रिलायंस जियोचा स्पेशल प्लान पाहता कंपनी ने दिवाळीच्या निमित्ताने 1699 रुपयांचा नवीन प्लान सादर केला आहे. हा प्लान 365 दिन म्हणजे एका वर्षाच्या वैधतेसह येतो. या प्लान मध्ये एक वर्ष मोफत कॉलिंग करता येईल. जियो ग्राहक लोकल व एसटीडी आॅननेटवर्क तसेच आॅफनेटवर्क नंबर्स वर अनलिमिटेड वॉयस कॉल करू शकतील. हे वॉयस कॉल रोमिंग मध्ये पण फ्री असतील.
जियोच्या या दिवाळी धमाका मध्ये मिळणारा इंटरनेट डेटा पाहता 1699 रुपयांच्या प्लान मध्ये कंपनी आपल्या यूजर्सना रोज 1.5जीबी 4जी इंटरनेट डेटा देईल. या हिशोबाने यूजर्सना वर्षभरात एकूण 547जीबी 4जी डेटा मिळेल. सोबतच जियो ग्राहकांना रोज 100एसएमएस पण मिळतील आणि कंपनी कडून माय जियो अॅप चे मोफत सब्सक्रिप्शन मिळेल.
या सर्व बेनिफिट सोबतच कंपनी 100 टक्के कॅशबॅक पण या प्लान वर देत आहे. हा कॅशबॅक वाउचर स्वरुपात ग्राहकांना मिळेल. 1699 रुपयांच्या प्लान ने रिचार्ज केल्यास 500 रुपयांचे 2 वाउचर तर एक 200 रुपयांचा वाउचर मिळेल. या वाउचर्सचा वापर माय जियो अॅप सोबतच रिलायंस डिजीटल स्टोर्स वर पण करता येईल. ज्यातून फोन रिचार्ज सोबतच आॅनलाईन खरेदी पण करता येईल.
रिलायंस जियो कडून मिळणारे हे वाउचर 31 डिसेंबर पर्यंत वापरावे लागतील. पण जियोच्या या शानदार दिवाळी आॅफरचा लाभ घेण्यासाठी 30 नोव्हेंबरच्या आधी रिचार्ज करावा लागेल.