Samsung Galaxy Note 10 चे कॅमेरा ​डिटेल आले समोर, आगळीवेगळी असेल कॅमेरा प्लेसमेंट

Samsung ची गॅलेक्सी एस10 सीरीज टेक मार्केट मध्ये हिट झाली आहे. या सीरीज मध्ये Galaxy S10, Galaxy S10 Plus आणि Galaxy S10+ 5G सारखे मॉडेल आले आहेत जे भारता समवेत ग्लोबल बाजारात पण लोकांना खूप आवडला आहे. गॅलेक्सी एस10 सीरीजच्या यशानंतर Samsung गॅलेक्सी नोट सीरीज वर काम करत आहे. Samsung Galaxy Note 10 बद्दल गेल्याच आठवड्यात लीक समोर आला होता ज्यात ​​डिवाईसच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली होती. आता गॅलेक्सी नोट डिवाईसचा फोटो पण इंटरनेट वर लीक झाला आहे जिथे Galaxy Note 10 च्या रियर कॅमेरा सेटअपचे डिटेल मिळाले आहेत.

Galaxy Note 10 चा हा फोटो फोनएरिना वेबसाइट ने शेयर केला आहे. या डिवाईस बद्दल सांगण्यात आले होते कि Samsung Galaxy Note 10 मॉडेल क्वॉड रियर कॅमेरा सेटअप वर लॉन्च करेल. आता पर्यंत या कॅमेरा सेंसर्सच्या प्लेसमेंटची माहिती नव्हती मिळाली, पण नव्या लीक मध्ये कॅमेरा सेटअपच्या प्लेसमेंट सोबत गॅलेक्सी नोट 10 च्या बॅक पॅनलचा फोटो पण शेयर करण्यात आला आहे. आता पर्यंत गॅलेक्सी नोट सीरीजच्या सर्व डिवाईस मध्ये कॅमेरा सेटअप हारिजॉन्टल शेप मध्ये दिला जात होता तर Galaxy Note 10 मध्ये वर्टिकल शेप मध्ये कॅमेरा सेटअप दाखवण्यात आला आहे.

Samsung Galaxy Note 10 च्या लीक फोटो वर विश्वास ठेवल्यास या डिवाईस मध्ये दोन वर्टिकल शेप दिले जातील जे बॅक पॅनल वर डावीकडे वर असतील. सर्वात डावीकडे तीन कॅमेरा सेंसर वर्टिकल शेप मध्ये दिले जातील, ज्यात प्राइमरी कॅमेरा सेंसर, वाइड एंगल लेंस आणि टेलीफोटो लेंस असेल. या वर्टिकल शेपच्या उजवीकडे एक छोट्या आकाराचा वर्टिकल शेप दिला जाईल, ज्यात फ्लॅश लाईट सह दोन सेंसर असतील. लीक नुसार हा ToF कॅमेरा आणि फ्लड इल्यूमिनेटर सेंसर असेल.

हे देखील वाचा: एक्सक्लूसिव: जून मध्ये लॉन्च होईल पंच-होल डिस्प्ले आणि 48एमपी कॅमेरा असलेला Motorola One Vision, जाणून घ्या याची किंमत

बटणलेस असतील Galaxy Note 10 डिवाईस
विशेष म्हणजे सॅमसंग बद्दल चर्चा आहे ​कि कंपनी आपल्या गॅलेक्सी नोट सीरीज मध्ये दोन मॉडेल लॉन्च करू शकते. यात Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10 Pro डिवाईस असतील. गेल्या काही दिवसांत समोर आलेल्या एका विदेशी रिपोर्ट मध्ये दावा करण्यात आला होता कि सॅमसंगचे आगामी नोट डिवाईस बटनलेस असतील. म्हणजे यात कोणतेही फिजिकल बटण असणार नाही. फोनच्या साईड पॅनल्स वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण दिले जातात. तर Galaxy Note 10 ​मॉडेल्स मध्ये हे बटण नसतील. Samsung आपला हा आगामी डिवाईस बटण ऐवजी टच सेंसर्स सह लॉन्च करू शकते ज्यात फोन बॉडी वर प्रेस केल्याने पावर ऑन व ऑफ होईल तसेच वॉल्यूम कंट्रोल करता येईल.

पावरफुल स्पेसिफिकेशन्स
Samsung बद्दल बोलले जात आहे कि कंपनी आपला Galaxy Note 10 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर करेल जो पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करेल. या दोन्ही मॉडेल्स मध्ये डिस्प्ले साईजचा फरक असेल. लीक्स नुसार Galaxy Note 10 मध्ये 6.4-इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो तर Galaxy Note 10 Pro मध्ये 6.7-इंचाचा मोठा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हे दोन्ही मॉडेल एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतील. Galaxy Note 10 मध्ये 586पीपीआई तर Galaxy Note 10 Pro मध्ये 498पीपीई पिक्सल डेनसिटी वाली स्क्रीन मिळू शकते.

हे देखील वाचा: पाकिस्तान पेक्षा पण कमी मोबाईल इंटरनेट स्पीड मिळत आहे भारतात, देशाचा ग्लोबल रँक घसरला

Samsung चे हे दोन्ही डिवाईस 5जी टेक्नॉलॉजी सह बाजारात येतील. आता पर्यंत समोर आलेल्या लीक्स नुसार Galaxy Note 10 सीरीज कंपनी द्वारा एंडरॉयड 9.0 पाई वर सादर केली जाऊ शकते जी वन यूआई वर आधारित असेल. तसेच प्रोसेसिंग साठी या मॉडेल्स मध्ये क्वालकॉमचा सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 मिळू शकतो. असे पण सांगण्यात आले आहे कि भारत व इतर काही बाजारांत हे फोन 8एनएम टेक्नॉलॉजी वरील एक्सनॉस 9820 चिपसेट वर लॉन्च केले जाऊ शकतात. Galaxy Note 10 Pro बद्दल बोलले जात आहे कि हा टॅबलेट डिवाईस 4,300एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह बाजारात येईल सोबतच यात 50वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट पण मिळू शकतो.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here