सॅमसंग घेऊन येत आहे ‘गॅलेक्सी पी’ सीरीज, इन-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेंसर असलेले फोन होतील लॉन्च

सॅमसंग ने नुकताच कंपनीचा पहिला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असलेला स्मार्टफोन गॅलेक्सी ए7 (2018) सादर केला आहे. हा फोन भारतीय बाजारात आला आहे तसेच सेल साठी पण उपलब्ध होणार आहे. गॅलेक्सी ए7 (2018) च्या माध्यमातून सॅमसंग ने पहिल्यांदा तीन रियर कॅमेरा असलेला फोन सादर केला आहे. टेक विश्वातील चालू स्पर्धेत सॅमसंग आता पुन्हा एकदा आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करणार आहे. अशी बातमी येत आहे कि सॅमसंग येत्या महिन्यात पी30 नावाने नवीन फोन घेऊन येणार आहे ज्यात ​इन-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेंसर असेल.

सॅममोबाईल ने आपल्या रिपोर्ट मध्ये सॅमसंग संबंधित हा नवीन खुलासा केला आहे. रिपोर्ट मध्ये दावा करण्यात आला आहे कि कोरियन कंपनी सॅमसंग आपल्या नवीन स्मार्टफोन सीरीज वर काम करत आहे जो ‘गॅलेक्सी पी’ नावाने टेक विश्वात येईल. रिपोर्ट नुसार हि नवीन स्मार्टफोन सीरीज खूप खास असणार आहे आणि या सीरीजच्या माध्यमातून सॅमसंग आपला पहिला ​इन-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेंसर वॉल स्मार्टफोन सादर करेल.

सॅमसंग आपल्या नवीन सीरीजची सुरवाती गॅलेक्सी पी30 आणि गॅलेक्सी पी30 प्लस स्मार्टफोन सह करू शकते. लीक नुसार सॅमसंगची गॅलेक्सी पी सीरीज खासकरून चीनी मार्केट साठी बनवण्यता येत आहे आणि कंपनीचे ​इन-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेंसर वाले स्मार्टफोन पी30 आणि पी30+ चीनी बाजारातच विकले जातील. एका लीक मधून समोर आले आहे कि गॅलेक्सी पी30 स्मार्टफोन एसएम-जी6200 मॉडेल नंबर सह येईल आणि यात एलसीडी डिस्प्ले पॅनल देण्यात येईल.

विशेष म्हणजे या आधी अशी बातमी आली होती कि सॅमसंग गॅलेक्सी एस10 स्मार्टफोन च्या माध्यमातून ​इन-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेंसर ची सुरवात करेल. पण आता हा फोन पुढल्या वर्षी जानेवारीत सादर केला जाईल. तर गॅलेक्सी पी30 स्मार्टफोन सॅमसंग लवकरच बाजारात आणू पाहत आहे आणि कदाचित हा फोन ऑक्टोबरमध्ये येऊ शकतो.

गॅलेक्सी एस10 बद्दल बोलायचे झाले तर समोर आलेल्या लीक नुसार या फोन मध्ये पण गॅलेक्सी ए7 (2018) प्रमाणे ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल तसेच हा फोन क्वालकॉम अल्ट्रासोनिक इन-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेंसर सह येईल. कंपनी आपला हा फ्लॅगशिप फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855 चिपसेट सह लॉन्च करेल जो 7एनएम टेक्नोलॉजी वर चालतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here