एक्सक्लूसिव: 6 मार्चला भारतात लॉन्च होईल सॅमसंग गॅलेक्सी एस10 सीरीज, 15 मार्च पासून होईल सेल

गेल्या काही दिवसांपासून सॅमसंगच्या नव्या फ्लॅगशिप फोन गॅलेक्सी एस10 ची चर्चा सुरु आहे. अलीकडे कंपनी ने माहिती दिली आहे कि 20 फेब्रुवारीला यांचा ग्लोबल लॉन्च केला जाईल. या बातमी सोबतच भारतात पण सॅमसंग गॅलेक्सी एस10 सीरीजची चाहूल लागली आहे आणि आज 91मोबाईल्स कडे या फोन बद्दल खास माहिती आहे. आमच्याकडे फोनच्या लॉन्च डेट पासून सेल डेट पर्यंतची बातमी आहे.

प्राप्त माहितीनुसार सॅमसंग गॅलेक्सी एस10 भारतात 6 मार्चला लॉन्च केला जाईल. तसेच 15 मार्च पासून हा फोन भारतात सेल साठी उपलब्ध होईल. आम्हाला हि माहिती सॅमसंगच्या एका अशा डिस्ट्रीब्यूटर कडून मिळाली आहे जो गेल्या अनेक वर्षांपासून कंपनी सोबत आहे. त्यांनी आम्हाला गॅलेक्सी एस10 बद्दल अजून पण बरीच खास माहिती दिली आहे. तसेच इतर काही सोर्स कडून आम्ही या बातमीची पडताळणी केली आहे.

त्यांनी सांगितले कि सॅमसंग गॅलेक्सी एस10 सीरीजचे सर्व फोन गॅलेक्सी एस10ई, गॅलेक्सी एस10 आणि गॅलेक्सी एस10 प्लस भारतात लॉन्च केले जातील. पण सर्वात खास बात जी समोर आली आहे ती अशी कि यात 12जीबी रॅम मॉडेल वाला गॅलेक्सी एस10 प्लस पण असेल जो 5जी सपोर्ट सह येईल.

जी माहिती आम्हाला देण्यात आली आहे त्यानुसार सॅमसंग गॅलेक्सी एस10ई ची किंमत 50,000 रुपयांपासून सुरु होईल. तर गॅलेक्सी एस10 कंपनी 65,000 रुपयांच्या बजेट मध्ये लॉन्च करणार आहे तसेच सर्वात महाग गॅलेक्सी एस10 असेल ज्याची बेस किंमत 75,000 रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. तसेच त्यांनी माहिती दिली आहे कि कोणताही मॉडेल 1 लाखांपेक्षा जास्त बजेट मध्ये नसेल.

सॅमसंग कडून अजूनतरी याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु एवढे नक्की कि ग्लोबल लॉन्च सोबत कंपनी भारतातील याच्या उपलब्धतेबद्दल माहिती देऊ शकते.

सॅमसंग गॅलेक्सी एस10 सीरीजचे स्पेसिफिकेशन पाहता आतापर्यंत आलेल्या लीक नुसार सॅमसंग गॅलेक्सी एस10ई मध्ये 5.8-इंचाची सुपर एमोलेड स्क्रीन असेल. कंपनी हि 1440 x 2960 पिक्सल रेजल्यूशन सह सादर करू शकते जी 18.5:9 आसपेक्ट रेशियो सह येईल. फोनची स्क्रीन गोरिल्ला ग्लास 6 कोटेड असू शकते. फोन 8 नॅनो मीटर फॅबरिकेशन असलेल्या एक्सनोस 9820 चिपसेट वर सादर केला जाऊ शकतो आणि यात 6जीबी रॅम व 128जीबी मेमरी मिळू शकते.

गॅलेक्सी एस10 पाहता हा फोन थोड्या मोठ्या स्क्रीन सह सादर केला जाऊ शकतो. फोन मध्ये 6.1-इंचाची 1440 x 2960 पिक्सल रेजल्यूशन असलेली सुपर एमोलेड स्क्रीन मिळू शकते जो एचडीआर10 सपोर्ट सह येईल. हा फोन पण गोरिल्ला ग्लास 10 सपोर्ट सह येऊ शकतो. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसर हा फोन पण 8 नॅनो मीटर फॅबरिकेशन वाल्या एक्सनोस 9820 चिपसेट वर सादर केला जाऊ शकतो आणि यात 6जीबी रॅम व्यतिरिक्त एक मॉडेल 8जीबी वाला पण असेल. दोन्ही सोबत 128जीबी मेमरी मिळेल.

या सीरीजचा सर्वात वरचा मॉडेल सॅमसंग गॅलेक्सी एस10 प्लस असेल. हा फोन 6.4-इंचाच्या स्क्रीन सह लॉन्च होईल आणि कंपनी हा 1440 x 2960 पिक्सल रेजल्यूशन वाल्या सुपर एमोलेड डिस्प्ले सह अनु शकते. फोन मध्ये गोरिल्ला ग्लास 6 प्रोटेक्सन सोबत एचडीआर10 सपोर्ट मिळेल. मिळालेल्या माहितीनुसार याचा सर्वात वरच्या वेरियंट मध्ये 12जीबी रॅम असेल आणि 1टीबी इंटरनल मेमरी असू शकते. तसेच 512जीबी चा एक्सटर्नल मेमरी सपोर्ट पण असेल. भारतात हा फोन पण एक्सनोस 9820 चिपसेट सह येऊ शकतो. तसेच यूएस सहित काही बाजारांत मध्ये कंपनी हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट सह सादर करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here