काही दिवसांपूर्वी एक रिपोर्ट आला होता ज्यात दावा करण्यात आला होता कि सॅमसंग गॅलेक्सी एस10 मध्ये मोठे बदल करणार आहे. माहितीनुसार कंपनी यावेळी एस10 चे चार मॉडेल सादर करणार आहे ज्यात एक 5जी वेरियंट पण असेल. तसेच गॅलेक्सी एस10 चा 5जी वेरियंट कंपनी 12जीबी रॅम सह सादर करू शकते. या सर्व गोष्टींची चर्चा चालू असतानाच या फोन संबंधित अजून एक माहिती समोर आली आहे. ज्यात दावा केला जात आहे कि सॅमसंगच्या या नवीन मॉडेल मध्ये गॅलेक्सी नोट 9 प्रमाणे मोठी बॅटरी असेल आणि बेजल पण कमी असतील.
फोन अरीन द्वारा देण्यात आलेल्या माहितीनुसार यावेळी सॅमसंग दोन वेगवेगळ्या स्क्रीन वेरियंट मध्ये गॅलेक्सी एस10 सादर करू शकते. एक मॉडेल कर्व्ड डिस्प्ले सह सादर केला जाईल तर दुसऱ्यामध्ये फ्लॅट स्क्रीन असण्याची शक्यता आहे. या मॉडेल मध्ये इन विजिबल फ्रंट कॅमेरा असेल जो कंपनी स्क्रीन च्या खाली देऊ शकते. तसेच यात 93.8 टक्के स्क्रीन टू बॉडी रेशियो असू शकतो जो आटपऱ्यांच्या सॅमसंग फोन्स मध्ये सर्वात जास्त असेल. यावर्षी लॉन्च झालेल्या गॅलेक्सी एस9 चा स्क्रीन टू बॉडी रेशियो 83.6 टक्के असेल यावरून अंदाज लावता येईल कि सॅमसंग गॅलेक्सी एस10 मध्ये बेजल जवळपास नसतीलच.
तसेच रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि कंपनी हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855 चिपसेट किंवा एक्नोस 9820 चिपसेट वर सादर करू शकते. या फोन्स मध्ये 7 नॅनो मीटर फॅब्रिकेशन वाला पावरफुल प्रोसेसर असू शकतो जो कमी पावर वापरतो. दिलेल्या माहितीनुसार कंपनी सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 प्रमाणे गॅलेक्सी एस10 ला पण 4,000 च्या बॅटरी सह सादर करू शकते.
सॅमसंग गॅलेक्सी एस10 चे सर्व डिटेल्स अजून आले नाहीत पण फेब्रुवारी मधील अधिकृत लॉन्च आधी नोव्हेंबर पर्यंत कंपनी याला अंतिम रूप देऊ शकते.















