16GB रॅम, 108MP क्वॉड कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी सह लॉन्च होईल Samsung Galaxy S20 Ultra 5G

Samsung येत्या 11 फेब्रुवारीला सॅन फ्रॅन्सिस्को मध्ये ‘Galaxy UNPACKED‘ ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंटच्या मंचावरून कंपनीच्या नवीन फोल्डेबल फोन सोबतच ‘गॅलेक्सी एस सीरीज’ चा विस्तार केला जाईल. चर्चा अशी आहे कि या सीरीज मध्ये Samsung Galaxy S20, Samsung Galaxy S20+, Samsung Galaxy S20 5G आणि Samsung Galaxy S20+ 5G लॉन्च केले जातील. आज सॅमसंग संबंधित एक नवीन लीक समोर आला आहे ज्यात Samsung Galaxy S20 Ultra 5G स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे. हे स्पेसिफिकेशन्स वाचल्यावर म्हणू शकतो कि सॅमसंग आतापर्यंतचा सर्वात पावरफुल स्मार्टफोन घेऊन येत आहे.

Samsung Galaxy S20 Ultra 5G

थेट स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर लीक मध्ये सॅमसंग गॅलेक्सी एस20 अल्ट्रा 5जी चे दोन वेरिएंट्स समोर आले आहेत. फोनचा एक वेरिएंट 12 जीबी रॅम सह येणार असल्याचे सांगण्यात आले आहे तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 16 जीबी चा पावरफुल रॅम मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हा फोन तीन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. Galaxy S20 Ultra 5G च्या बेस वेरिएंट मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 256 जीबी आणि तिसऱ्या वेरिएंट मध्ये 512 जीबी इंटरनल मेमरी दिली जाऊ शकते.

Samsung Galaxy S20 Ultra 5G च्या या सर्व वेरिएंट्स मध्ये 1टीबी पर्यंतची एक्सपांडेबल स्टोरेज मिळणार असल्याची माहिती पण लीक मध्ये समोर आली आहे. कॅमेरा सेग्मेंट पाहता सॅमसंग गॅलेक्सी एस20 अल्ट्रा 5जी मध्ये टीओएफ सेंसर सह क्वॉड रियर कॅमेरा दिला जाईल. या कॅमेरा सेटअप मध्ये 108 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाईल. त्याचबरोबर फोन मध्ये 10x ऑप्टिकल जूम असलेला 48 मेगापिक्सलचा दूसरा सेंसर आणि 12 मेगापिक्सलची अल्ट्रावाइड अँगल लेंस देणार असल्याचे लीक मध्ये समोर आले आहे.

लीकनुसार सॅमसंग गॅलेक्सी एस20 अल्ट्रा 5जी कंपनी 5000एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह लॉन्च करू शकते जी 45वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. लीकनुसार 74 मिनिटांत फोनची बॅटरी 0 ते 100 टक्क्यांपर्यंत चार्ज करता येईल. तसेच टिप्सटरने सांगितले आहे कि Samsung Galaxy S20 च्या तीन मॉडेल्स मध्ये eSIM सपोर्ट पण दिला जाईल. काही दिवसांतच फोनचे ठोस स्पेसिफिकेशन्स समोर येऊ शकतात.

असा असेल लुक

Samsung Galaxy S20+ 5G चे हे फोटोज एक्सटीएस डेवलेपर्सने आपल्या एक्सक्लूसिव रिपोर्ट मध्ये शेयर केले आहेत. सर्वात आधी फोनच्या फ्रंट पॅनल बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन फुलव्यू बेजल लेस पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल ज्यात स्क्रीनच्या वरच्या बाजूला मधोमध छोटासा होल आहे. कंपनी या डिस्प्लेला Infinity-O display म्हणते. फोटो मध्ये Galaxy S20+ पूर्णपणे बेजल लेस दाखवण्यात आला आहे ज्यात डिस्प्लेच्या चारही बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे.

Galaxy S20+ च्या बॅक पॅनल वर पेंटा कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वरच्या बाजूला उजवीकडे आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये एका वर्टिकल लाईन मध्ये तीन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत तर दुसऱ्या वर्टिकल लाईन मध्ये दोन कॅमेरा सेंसर आणि एक फ्लॅश आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस20प्लस च्या रियर पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर नाही जो ईशार आहे कि हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करेल.

Samsung Galaxy S20+ च्या फोटो मध्ये फोनचा ऑन डिस्प्ले दाखवण्यात आला आहे ज्यावर Samsung Galaxy S20+ 5G आणि पावर्ड बाय एंडरॉयड लिहिण्यात आले आहे. तसेच फोनच्या डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे. विशेष म्हणजे फोनच्या साईड पॅनल्स वर बिक्सबे बटण दिसत नाही ज्यावरून असे बोलले जात आहे कि सॅमसंग आपल्या गॅलेक्सी एस20 सीरीज मध्ये बिक्सबे बटण देणार नाही.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here