Samsung Galaxy S21 FE 5G फोन Snapdragon 888 चिपसेटसह भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

Highlights

  • Samsung Galaxy S21 FE फोन Exynos प्रोसेसरसह लाँच झाला होता.
  • आता नवीन Snapdragon 888 प्रोसेसरसह फोन झाला लाँच
  • फोनमध्ये मिळतो 32MP सेल्फी कॅमेरा

Samsung Galaxy S21 FE 5G स्मार्टफोन गेल्यावर्षी जानेवारी मध्ये Exynos प्रोसेसरसह भारतात लाँच झाला होता. आता कंपनीनं हा फोन Qualcomm Snapdragon 888 चिपसेटसह लाँच केला आहे. तसेच 5 कलर ऑप्शनही आले आहेत. नवीन प्रोसेसरसह फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले मिळतो. सेल्फीसाठी फोनमध्ये 32MP कॅमेरा देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया नवीन मॉडेलची किंमत आणि उपलब्धतेची माहिती.

Samsung Galaxy S21 FE 5G ची किंमत

कंपनीनं नवीन Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन मॉडेल 49,999 रुपयांमध्ये लाँच केला आहे. ही फोनच्या 8GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत आहे. हा डिवाइस Olive, Navy, Graphite, Lavender आणि White कलर मध्ये सादर करण्यात आला आहे.

ह्याआधी कंपनीनं Exynos व्हर्जन असलेला सॅमसंग गॅलेक्सी एस21 एफई फोन 37,999 रुपयांमध्ये लाँच केला होता. फोनची विक्री सॅमसंग साइटवर सुरु झाली आहे. तसेच HDFC Bank कार्डच्या माध्यमातून फोनवर 5000 रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट मिळत आहे.

Samsung Galaxy S21 FE स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले: सॅमसंगच्या या फोनमध्ये 6.4 इंचाचा FHD+ डायनॅमिक AMOLED डिस्प्ले मिळतो. ह्या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे.
  • प्रोसेसर आणि रॅम : फोन Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसरसह येतो. जोडीला 8GB RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेज मिळते. हा फोन Android 12 बेस्ड One UI 4 वर चालतो.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ह्यात 12MP चा प्रायमरी कॅमेरा, 12MP चा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 8MP चा टेलीफोटो सेन्सर मिळतो. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.
  • बॅटरी : फोनची बॅटरी 4500mAh ची आहे, जोडीला 25W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. तसेच, फोनमध्ये 15W वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळतो.
  • अन्य फीचर्स : अन्य फीचर्स पाहता, तो फोनमध्ये ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेन्सर आणि IP68 रेटिंग आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here