Samsung Galaxy S24 Ultra टायटॅनियम यलो या नवीन रंगात झाला लाँच, जाणून घ्या संपूर्ण माहिती

सॅमसंगने आपल्या S24 सिरीजमधील सर्वात मजबूत मोबाईल, Samsung Galaxy S24 Ultra हा टायटॅनियम यलो कलरमध्ये लाँच केला आहे. त्यासाठी आता एकूण सात कलर उपलब्ध आहेत. यामध्ये टायटॅनियम ग्रे, टायटॅनियम ब्लॅक, टायटॅनियम व्हायोलेट, टायटॅनियम ब्लू, टायटॅनियम ग्रीन आणि टायटॅनियम ऑरेंज यांचा समावेश आहे. चला आता या नवीन कलरची किंमत आणि स्पेसिफिकेशन यांची तपशीलवार माहिती जाणून घेऊया.

SSamsung Galaxy S24 Ultra टायटॅनियम यलो ची किंमत

  • Samsung Galaxy S24 Ultra टायटॅनियम यलो कलर दोन स्टोरेजमध्ये लाँच करण्यात आला आहे.
  • फोनच्या 12GB रॅम + 256GB स्टोरेजची किंमत 1,29,999 रुपये आहे.
  • मोबाईलच्या 12GB रॅम + 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,39,999 रुपये आहे.
  • हे सॅमसंग शॉप, वेबसाईट, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन आणि इतर रिटेल स्टोअर्सवर उपलब्ध आहे.

Samsung Galaxy S24 Ultra चे स्पेसिफिकेशन

  • डिस्प्ले: Samsung Galaxy S24 Ultra मध्ये 6.8 इंचाचा क्यूएचडी+ डायनॅमिक ॲमोलेड 2X नेहमी ऑन असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 120 हार्टझ रिफ्रेश रेट आणि 2,600 निट्स पीक ब्राईटनेस दिला आहे.
  • चिपसेट: हा मजबूत मोबाईल क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेटसह सुसज्ज आहे. हा प्रोसेसर 4nm फॅब्रिकेशनवर आधारित आहे आणि त्याचे कमाल क्लॉक स्पीड 3.39 GHz इतके आहे.
  • स्टोरेज: स्टोरेजच्या बाबतीत 12 जीबी पर्यंत रॅम आणि 1 टीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे.
  • कॅमेरा: Samsung Galaxy S24 Ultra फ्लॅगशिप फोनमध्ये 200MP OIS प्रायमरी सेन्सर, 5x ऑप्टिकल झूम असलेला 50MP टेलिफोटो कॅमेरा, 3x झूम असलेला 10MP टेलिफोटो सेन्सर आणि 12MP अल्ट्रावाईड कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचवेळी, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 12MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.
  • बॅटरी: फोनमध्ये 45W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh ची बॅटरी दिली गेली आहे.
  • ऑपरेटिंग सिस्टम: हा 7 वर्षांच्या सॉफ्टवेअर अपडेट्स् आणि 7 वर्षांच्या सुरक्षा पॅचसह अँड्रॉइड 14 आधारित One UI 6.1 वर काम करतो.
  • इतर: Samsung Galaxy S24 Ultra मध्ये अनेक गॅलेक्सी AI फिचर्स आहेत. यामध्ये लाईव्ह ट्रान्सलेट कॉलला दोन्ही बाजूने रिअल टाईम ऑडिओ आणि मजकुराचे भाषांतर करता येते. तसेच या व्यतिरिक्त ट्रान्सक्रिप्ट असिस्ट हे फिचर ग्राहकांना रेकॉर्डिंग ट्रान्स्क्राईब करण्यात मदत करते.
LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here