चुकीच्या अकाऊंटमध्ये गेले UPI नं पाठवलेले पैसे? अशी करा तक्रार आणि मिळवा रिफंड

सध्या ऑनलाइन पेमेंटमुळे सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार सोपे झाले आहेत. Paytm UPI, Google Pay, BHIM, PhonePe सारख्या डिजिटल वॉलेट्सच्या माध्यमातून आपण कधीही आणि कुठूनही सहज पैशांची देवाण-घेवाण करू लागलो आहोत. यामुळे आयुष्य सोपं जरी झालं असलं तरी जर एखाद्या चुकीच्या अकाऊंटवर पैसे ट्रांसफर झाले तर सर्वांचा गोंधळ उडतो. आज आम्ही तुम्हाला अशी पद्धत सांगणार आहोत जिच्या मदतीनं तुम्ही UPI ट्रँजॅक्शन दरम्यान चुकीच्या अकाऊंटमध्ये ट्रांसफर झालेले रिपोर्ट करण्यासोबतच पुन्हा मिळवू शकता.

आज आम्ही तुम्हाला Paytm UPI, Google Pay, BHIM, PhonePe सारख्या सर्व प्रमुख यूपीआय अ‍ॅप्समध्ये झालेला चुकीचा व्यवहार कसा रिपोर्ट करायचा, याची स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत. जर तुम्ही एखाद्या चुकीच्या अकाऊंटमध्ये पेमेंट केलं असेल तर तुम्ही मेसेजच्या माध्यमातून तुमच्या फोनवर ते तात्कळ रिपोर्ट करू शकता. जर तुम्हाला मेसेज मिळाला नसेल तर तुम्ही यूपीआय अ‍ॅपच्या माध्यमातून देखील ट्रँजॅक्शन रिपोर्ट करू शकता.

How to get Refund for Wrong UPI Transaction

Paytm वरील चुकीचे UPI ट्रँजॅक्शन रिपोर्ट आणि रिफंड करण्याची पद्धत

जर तुम्ही Paytm च्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या अकाऊंटमध्ये पैसे पाठवले असतील तर तुम्ही थेट त्या व्यक्तीशी संपर्क साधून पैसे परत पाठवण्यास सांगू शतक. जर त्या व्यक्तीशी संपर्क होत नसेल तर तुम्ही रिसिव्हरच्या बँकेशी संपर्क करू शकता. असं करून देखील लाभार्थ्याशी संपर्क होत नसेल तर पेटीएमवरून 24×7 हेल्प सेक्शनच्या माध्यमातून संपर्क करू शकता. यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

  • अ‍ॅपमध्ये डावीकडे वरच्या बाजूला प्रोफाईल पिक्चर मेन्यूवर टॅप करा.
  • खाली स्क्रोल करा आणि 24×7 हेल्प अँड सपोर्टवर टॅप करा.
  • पुन्हा स्क्रोल करा आणि View All Services वर क्लिक करा. UPI पेमेंट अँड मनी ट्रांसफर वर जा.
  • इथे चुकीच्या ट्रँजॅक्शनची निवड करा.
  • तुम्ही तक्रार केल्यावर रिफंड प्रक्रिया सुरु करण्यासाठी पेटीएमच्या सहाय्यकाशी चॅट सुरु करू शकता.

जर लाभार्थीचं पेटीएम अकाऊंट असेल तर पेटीएम टीम रिसिव्हरशी संपर्क करण्याचा प्रयत्न करेल आणि सहमती मिळवल्यावर रक्कम परत पाठवली जाईल. जर रिसिव्हरकडे पेटीएम अकाऊंट नसेल तर पेटीएम टीम रिसिव्हरच्या बँकेशी संपर्क करेल आणि ते त्याच्याशी संपर्क साधतील. लाभार्त्याच्या सहमतीनंतर तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे परत येतील.

BHIM UPI वर चुकीचं UPI ट्रँजॅक्शन रिपोर्ट आणि रिफंड करण्याची पद्धत

  • अ‍ॅपमध्ये वर उजवीकडे हॅमबर्गर मेन्यू (तीन लाइन) वर टॅप करा.
  • Raise Complaint वर जा.
  • त्या व्यवहाराची निवड करा जे तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे.
  • ऑनलाइन माहिती भरण्यासाठी Raise a Concern वर क्लिक करा किंवा तुम्ही Call bank वर क्लिक करून टोल-फ्री नंबरच्या माध्यमातून फोनवर बोलू शकता.

Google Pay वर चुकीचं UPI ट्रँजॅक्शन रिपोर्ट आणि रिफंड करण्याची पद्धत

  • फोनवर अ‍ॅप ओपन करून खाली स्क्रोल करा आणि Show all transaction history वर क्लिक करा आणि चुकीच्या ट्रँजॅक्शनची निवड करा.
  • आता खाली Having issues बटन वर क्लिक करा.

PhonePe वर चुकीचं UPI ट्रँजॅक्शन रिपोर्ट आणि रिफंड करण्याची पद्धत

  • तुमच्या फोनवर PhonePe अ‍ॅपवर जा आणि खाली असलेल्या History बटनवर क्लिक करा.
  • त्यानंतर जे ट्रँजॅक्शन रिपोर्ट करायचं आहे त्याची निवड करा.
  • तक्रार आणि रिफंडची प्रक्रिया सुरु करण्यासाठी Contact PhonePe support वर क्लिक करून PhonePe help support सह चॅट सुरु करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here