सॅमसंग गॅलेक्सी नोट 9 सोबत कंपनी आपले नवीन स्मार्ट वॉच पण सादर करेल याची चर्चा आधी पासून होती आणि आज कंपनी ने या फॅबलेट फोन सोबत आपले नवीन वॉच पण जगासमोर आणले आहेत. पण यावेळी सॅमसंग च्या वॉच सीरीज चे नाव बदलले आहे. आधी कंपनी यांना गियर नावाने लॉन्च करत होती. पण यावेळी यांना सॅमसंग गॅलेक्सी वॉच असे नाव देण्यात आले आहे. कंपनी ने एक साथ दोन वॉच मॉडेल सादर केले आहेत. आज च्या इवेंट मध्ये गॅलेक्सी वॉच 46एमएम सिल्वर आणि गॅलेक्सी वॉच 42एमएम मिडनाइट ब्लॅक व रोज गोल्ड हे सादर केले आहेत.
गॅलेक्सी वॉच 46एमएम सिल्वर
गॅलेक्सी वॉच 46एमएम सिल्वर मध्ये 1.3-इंचाचा सर्कुलर सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचे स्क्रीन रेजल्यूशन 360 x 360 पिक्सल आहे. फोन प्रमाणे यात पण फुल कलर आॅलवेज आॅन डिस्प्ले सपोर्ट आहे. चांगली बाब ही आहे की स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास डीएक्स+ ने प्रोटेक्टेड आहे. वॉच चा आकर 46 x 49 x 13 एमएम आहे. तर वीना स्ट्रीप याचे वजन फक्त 63 ग्राम आहे. कंपनीने यासोबत 22 एमएम इंटर चेंजेबल स्ट्रीप्स दिल्या आहेत ज्या आॅनिक्स ब्लॅक, डीप ओसियन ब्लू आणि ग्रे रंगात उपलब्ध आहेत. तसेच पावर बॅकअप साठी 472 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
गॅलेक्सी वॉच 42एमएम मिडनाइट ब्लॅक व रोज गोल्ड
सॅमसंग गॅलेक्सी वॉच 42एमएम मध्ये 1.2-इंचाचा सर्कुलर सुपर एमोलेड डिस्प्ले आहे जो 360 x 360 पिक्सल रेजल्यूशन वाल्या स्क्रीन सह उपलब्ध आहे. हा मॉडेल पण फुल कलर आॅलवेज आॅन डिस्प्ले ला सपोर्ट करतो. कंपनी ने याला पण कोर्निंग गोरिल्ला ग्लास डीएक्स+ चे प्रोटेक्शन दिले आहे. आकार पाहता हा थोडा छोटा आहे. याचा आकार 41.9 x 45.7 x 12.7 एमएम आहे आणि वीना स्ट्रीप हा फक्त 49 ग्राम चा आहे. या सोबत 20 एमएम च्या इंटर चेंजेबल स्ट्रीप्स आहेत ज्या आॅनिक्स ब्लॅक, लुनार ग्रे, टेराकोटा रेड, लाइम यलो, कॉस्मो पर्पल, पिंक ब्रीज आणि नॅचरल ब्राउन मध्ये उपलब्ध आहेत. पावर बॅकअप साठी या वॉच मध्ये 270 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
ओएस आणि प्रोसेसर
सॅमसंग गॅलेक्सी ओएस वॉच एक्सनॉस 9110 चिपसेट वर सादर करण्यात आले आहेत आणि यात 1.15गीगाहट्र्ज चा डुअल कोर प्रोसेसेर देण्यात आला आहे. हे वॉच सॅमसंग च्या टाइजन आधारित वियरेबल ओएस 4.0 वर चालतात. दोन्ही वॉच मध्ये एलटीई आणि ब्लूटूथ वर्जन आहे. एलटीई वर्जन मध्ये 1.5जीबी रॅम आणि 4जीबी इंटरनल मेमरी आहे. तर ब्लूटूथ वर्जन मध्ये 768एमबी रॅम सोबत 4जीबी मेमरी देण्यात आली आहे. एलटीई मॉडेल मध्ये 4जी सोबत 3जी सपोर्ट देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे दोन्ही वॉच आईपी68 सर्टिफाइड आहेत तुम्ही हे 1.5 मीटर पाण्यात 30 मिनिटांपेक्षा जास्त काळ ठेऊ शकता. या सोबत मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशन आहे ज्यामुळे हे काही उंचावरून पडले तरी यांना काही होत नाही. हे एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 5.0 आणि आईओएस 9.0 च्या वरील वर्जन ला सपोर्ट करू शकतात.














