साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंग आज आपला नवीन स्मार्टफोन Galaxy M40 लॉन्च करण्यासाठी तयार आहे. कंपनीने आपल्या ऑफिशियल साइट वर सॅमसंग समर सेलचे आयोजन केले आहे. हा सेल 10 जून पासून सुरु झाला आहे जो 16 जून पर्यंत चालेल. या सेल मध्ये सॅमसंग हँडसेट्स सोबतच आपले होम अप्लायंस भरपूर डिस्काउांट सह सेल साठी सादर करत आहे.
इतकेच नव्हे तर या सेल मध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मेक माय ट्रिप वाउचर्स आणि 1,500 रुपयांपर्यंतची मोबिक्विक कॅश पण मिळत आहे. सॅमसंग समर ऑफर मध्ये कंपनीच्या हँडसेट्स आणि होम अप्लायंस वर मिळत आहेत जे कंपनीच्या वेबसाइट वर एक्सक्लूसिवली मिळत आहेत.
या सेल मध्ये कंपनीच्या पॉप्युलर M सीरीज स्मार्टफोन्स वर पण डिस्काउंट दिला जात आहे. यात गॅलेक्सी एम30 स्मार्टफोन वर 14,990 रुपये आणि गॅलेक्सी एम10 स्मार्टफोन वर 7,990 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे.
तसेच गॅलेक्सी A9 वर 10,910 रुपयांचा डिस्काउंट सेल मध्ये दिला जात आहे. स्मार्टफोनची खरी किंमत 39,900 रुपये आहे. सेल मध्ये या फोनचा 8जीबी/128जीबी वेरिएंट 28,990 रुपयांमध्ये मिळत आहे. या सेल मध्ये सॅमसंग टीवी वर 45 टक्के आणि एक्ससरीज वर 65 टक्क्यांचा डिस्काउंट मिळत आहे. इतकेच नव्हे तर रेफ्रिजरेटर्स वर 30 टक्के ऑफ मिळत आहे. सेल मध्ये एसी आणि वॉशिंग मशीन वर चांगला डिस्काउंट मिळत आहे.














