Shahid Kapoor करणार वेब सीरीजच्या विश्वात पदार्पण; ‘Farzi’ च्या रिलीज डेटची घोषणा

हिंदी चित्रपटांमधून आपण Shahid Kapoor पाहिलं असेल, त्याच्या ‘कबीर सिंह’ चित्रपटाची खूप चर्चा झाली होती. आता लवकरच शाहिद नव्या जमान्याच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहिद कपूर आता आपल्या नवीन वेब सीरीज ‘फर्जी’ सह डिजिटल डेब्यू करण्यासाठी तयार आहेत. विशेष म्हणजे या सीरीजमध्ये त्याच्यासोबत दाक्षिणात्य सुपर स्टार विजय सेतुपती असेल. आता Farzi Release Date सोबतच या सीरिजचा Teaser देखील जारी करण्यात आला आहे. अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर 10 फेब्रुवारी 2023 पासून ही सीरिज ऑनलाइन बघता येईल. प्राइम व्हिडीओ सोबतच शाहिद कपूर आणि विजय सेतुपतीनं आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर सीरीजचा पोस्टर शेयर करत रिलीज डेटची माहिती दिली आहे.

पाहा Farzi चा टीजर

तुम्हाला सांगू इच्छितो की ‘फर्जी’ च्या टीजर मध्ये शाहिद कपूर कॅनवसवर पेंटिंग करताना दिसत आहे. पेंट करत शाहिद म्हणतो आहे की. “माझ्या आयुष्याचा नवीन टप्पा, लोकांना आवडेल का? परंतु आर्टिस्ट तर आर्टिस्ट असतो ना?” त्यानंतर तो निघून जातो आणि टीजरमध्ये त्याच्या पेंटिंगमध्ये पिवळ्या रंगात ‘फर्जी’ लिहलेलं दिसतं.

ही वेब सीरीज राज आणि डीके यांनी बनवली आहे, ज्यांनी याआधी ‘द फॅमिली मॅन’ आणि ‘द फॅमिली मॅन 2’ बनवली होती. ज्या लोकांना खूप आवडलेल्या होत्या. तसेच, अभिनेता शाहिद कपूर यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्टर शेयर करत लिहलं आहे की, “कोण आहे हा फर्जी?”तर दुसरीकडे विजयनं देखील इन्स्टावर आपला लुक शेयर केला आहे. पोस्टरमध्ये विजय हातात बंदूक घेऊन दिसत आहे.

फर्जी ही वेब सीरिज एका कॉन आर्टिस्ट म्हणजे लोकांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीवर आधारित असू शकते. कारण शाहिदनं पोस्टमध्ये Kon च्या ऐवजी Con चा वापर करून प्रश्न विचारला आहे. तसेच आर्टिस्ट असण्यावर देखील टीजरमध्ये भर देण्यात आला आहे. सीरिजच्या नावातून देखील या शाहिद कॉन आर्टिस्ट असेल, या गोष्टीला दुजोरा मिळतो.

द फॅमिली मॅनच्या निर्मात्यांची भेट आहे फर्जी

वर सांगितल्याप्रमाणे ही सीरीज राज आणि डीके यांनी बनवली आहे. तसेच, मीडिया रिपोर्ट्सनुसार दोघांनी असं म्हटलं आहे की, “द फॅमिली मॅनसाठी प्राइम व्हिडीओकडून चांगलं सहकार्य मिळाल्यानंतर, आम्ही आमच्या आगामी नवीन सीरीजसह पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहोत. ही आमच्या आवडीच्या स्क्रिप्ट्स पैकी एक स्क्रिप्ट आहे, जी बनवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे. तसेच ही वेब सीरिज कोरोना काळातील अडचणींचा सामना करून शूट करण्यात आली आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here