अरे वा! फणसाच्या मदतीने चार्ज करता येईल तुमचा स्मार्टफोन, जाणून घ्या हि टेक्नीक

आता पर्यंत आपण आपला फोन चार्ज करण्यासाठी मोबाईल फोनचा चार्जर पावर प्लगशी कनेक्ट करून चार्ज करत होतो. पण तुम्हाला माहिती आहे का तुम्ही तुमचा फोन फणसाच्या मदतीने पण चार्ज करू शकता. हे वाचायला थोडे विचित्र वाटेल कि फळाच्या मदतीने फोन कसा चार्ज केला जाऊ शकतो. काही दिवसांपूर्वी बटाट्याने फोन चार्ज होत असल्याची बातमी ऑनलाइन प्रकाशित झाली होती. तसेच हि टेक्नीक यूट्यूब वर अनेक वीडियोच्या माध्यमातून दाखवण्यात आली होती. आता संशोधकांनी एका अश्या पद्धतीचा शोध घेतला आहे ज्यामुळे उरलेल्या फळांच्या तुकड्यांच्या मदतीने फोन चार्ज करता येईल.

फळ आणि भाज्यांपासून बनणाऱ्या सुपर-कपॅसिटरच्या मदतीने वीज साठवता येते. या विजेचा वापर करून एखाद्या प्रोडक्टची छोटी बॅटरी चार्ज केली जाऊ शकते. या विजेच्या मदतीने इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट उदा. मोबाईल फोन, टॅबलेट आणि लॅपटॉप चार्ज केले जाऊ शकतात.

यूनिवर्सिटी ऑफ सिडनीच्या संशोधकानेचे हे सांशोधन जर्नल ऑफ एनर्जी स्टोरेज मध्ये प्रकाशित झाले आहे. या संशोधनातून समोर आले आहे कि फणस आणि डूरियन हि फळे वीज साठवू शकतात आणि याचा वापर छोटे इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट चार्ज करण्यासाठी केला जाऊ शकतो. या रिसर्च मध्ये सांगण्यात आले आहे कि फळ आणि भाज्या सुपर कपॅसिटर म्हणून वापरता येतील.

ऑस्ट्रेलियाच्या एका यूनिवर्सिटी रिपोर्ट मध्ये समोर आले आहे कि स्कूल ऑफ केमिकल अँड बायोमोलेक्युलर इंजीनियरिंगचे अकॅडेमिक एसोसिएट प्रोफेसर विंसेंट गोम्स यांनी फणसला सुपर-कपॅसिटर मध्ये रूपांतरित करण्यात यश मिळवले आहे. त्यांच्या मते सुपर-कपॅसिटर ऊर्जा धारणांसारखी असते जी हळुवारपणे बाहेर पडते. या ऊर्जाच्या मदतीने छोटे इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट चार्ज केले जाऊ शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here