इंडियन स्मार्टफोन बाजारासाठी मे महिना खूप खास होता. यात अनेक लो बजेट स्मार्टफोन्स पासून हाईएंड फ्लॅगशिप डिवाईस देशात लॉन्च झाले आहेत. याच महिन्यात Xiaomi व Nokia तसेच Oppo, Vivo, OnePlus आणि Infinix सारख्या ब्रँड्सनी भारतात आपले नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. हे स्मार्टफोन वेगवेगळ्या सेग्मेंट मध्ये लॉन्च झाले आहेत जे बजेट स्पेसिफिकेशन्स सोबत दमदार टेक्नॉलॉजी सह आले आहेत. मे महिन्यात भारतात 8 असे स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत जे 4,000एमएएच किंवा त्यापेक्षा जास्तीच्या बॅटरीला सपोर्ट करत आहेत. जर तुम्ही पण एखादा पावरफुल बॅटरी असलेला फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर पुढे आम्ही मे महिन्यात भारतात लॉन्च झालेल्या सर्व स्मार्टफोनची माहिती दिली आहे, जे तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकतात.
Xiaomi Redmi Note 7S
लो बजेट सेग्मेंट पासून सुरवात करायची झाल्यास Redmi Note 7S असा चांगला स्मार्टफोन आहे जो 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. हा फोन यूएसबी टाईप-सी पोर्ट सह क्विक चार्ज 4 टेक्नॉलॉजी ने सुस्सज आहे. Redmi Note 7S दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा 3जीबी रॅम + 32जीबी स्टोरेज वेरिएंट 10,999 रुपये तर 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज वेरिएंट 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
स्पेसिफिकेशन्स पाहता Redmi Note 7S गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड 6.3-इंचाच्या फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे. एंडरॉयड 9 पाई आणि मीयूआई 10 सह हा फोन 2.2गीगाहर्ट्ज आक्टाकोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट वर चालतो. फोटोग्राफी साठी Redmi Note 7S मध्ये 48-एमपी + 5-एमपी चा डुअल रियर कॅमेरा आणि 13-एमपी चा सेल्फी शूटर देण्यात आला आहे.
Nokia 3.2
नोकिया द्वारा लॉन्च केला गेलेला Nokia 3.2 स्मार्टफोन पण कमी किंमतीत 4,000एमएएच ची बॅटरी देतो. हा फोन पण देशात 2 वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. Nokia 3.2 चा 2जीबी रॅम व 16जीबी स्टोरेज वेरिएंट 8,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे तर फोनचा 3जीबी रॅम व 32जीबी स्टोरेज वेरिएंट 10,790 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.
Nokia 3.2 एंडरॉयड वन आधारित फोन आहे जो एंडरॉयड 9 पाई सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 429 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 504 जीपीयू देण्यात आला आहे. हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो सह 6.26-इंचाच्या डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Nokia 3.2 एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 5-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
OPPO A1k
ओपो द्वारा लॉन्च केला गेलेला हा स्मार्टफोन पण 4,000एमएएच च्या पावरफुल बॅटरीला सपोर्ट करतो. कपंनीने हा फोन एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे जो 2जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. 4जी वोएलटीई सपोर्ट करणारा हा ओपो फोन रेड आणि ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये 8,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
OPPO A1k मध्ये 6.1-इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आली आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. एंडरॉयड 9 पाई आधारित कलरओएस 6 सह हा फोन आक्टाकोर प्रोसेसर व मीडियाटेक 6762 चिपसेट वर चालतो. OPPO A1k पण सिंगल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 8-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 5-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
Vivo Y15
वीवो द्वारा कालच वाय सीरीज मध्ये लॉन्च केला गेलेला Vivo Y15 स्मार्टफोन 5,000एमएएच च्या दमदार बॅटरी ने सुस्सज केला गेला आहे. हा स्मार्टफोन पण एकाच वेरिएंट मध्ये आला आहे ज्यात 4जीबी रॅम सह 64जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. वीवो ने आपला हा शानदार स्मार्टफोन 13,990 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. जो ब्लू आणि रेड कलर वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध आहे.
Vivo Y15 6.35-इंचाच्या एचडी+ डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. एंडरॉयड 9 पाई आधारित फनटच 9 ओएस सह हा फोन मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो. Vivo Y15 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 13-एमपी + 8-एमपी + 2-एमपी चे तीन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी हा फोन 16-एमपी च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
Infinix S4
इनफिनिक्स द्वारा लॉन्च हा स्मार्टफोन 4,000एमएएच च्या बॅटरी वर लॉन्च केला गेला आहे. Infinix S4 मध्ये 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन नेबुला ब्लू, पर्पल आणि ग्रे कलर वेरिएंट मध्ये फक्त 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. कंपनीचा दावा आहे कि Infinix S4 26 दिवसांचा स्टॅन्डबॉय टाईम देऊ शकतो.
स्पेसिफिकेशन्स पाहता Infinix S4 6.21-इंचाच्या आईपीएस टीएफटी डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. एंडरॉयड 9 पाई आधारित एक्सओएस 5.0 सह हा फोन आक्टाकोर प्रोसेसर व मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो. हा फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला आहे. Infinix S4 च्या बॅक पॅनल वर 13-एमपी + 8-एमपी + 2-एमपी चे कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तसेच सेल्फी साठी हा फोन 32-एमपी च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
OnePlus 7 Pro
फ्लॅगशिप सेग्मेंटच्या चाहत्यांसाठी OnePlus 7 Pro स्मार्टफोन आला आहे जो 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. हा फोन Warp Charge 30 टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो जी 30वॉट पावर इनपुट सह येते. किंमत पाहता OnePlus 7 Pro चा 6जीबी + 128जीबी स्टोरेज वेरिएंट 48,999 रुपये, 8जीबी रॅम + 256जीबी मेमरी वेरिएंट 52,999 रुपये तर 12जीबी रॅम + 256जीबी स्टोरेज वेरिएंट 57,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे.
स्पेसिफिकेशन्स पाहता OnePlus 7 Pro 6.67-इंचाच्या क्यूएचडी+ एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी ने सुस्सज आहे. हा एंडरॉयड 9 पाई आधारित आक्सिजन ओएस वर सादर केला गेला आहे जो 2.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या प्रोसेसर सह 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 वर चालतो.
OnePlus 7 Pro ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 48-एमपी सोनी आईएमएक्स586 सेंसर सोबत 16-एमपी ची वाइड एंगल लेंस आणि 8-एमपी ची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. विशेष म्हणजे OnePlus 7 Pro पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च केला गेला आहे.
OPPO Reno 10x Zoom
कालच लॉन्च झालेला ओपोचा हा फ्लॅगशिप फोन यूएसबी टाईप सी पोर्ट सह VOOC 3.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी ने सुस्सज 4,065एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज वेरिएंट 39,990 रुपये आणि 8जीबी रॅम + 256जीबी स्टोरेज वेरिएंट 49,990 रुपयांमध्ये 7 जून पासून सेल साठी उपलब्ध होईल.
स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्टेड 6.6-इंचाच्या एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. ओपो ने हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर ने सुस्सज केला आहे. एंडरॉयड 9 पाई आधारित कलरओएस 6 सह OPPO Reno 10x Zoom क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 640 जीपीयू देण्यात आला आहे.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता OPPO Reno 10x Zoom मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो 48-मेगापिक्सल सेंसर सह 8-मेगापिक्सल आणि 13-मेगापिक्सल च्या वाइड एंगल लेंस तसेच टेलीफोटो लेंसला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे सेल्फी साठी ओपो ने हा फोन 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याने सुस्सज केला आहे. विशेष म्हणजे OPPO Reno जगातील पहिला असा फोन आहे जो शार्क फिन पॉप-अप कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
Black Shark 2
Xiaomi द्वारा लॉन्च हा स्मार्टफोन खासकरून गेमिंगच्या चाहत्यांसाठी साठी बनवण्यात आला आहे. हा फोन क्वालकॉमच्या क्विक चार्ज 4.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी ने सुस्सज 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. Black Shark 2 भारतात 2 वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे. फोनचा 6जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज वेरिएंट 39,999 रुपये तर 12जीबी रॅम + 256जीबी मेमरी वेरिएंट 49,999 रुपयांमध्ये 4 जून पासून विकत घेता येईल.
मेटेलिक बॉडी वर बनलेला Black Shark 2 6.39-इंचाच्या ट्रू व्यू ऐमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. एंडरॉयड 9 पाई सोबत या फोन मध्ये क्वालकॉमचा सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 आहे. तसेच गेमिंग एक्सपीरिएंस चांगला करण्यासाठी हा फोन लिक्विड कूल 3.0 मल्टीलेयर कूलिंग सिस्टम टेक्नॉलॉजी ने सुस्सज केला गेला आहे. ग्राफिक्स साठी फोन मध्ये एड्रेनो 640 जीपीयू चिप चा वापर केला गेला आहे.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Black Shark 2 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. रियर कॅमेरा मध्ये 2x ऑप्टिकल झूम देण्यात आला आहे, तसेच सेल्फी साठी डिवाइस मध्ये f/2.0 अपर्चर वाला 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिविटी साठी डिवाइस मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे.