वोडाफोन-आयडिया करणार एमपीएसीच्या तयारीत मदत; ‘वी’ अ‍ॅपवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यासक्रम

देशभरात होणाऱ्या राष्ट्रीय व राज्य पातळीवरील विविध सरकारी परीक्षांची तयारी करून त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी भारतातील युवकांना सक्षम बनवण्यासाठी ‘वी’ वचनबद्ध आहे. आपल्या ग्राहकांना उज्वल भवितव्याकडे झेप घेता यावी यासाठी त्यांच्या पंखांमध्ये बळ देण्यासाठी प्रयत्नशील असलेली, भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी ‘वी’ने परीक्षाच्या सहयोगाने महाराष्ट्र लोकसेवा सेवा आयोग (एमपीएससी) प्रिलिम परीक्षांच्या तयारीसाठी टेस्ट सीरिज साहित्य 21 ऑगस्ट 2022पासून उपलब्ध करवून देण्याचे ठरवले आहे.

‘वी’ युजर्सना सरकारी नोकऱ्यांसाठीच्या परीक्षांची तयारी करण्याची प्रक्रिया अगदी सुरळीतपणे करता यावी यासाठी ‘वी’ जॉब्स अँड एज्युकेशनमध्ये केंद्र/राज्य सरकारी नोकऱ्या मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी ‘परीक्षा पास’ची एक महिन्याची सब्स्क्रिप्शन निःशुल्क देण्यात आली आहे. यामध्ये राज्य निवड आयोग, बँकिंग, शिक्षण, संरक्षण, रेल्वे इत्यादी विविध विभागांमधील 150 पेक्षा जास्त परीक्षांच्या अमर्याद मॉक टेस्ट्सचा देखील समावेश आहे. ट्रायल कालावधी संपल्यानंतर युजर्स एका वर्षासाठी फक्त 249 रुपये इतकी नाममात्र सब्स्क्रिप्शन फी भरून या प्लॅटफॉर्मवर आपला अभ्यास सुरु ठेवू शकतात.

‘वी’ अ‍ॅपवरील एमपीएसई टेस्ट सीरिजमध्ये भारतातील युवक भारतीय रेल्वेतील तब्बल 1200 हून जास्त जागांसाठी तयारी करू शकतात. यामध्ये पोलीस उप निरीक्षक, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, स्टॅम्प इन्स्पेक्टर आणि राज्य कर निरीक्षक इत्यादींचा समावेश आहे. कुठेही असताना, कधीही ‘वी’ अ‍ॅपवर ‘वी’ जॉब्स अँड एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर ‘वी’ ग्राहक संशोधन करून तयार करण्यात आलेल्या टेस्ट मटेरियलचा लाभ घेऊ शकतात.

‘वी’ अ‍ॅपवर करा रेल्वे ग्रुप डी परीक्षांची तयारी

‘वी’ अ‍ॅपवरील रेल्वे ग्रुप डी टेस्ट सीरिजमध्ये भारतातील युवक भारतीय रेल्वेतील तब्बल 1 लाखांहून जास्त जागांसाठी तयारी करू शकतात. यामध्ये ट्रॅक मेंटेनर ग्रेड-4, हेल्पर/असिस्टंट, असिस्टंट पॉईंट्समॅन, लेवल-1 इत्यादींचा समावेश आहे. कुठेही असताना, कधीही ‘वी’ अ‍ॅपवर ‘वी’ जॉब्स अँड एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर ‘वी’ ग्राहक संशोधन करून तयार करण्यात आलेल्या टेस्ट मटेरियलचा लाभ घेऊ शकतात.

‘वी’ ऍपवर ‘वी’ जॉब्स अँड एज्युकेशनमध्ये भारतातील सर्वात मोठा नोकरी शोध प्लॅटफॉर्म ‘अपना’, इंग्रजी शिकण्यासाठीचा आघाडीचा लर्निंग प्लॅटफॉर्म ‘एनगुरू’ आणि सरकारी नोकऱ्यांसाठीच्या परीक्षांच्या तयारीसाठीचा प्लॅटफॉर्म ‘परीक्षा’ यांना एकीकृत करून घेण्यात आले आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here