Airtel 5G Plus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 19 Oct 2022 10:29:36 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 महाराष्ट्रातील आणखी एका शहराला मिळणार 5G चा मान; Jio-Airtel 5G Service ची नवीन यादी आली समोर https://www.91mobiles.com/marathi/airtel-jio-5g-service-launch-soon-in-these-cities-5g-sim-5g-plan-5g-phone/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-jio-5g-service-launch-soon-in-these-cities-5g-sim-5g-plan-5g-phone/#respond Wed, 19 Oct 2022 10:29:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14148 Airtel-Jio 5G Service: भारतात 5G युग सुरु करत या महिन्याच्या सुरुवातीला टेलीकॉम कंपनी Bharti Airtel (भारती एयरटेल) आणि Reliance Jio (रिलायन्स जियो)नं आपली 5G Service सादर केली. जियोकडून अजूनही Jio True 5G सर्व्हिस इन्व्हिटेशनच्या माध्यमातून युजर्सना दिली जात आहे. तर एयरटेल 5जी काही निवडक शहरांमध्ये लाइव्ह झालं आहे, ज्याचा अनुभव अनेकजण घेत आहेत. परंतु, आता […]

The post महाराष्ट्रातील आणखी एका शहराला मिळणार 5G चा मान; Jio-Airtel 5G Service ची नवीन यादी आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Airtel-Jio 5G Service: भारतात 5G युग सुरु करत या महिन्याच्या सुरुवातीला टेलीकॉम कंपनी Bharti Airtel (भारती एयरटेल) आणि Reliance Jio (रिलायन्स जियो)नं आपली 5G Service सादर केली. जियोकडून अजूनही Jio True 5G सर्व्हिस इन्व्हिटेशनच्या माध्यमातून युजर्सना दिली जात आहे. तर एयरटेल 5जी काही निवडक शहरांमध्ये लाइव्ह झालं आहे, ज्याचा अनुभव अनेकजण घेत आहेत. परंतु, आता 5जीची प्रतीक्षा असलेल्या लोकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे की आता आणखी काही शहरांमधील लोक देखील 5जीचा आनंद घेऊ शकतील. चला जाणून घेऊया की येत्या काळात कोणत्या शहरांमध्ये 5G Live होणार आहे.

सध्या या शहरांमध्ये आहे 5G

October 2022 मध्ये 5G लाइव्ह केल्यानंतर दोन टेलीकॉम कंपन्या म्हणजे Jio आणि Airtel नं काही निवडक शहरांमध्ये 5G सर्व्हिस लाइव्ह केली. Jio सध्या Mumbai, Delhi, Varanasi, आणि Kolkata मध्ये आपली Jio True 5G Service देत आहे. तर Airtel 5G Plus सेवा 8 शहरांमध्ये लाइव्ह आहे, ज्यात Delhi, Mumbai, Chennai, Bengaluru, Hyderabad, Siliguri, Nagpur आणि Varanasi चा समावेश आहे. हे देखील वाचा: 3 लाखांमध्ये Mahindra आणू शकते स्वस्त इलेक्ट्रिक कार! फुल चार्जमध्ये धावेल 100km, माहिती झाली लीक

नोट: Jio Beta Trial च्या माध्यमातून 5G सर्व्हिस प्रोवाइड करत आहे. त्यामुळे कंपनी काही निवडक जियो युजर्सना इन्व्हिटेशन पाठवून आपली 5जी सर्व्हिस (5G Service) देत आहे, 5G स्मार्टफोन असलेला कोणताही जियो युजर सध्यातरी थेट 5G सर्व्हिस वापरू शकणार नाही.

Jio True 5G लवकरच या शहरांमध्ये मिळेल

Jio 5G Launch Speed 1gbps Unlimited 5g Data 5g Sim

  • अहमदाबाद
  • बेंगळुरू
  • चंदिगढ
  • गांधीनगर
  • गुरुग्राम
  • हैदराबाद
  • जामनगर
  • लखनऊ
  • चेन्नई

Airtel 5G Plus लवकरच या शहरांमध्ये मिळेल

Airtel 5G services launch full list of cities where Airtel 5G Plus available 5G SIM 5G Plan

  • अहमदाबाद
  • गांधीनगर
  • गुरुग्राम
  • कोलकाता
  • पुणे
  • जामनगर
  • चंदिगढ

लवकरच संपूर्ण देशात होईल 5G चा विस्तार

5G संपूर्ण देशात पूर्णपणे लाइव्ह होण्यासाठी जवळपास एक ते दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती स्वतः टेलीकॉम कंपन्यांनी दिली आहे. एकीकडे एयरटेलनं सांगितलं आहे की ते मार्च 2024 पर्यंत देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये त्यांची 5G सेवा उपलब्ध करतील. तर जियोचं नेक्स्ट जेनरेशन नेटवर्क डिसेंबर 2023 पर्यंत देशातील सर्व तालुक्यांमध्ये पोहोचेल असं मुकेश अंबानींनी लाँच सांगितलं आहे. हे देखील वाचा: एकच नंबर! 50MP Camera आणि 7GB RAM असलेला नवीन 5G Phone ची किंमत 15 हजारांच्या आत

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post महाराष्ट्रातील आणखी एका शहराला मिळणार 5G चा मान; Jio-Airtel 5G Service ची नवीन यादी आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-jio-5g-service-launch-soon-in-these-cities-5g-sim-5g-plan-5g-phone/feed/ 0
Airtel 5G Launched: Airtel 5G Plus ‘या’ शहरांमध्ये लाँच; 5G सर्व्हिसच्या प्लॅन्सची माहिती आली समोर https://www.91mobiles.com/marathi/airtel-5g-services-launch-full-list-of-cities-where-airtel-5g-plus-available-5g-sim-5g-plan/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-5g-services-launch-full-list-of-cities-where-airtel-5g-plus-available-5g-sim-5g-plan/#respond Fri, 07 Oct 2022 07:27:50 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13769 Airtel 5G Launched: भारती एयरटेलनं देशात Airtel 5G Plus सेवा सुरु केली आहे. टेलीकॉम सेक्टरमध्ये सर्वप्रथम 5G सर्व्हिस सुरु करणाऱ्या कंपनी एयरटेलचं 5G (Airtel 5G Plus) सध्या आठ शहरांमध्ये लाइव्ह करण्यात आलं आहे, ज्यासाठी कंपनी युजर्सना मेसेज देखील पाठवत आहे. तसेच 5G प्लस सर्व्हिस (Airtel 5G Plus Service) बद्दल कंपनीनं म्हटलं आहे की युजर्सना आता […]

The post Airtel 5G Launched: Airtel 5G Plus ‘या’ शहरांमध्ये लाँच; 5G सर्व्हिसच्या प्लॅन्सची माहिती आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Airtel 5G Launched: भारती एयरटेलनं देशात Airtel 5G Plus सेवा सुरु केली आहे. टेलीकॉम सेक्टरमध्ये सर्वप्रथम 5G सर्व्हिस सुरु करणाऱ्या कंपनी एयरटेलचं 5G (Airtel 5G Plus) सध्या आठ शहरांमध्ये लाइव्ह करण्यात आलं आहे, ज्यासाठी कंपनी युजर्सना मेसेज देखील पाठवत आहे. तसेच 5G प्लस सर्व्हिस (Airtel 5G Plus Service) बद्दल कंपनीनं म्हटलं आहे की युजर्सना आता आधीपेक्षा 20-30 पट वेगवान नेटवर्कची सुविधा मिळेल, ज्यात शानदार साउंड एक्सपीरिएंस सोबतच जबरदस्त कॉल कनेक्टिव्हिटी देखील असेल. कंपनीनं Airtel 5G SIM आणि Airtel 5G Plan विषयी युजर्सना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.

Airtel 5G Plus या शहरांमध्ये लाइव्ह

Airtel 5G Plus सर्वप्रथम Delhi, Mumbai, Chennai, Bengaluru, Hyderabad, Siliguri, Nagpur आणि Varanasi या आठ शहरांमध्ये सुरु करण्यात आलं आहे. तसेच कंपनी आपल्या एयरेटल ग्राहकांना मेसेज पाठवून याची माहिती देत आहे. 91मोबाइल्सच्या टीम मेंबरला एयरेटल 5G सर्व्हिस लाइव्ह झाल्याचा मेसेज आला आहे. हे देखील वाचा: 15 हजारांच्या आत 50MP Camera असलेला नवीन 5G Phone; मिळतेय 7GB RAM ची पावर

Airtel 5G services launch full list of cities where Airtel 5G Plus available 5G SIM 5G Plan

Airtel 5G SIM कसे मिळेल?

कंपनीनं स्पष्ट केलं आहे की 5जी प्लस सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना आपलं सिम कार्ड (Airtel 5G SIM) बदलण्याची गरज नाही कारण साध्य असलेल्या Airtel 4G SIM वरच 5जी नेटवर्कचा वापर करता येईल. म्हणजे सध्या ग्राहकांना 5G SIM ची गरज नाही.

Airtel 5G services launch full list of cities where Airtel 5G Plus available 5G SIM 5G Plan

Airtel 5G Recharge Plan

कंपनीनुसार सध्यातरी 4जी प्लॅनच्या किंमतीतच ग्राहकांना 5जी वापरता येईल. म्हणजे तुम्ही 4जी प्लॅनच्या जीवावर 5जीची मजा घेता येईल. त्यामुळे एयरेटलचा सर्वात स्वस्त 5G रिचार्ज प्लॅन 249 रुपयांचा होईल जो एक 4G प्लॅन आहे. यात 2 जीबी डेटा आणि फ्री कॉलिंगची सुविधा आणि 24 दिवसांची वैधता मिळते.

Airtel 5G services launch full list of cities where Airtel 5G Plus available 5G SIM 5G Plan

Airtel 5G Plus Speed

कंपनीनं दावा केला आहे की Airtel 5G Plus मध्ये युजर्स आता 30 पट जास्त वेगानं इंटरनेट वापरू शकतील. तसेच कंपनीनं Airtel 5G Plus सर्व्हिस 6 ऑक्टोबर संध्याकाळी सहा वाजता लाइव्ह केली आहे. म्हणजे उपरोतक्त आठ शहरांमध्ये Airtel 5G चा वापर करता येईल. हे देखील वाचा: अँड्रॉइडच्या बादशाहचं भारतात आगमन! शानदार कॅमेऱ्यासह Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro लाँच

सुपरफास्ट स्पीडनं होईल काम

भारती एयरटेलचे मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ गोपाल विट्टल यांनी Airtel 5G Plus च्या लाँचिंग दरम्यान माहिती दिली की एयरटेल 5जी प्लस आगामी काळात लोकांसाठी संवाद, काम, कनेक्शन आणि खेळण्याची व्याख्या बदलण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. युजर्स एयरटेल 5जी प्लसवरून हाय-डेफिनिशन व्हिडीओ स्ट्रीमिंग, गेमिंग, मल्टीपल चॅटिंग, फोटोज अपलोड करण्यासारख काम सुपरफास्ट स्पीडनं करू शकतील.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठीला Facebook वर फॉलो करा.

The post Airtel 5G Launched: Airtel 5G Plus ‘या’ शहरांमध्ये लाँच; 5G सर्व्हिसच्या प्लॅन्सची माहिती आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-5g-services-launch-full-list-of-cities-where-airtel-5g-plus-available-5g-sim-5g-plan/feed/ 0