महाराष्ट्रातील आणखी एका शहराला मिळणार 5G चा मान; Jio-Airtel 5G Service ची नवीन यादी आली समोर

Airtel-Jio 5G Service: भारतात 5G युग सुरु करत या महिन्याच्या सुरुवातीला टेलीकॉम कंपनी Bharti Airtel (भारती एयरटेल) आणि Reliance Jio (रिलायन्स जियो)नं आपली 5G Service सादर केली. जियोकडून अजूनही Jio True 5G सर्व्हिस इन्व्हिटेशनच्या माध्यमातून युजर्सना दिली जात आहे. तर एयरटेल 5जी काही निवडक शहरांमध्ये लाइव्ह झालं आहे, ज्याचा अनुभव अनेकजण घेत आहेत. परंतु, आता 5जीची प्रतीक्षा असलेल्या लोकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे की आता आणखी काही शहरांमधील लोक देखील 5जीचा आनंद घेऊ शकतील. चला जाणून घेऊया की येत्या काळात कोणत्या शहरांमध्ये 5G Live होणार आहे.

सध्या या शहरांमध्ये आहे 5G

October 2022 मध्ये 5G लाइव्ह केल्यानंतर दोन टेलीकॉम कंपन्या म्हणजे Jio आणि Airtel नं काही निवडक शहरांमध्ये 5G सर्व्हिस लाइव्ह केली. Jio सध्या Mumbai, Delhi, Varanasi, आणि Kolkata मध्ये आपली Jio True 5G Service देत आहे. तर Airtel 5G Plus सेवा 8 शहरांमध्ये लाइव्ह आहे, ज्यात Delhi, Mumbai, Chennai, Bengaluru, Hyderabad, Siliguri, Nagpur आणि Varanasi चा समावेश आहे. हे देखील वाचा: 3 लाखांमध्ये Mahindra आणू शकते स्वस्त इलेक्ट्रिक कार! फुल चार्जमध्ये धावेल 100km, माहिती झाली लीक

नोट: Jio Beta Trial च्या माध्यमातून 5G सर्व्हिस प्रोवाइड करत आहे. त्यामुळे कंपनी काही निवडक जियो युजर्सना इन्व्हिटेशन पाठवून आपली 5जी सर्व्हिस (5G Service) देत आहे, 5G स्मार्टफोन असलेला कोणताही जियो युजर सध्यातरी थेट 5G सर्व्हिस वापरू शकणार नाही.

Jio True 5G लवकरच या शहरांमध्ये मिळेल

Jio 5G Launch Speed 1gbps Unlimited 5g Data 5g Sim

  • अहमदाबाद
  • बेंगळुरू
  • चंदिगढ
  • गांधीनगर
  • गुरुग्राम
  • हैदराबाद
  • जामनगर
  • लखनऊ
  • चेन्नई

Airtel 5G Plus लवकरच या शहरांमध्ये मिळेल

Airtel 5G services launch full list of cities where Airtel 5G Plus available 5G SIM 5G Plan

  • अहमदाबाद
  • गांधीनगर
  • गुरुग्राम
  • कोलकाता
  • पुणे
  • जामनगर
  • चंदिगढ

लवकरच संपूर्ण देशात होईल 5G चा विस्तार

5G संपूर्ण देशात पूर्णपणे लाइव्ह होण्यासाठी जवळपास एक ते दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती स्वतः टेलीकॉम कंपन्यांनी दिली आहे. एकीकडे एयरटेलनं सांगितलं आहे की ते मार्च 2024 पर्यंत देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये त्यांची 5G सेवा उपलब्ध करतील. तर जियोचं नेक्स्ट जेनरेशन नेटवर्क डिसेंबर 2023 पर्यंत देशातील सर्व तालुक्यांमध्ये पोहोचेल असं मुकेश अंबानींनी लाँच सांगितलं आहे. हे देखील वाचा: एकच नंबर! 50MP Camera आणि 7GB RAM असलेला नवीन 5G Phone ची किंमत 15 हजारांच्या आत

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here