3 लाखांमध्ये Mahindra आणू शकते स्वस्त इलेक्ट्रिक कार! फुल चार्जमध्ये धावेल 100km, माहिती झाली लीक

लवकरच आता तुम्ही देखील स्वस्त इलेक्ट्रिक कारमधून प्रवास करू शकता, कारण आता महिंद्रा आपली नवीन सस्ती इलेक्ट्रिक कार (electric car) बाजारात लाँच करण्याची तयारी करत आहे. रिपोर्ट्सनुसार, Mahindra Atom Electric Car पुढील वर्षी ऑटो एक्सपोमध्ये सादर केली जाईल. याआधी ही कार ऑटो एक्सपो 2020 मध्ये सादर करण्यात आली होती. ही एक मिनी कार असेल जी 4 डोरसह येईल. अलीकडेच लीक झालेल्या RTO डॉक्यूमेंटमधून या मिनी ईव्हीबाबत काही महत्वाची माहिती समोर आली आहे, चला जाणून घेऊया.

Mahindra Atom

Mahindra Atom क्वॉड्रिसायकल स्वरूपात डिजाइन करण्यात आली आहे, ज्यात फक्त चार लोक बसू शकतात. रशलेनच्या रिपोर्टनुसार , Mahindra Atom कार चार व्हेरिएंटमध्ये येईल, ज्यात K1, K2, K3 आणि K4 चा समावेश असेल. हिच्या K1 आणि K2 व्हेरिएंटमध्ये 7.4 kWh, 144 Ah चा बॅटरी पॅक मिळेल, तर Atom K3 आणि K4 मध्ये 11.1 kWh, 216 Ah चा बॅटरी पॅक मिळेल. महिंद्रा अ‍ॅटम K1 आणि K2 K3 आणि K4 च्या तुलनेत कमी रेंज देईल. यातील K1 आणि K2 मधील बॅटरी पॅकचं वजन 98 किलोग्राम आहे, तर K3 आणि K4 चं वजन 145 किलोग्राम आहे. महिंद्रा अ‍ॅटमचं कर्ब वेट व्हेरिएंटच्या आधारावर 434 किलोग्राम ते 458 किलोग्राम दरम्यान असेल. हे देखील वाचा: Amazon Great Indian Festival Finale Days sale: अफोर्डेबल 5G फोन्सवरील बेस्ट डील्स

ऑटो एक्सपो 2020 मध्ये सादर करण्यात आलेल्या अ‍ॅटममध्ये मोठ्या डोर्ससह एक बॉक्सी सिल्हूट होती. हिच्या फ्रंटला सिंपल डिजाइन देण्यात येईल. ही मोनोकॉक प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. यात एक मोठी रियर विंडशील्ड मिळेल. किंमत पाहता, या कारची किंमत 3 ते 5 लाख रुपयांच्या दरम्यान ठेवण्यात येईल. त्यामुळे ही Electric Vehicle सेगमेंटमधील सर्वात स्वस्त कार असेल. हे देखील वाचा: कमालच झाली! फक्त 5,499 रुपयांमध्ये मिळतोय नवाकोरा TV, अशी ऑफर पुन्हा नाही

रिपोर्ट्सनुसार, Mahindra Atom ची लांबी 2,728 mm, रुंदी 1,452 mm आणि उंची 1,576 mm असेल. तसेच हीच व्हीलबेस 1,885 mm असेल. Mahindra Atom इलेक्ट्रिक कार जर कमी बजेटमध्ये आली तर त्यामुळे त्या ग्राहकांना आनंद होईल ज्यांचा एक स्वस्त इलेक्ट्रिक कार विकत घ्यायची आहे, ही कार आल्यास इतर कंपन्या देखील कमी बजेट असलेल्या EV सादर करण्यास पुढाकार घेऊ शकतात. परंतु अजूनतरी महिंद्राकडून या कारच्या अधिकृत लाँच बाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here