अँड्रॉइडच्या बादशाहचं भारतात आगमन! शानदार कॅमेऱ्यासह Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro लाँच

Google Pixel 7 Google Pixel 7 Pro launched in India price specifications pre-order details

Google Pixel 7 Series 5G Launch India: Google Pixel 7 5G आणि Pixel 7 Pro 5G Phones अखेरीस आंतरराष्ट्रीय बाजारासह भारतात देखील लाँच करण्यात आले आहेत. लेटेस्ट Pixel 7 series गेल्यावर्षी सादर करण्यात आलेल्या Pixel 6 चा अपग्रेडेड व्हर्जन आहे. त्याचबरोबर Google Pixel 7 Series कंपनीनं Tensor G2 chip, 50MP primary sensor आणि 11MP selfie camera सारख्या दमदार फीचर्ससह बाजारात सादर केली आहे.

Google Pixel 7 and Pixel 7 Pro Price

भारतात Google Pixel 7 स्मार्टफोनचा 8GB + 128GB मॉडेल 59,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. जो स्नो, ओब्सीडियन आणि लेमनग्रास कलर ऑप्शनमध्ये येतो. तर Google Pixel 7 Pro च्या 12GB + 128GB मॉडेलसाठी 84,999 रुपये खर्च करावे लागतील. हा फोन ओब्सीडियन, स्नो आणि हेजल कलरमध्ये विकत घेता येईल. Pixel 7 सीरीज फोन्स भारतात फ्लिपकार्टच्या माध्यमातून विकले जातील. हे स्मार्टफोन प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाले आहेत. हे देखील वाचा: 12 हजारांच्या रेंजमध्ये नोकियाचा तगडा स्मार्टफोन; 50MP कॅमेऱ्यासह Nokia G11 Plus भारतात

Google Pixel 7 Google Pixel 7 Pro launched in India price specifications pre-order details

Google Pixel 7 specifications

Google Pixel 7 मध्ये पंच-होल कटआउट असलेला 90Hz रिफ्रेश रेटसह 6.3-इंच FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये स्क्रीनच्या चारही बाजूंना खूप कमी बेजेल्स आहेत. तसेच Pixel 7 ला पावर देण्यासाठी दुसऱ्या जनरेशनच्या Google Tensor G2 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे, जोडीला 8GB रॅम आणि 128GB / 256GB स्टोरेज मिळते.

Google Pixel 7 Google Pixel 7 Pro launched in India price specifications pre-order details

Pixel 7 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 50MP चा प्रायमरी सेन्सर आणि 12MP चा अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी फ्रंटला 11MP चा स्नॅपर आहे. तसेच फोनमध्ये हाई-रिजॉल्यूशन 8x झूम, रीयल-टोन आणि मूव्ही मोशन ब्लर फिचर मिळतात.

कनेक्टिव्हिटीसाठी 5जी, 4जी एलटीई, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे. यात 30W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,700mAh ची बॅटरी आहे. हा फोन टायटन सिक्योरिटी चिप, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि वायरलेस चार्जिंग अशा फीचर्सनी सज्ज आहे. फोनला 5 वर्षांपर्यंत सिक्योरिटी अपडेट मिळतील तसेच हा आउट ऑफ द बॉक्स अँड्रॉइड 13 ओएसवर चालतो.

Google Pixel 7 Pro specifications

Google Pixel 7 Pro मध्ये 6.7 इंचाचा LTPO QHD + डिस्प्ले आहे, ज्यात सेल्फी शूटरसाठी पंच-होल कटआउट आणि 120Hz पर्यंतचा रिफ्रेश रेट आहे. हा फोन पण Tensor G2 चिपसेटवर चालतो, सोबत 12GB रॅम आणि 128GB / 256GB स्टोरेज मिळते.

Google Pixel 7 Google Pixel 7 Pro launched in India price specifications pre-order details

फोटोग्राफीसाठी Google Pixel 7 Pro च्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 5x ऑप्टिकल झूम सह 48MP टेलीफोटो लेन्स आणि LDAF, 50MP चा प्रायमरी वाइड-अँगल शूटर आणि 12MP ची अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आहे. सेल्फीसाठी Pixel 7 Pro मध्ये 11MP चा सेल्फी स्नॅपर आहे. हे देखील वाचा: Jio 5G launched: वेगवान 5G सर्व्हिससाठी मोबाइलमध्ये ऑन करा ही सेटिंग

Google Pixel 7 Pro मध्ये 30W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. तसेच सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे. फोन वॉटर आणि डस्ट रेजिस्टेंससाठी IP68 रेटिंगला सपोर्ट करतो. नवीन पिक्सल 7 प्रो आउट ऑफ द बॉक्स अँड्रॉइड 13 ओएसवर चालतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here