Apple iPhone 12 Mini - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:26:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 iPhone 12 mini मिळतेय 21 हजारांची सूट; पाहा ऑफर https://www.91mobiles.com/marathi/buy-apple-iphone-12-mini-under-38-thousands-rupees-from-flipkart-know-offer-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/buy-apple-iphone-12-mini-under-38-thousands-rupees-from-flipkart-know-offer-and-specifications/#respond Fri, 23 Dec 2022 04:28:09 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16284 अनेक भारतीयांसाठी अ‍ॅप्पलचा आयफोन एक ड्रीम फोन आहे. म्हणूनच जेव्हा जेव्हा आयफोनच्या कोणत्याही मॉडेलवर मोठा डिस्काउंट दिला जात तेव्हा ग्राहक तुटून पडतात. आता असाच मोठा डिस्काउंट APPLE iPhone 12 mini वर दिला जात आहे. विशेष म्हणजे हा फोन अँड्रॉइड स्मार्टफोन्सपेक्षा कमी किंमतीत विकला जात आहे. त्यामुळे जर तुम्हाला एक आयफोनच हवा असेल आणि बजेट देखील […]

The post iPhone 12 mini मिळतेय 21 हजारांची सूट; पाहा ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अनेक भारतीयांसाठी अ‍ॅप्पलचा आयफोन एक ड्रीम फोन आहे. म्हणूनच जेव्हा जेव्हा आयफोनच्या कोणत्याही मॉडेलवर मोठा डिस्काउंट दिला जात तेव्हा ग्राहक तुटून पडतात. आता असाच मोठा डिस्काउंट APPLE iPhone 12 mini वर दिला जात आहे. विशेष म्हणजे हा फोन अँड्रॉइड स्मार्टफोन्सपेक्षा कमी किंमतीत विकला जात आहे. त्यामुळे जर तुम्हाला एक आयफोनच हवा असेल आणि बजेट देखील कमी असेल तर तुम्ही iPhone 12 mini वरील या ऑफरचा लाभ घेऊ शकता.

38 हजारांच्या आत iPhone 12 mini

फ्लिपकार्टवर APPLE iPhone 12 mini चा 64GB मॉडेल 38,499 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. या मॉडेलची मूळ किंमत 59,900 रुपये आहे परंतु त्यावर फ्लिपकार्टकडून 21,401 रुपयांची सूट मिळत आहे. परंतु अ‍ॅमेझॉन इंडियावर मात्र हा मॉडेल सापडला नाही. तसेच कोटक बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास तुम्हाला 1000 रुपयांची सूट मिळेल. तसेच फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर 5 टक्क्यांचा कॅशबॅक दिला जात आहे. तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून आणखी डिस्काउंट देखील मिळवू शकता. हा फोन ब्लू, ब्लॅक, रेड, ग्रीन, व्हाइट आणि पर्पल कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल.

iPhone 12 mini चे स्पेसिफिकेशन्स

iPhone 12 mini मध्ये 5.4-इंचाचा OLED Super Retina XDA डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 2532×1170 पिक्सल आहे. हा फोन सीरिजमधील सर्वात छोटा मॉडेल आहे. सिक्योरिटीसाठी कंपनीनं Face ID चा सपोर्ट दिला आहे. iPhone 12 mini आऊट ऑफ द बॉक्स iOS 14 वर चालतो. हा एक IP68 रेटिंग असेलला फोन आहे त्यामुळे धूळ आणि पाण्यापासून हा सहज वाचतो.

iPhone 12 mini च्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील दोन्ही सेन्सर 12 मेगापिक्सलचे आहेत जे OIS, 120-डिग्री FoV, f/1.8 अपर्चर आणि 2x ऑप्टिकल झूमला सपोर्ट करतो. तर फोनमध्ये सेल्फीसाठी 12MP TrueDepth स्नॅपर देण्यात आला ज्याचा अपर्चर f/2.2 आहे.

हा आयफोन A14 Bionic चिपसेटसह 64GB, 128GB, आणि 256GB स्टोरेज ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. या Face ID च्या सपोर्टसह बॅक पॅनलवर Ceramic Sheild ग्लास देण्यात आली आहे. या मॉडेलमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5G, ड्युअल SIM (ट्रेडिशनल + eSIM), Wi-Fi 6, Bluetooth, GPS आणि Lighting port असे ऑप्शन मिळतात.

The post iPhone 12 mini मिळतेय 21 हजारांची सूट; पाहा ऑफर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/buy-apple-iphone-12-mini-under-38-thousands-rupees-from-flipkart-know-offer-and-specifications/feed/ 0
iPhone 12 Mini प्रमाणे Xiaomi घेऊन येऊ शकते Redmi Mini, जाणून घ्या खासियत https://www.91mobiles.com/marathi/redmi-small-screen-smartphone-launch-soon-to-compete-iphone-mini/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-small-screen-smartphone-launch-soon-to-compete-iphone-mini/#respond Tue, 20 Oct 2020 13:56:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8594 रेडमी ब्रँडचे जनरल मॅनेजर Lu Weibing यांनी संकेत दिले आहेत. यावरून अंदाज लावला जात आहे कि येत्या काही दिवसांत कंपनी रेडमी मिनी लॉन्च करू शकते. सोबत Lu चे म्हणणे आहे कि साइज छोटी असल्यामुळे बॅटरीच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

The post iPhone 12 Mini प्रमाणे Xiaomi घेऊन येऊ शकते Redmi Mini, जाणून घ्या खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ऍप्पलने अलीकडेच आपला सर्वात छोटा 5G आयफोन 12 मिनी लॉन्च केला होता. छोटी स्क्रीन सह लालेलाल हा फोन खूप पावरफुल आहे जो लोकांना आकर्षित करत आहे. हे पाहून चीन स्मार्टफोन मेकर कंपनी शाओमीच्या रेडमी ब्रँडचे जनरल मॅनेजर Lu Weibing यांनी संकेत दिले आहेत. यावरून अंदाज लावला जात आहे कि येत्या काही दिवसांत कंपनी रेडमी मिनी लॉन्च करू शकते. सोबत Lu चे म्हणणे आहे कि साइज छोटी असल्यामुळे बॅटरीच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

सध्या मोठी स्क्रीन असलेले स्मार्टफोन्सच्या एकूण साइजचा मोठा भाग त्याची बॅटरी घेते, त्यामुळे मिनी फोन मध्ये छोटी बॅटरी असल्यामुळे त्याची क्षमता कमी असेल. येणाऱ्या काही दिवसांत समजले कि रेडमी मिनी मध्ये काय खास असेल.

हे देखील वाचा : Xiaomi घेऊन येत आहे अजून एक पावरफुल फोन Redmi K30s, स्पेसिफिकेशन्स सह वेबसाइट वर झाला लिस्ट

Weibing ने चीनच्या सोशल मीडिया साइट Weibo वर आपल्या अकाउंट वरून याची माहिती दिली आहे. Lu Weibing म्हणतात कि कंपनी रेडमी मिनी बनवू इच्छित आहे पण यासाठी बॅटरीशी तडजोड करावी लागेल. त्यामुळे मिनी फोनची बॅटरी किती पावरफुल असेल हे आता सांगता येणार नाही. अलीकडेच समोर आलेल्या एका रिपोर्ट मध्ये समोर आले आहे कि iPhone 12 mini मध्ये 2,227mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

जेव्हा हि बातमी समोर आली होती कि ऍप्पल आपल्या फ्लॅगशिप आयफोन 12 सीरीज सोबतच आयफोन 12 मिनी स्मार्टफोन पण लॉन्च करणार आहे, तेव्हा रेडमीचे प्रोडक्ट डायरेक्टर Wang Teng यांनी पण सांगितले होते कि ते रेडमी मिनी बनवण्याच्या योजनेवर काम करत आहेत.

हे देखील वाचा : Xiaomi ने केले शक्ती प्रदर्शन, भारतात लॉन्च झाले पावरफुल Xiaomi Mi 10T आणि Mi 10T Pro 5G स्मार्टफोन

iPhone 12 Mini 5G चे स्पेसिफिकेशन्स

आयफोन 12 मिनी 5जी बद्दल बोलायचे झाले तर यात 5.4 इंचाचा डिस्प्ले आहे, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 1080×2340 पिक्सल आहे आणि याच्या पुढे आणि मागे गोरिल्ला ग्लास आहे. फोन iOS 14 वर बेस्ड आहे जो A14 Bionic (5 nm) प्रोसेसर वर चालतो. कंपनी द्वारे हा फोन 64GB, 128GB आणि 256GB वेरियंट मध्ये लॉन्च केला गेला होता. फोटोग्राफीसाठी आयफोन 12 मिनी मध्ये 12 मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

ऍप्पल आयफोन 12 मिनी व्हिडीओ

The post iPhone 12 Mini प्रमाणे Xiaomi घेऊन येऊ शकते Redmi Mini, जाणून घ्या खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/redmi-small-screen-smartphone-launch-soon-to-compete-iphone-mini/feed/ 0
हा आहे सर्वात छोटा 5G iPhone, जाणून घ्या याबाबत सर्वकाही https://www.91mobiles.com/marathi/apple-launch-smallest-5g-iphone-12-mini-price-features-other-details/ https://www.91mobiles.com/marathi/apple-launch-smallest-5g-iphone-12-mini-price-features-other-details/#respond Wed, 14 Oct 2020 13:54:41 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8515 iPhone 12 mini तीन स्टोरेज वेरिएंट- 64GB, 128GB, आणि 256GB मध्ये सादर केला गेला आहे.

The post हा आहे सर्वात छोटा 5G iPhone, जाणून घ्या याबाबत सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Apple ने आपल्या वर्चुअल इवेंट मध्ये iPhone 12 5G सीरीज सादर केली आहे. मंगळवारी रात्री उशिरा आयोजित करण्यात आलेल्या या इवेंट मध्ये iPhone 12 mini 5G, iPhone 12 5G, iPhone 12 Pro 5G आणि iPhone 12 Pro Max 5G सादर करण्यात आले आहेत. iPhone 12 Mini 5G या नवीन सीरीजचा असा फोन होता, ज्याने सर्वांचे लक्ष वेधले. हा हँडसेट ऍप्पलचा सर्वात छोटा आणि स्वस्त 5G मॉडेल आहे. इतकेच नव्हे तर फोन 5Gसपोर्ट सह येतो आणि यह Apple च्या ए14 बायोनिक चिप वर चालतो. या पोस्ट मध्ये मी तुम्हाला ऍप्पलच्या आयफोन 12 मिनी बद्दल संपूर्ण माहिती देणार आहे. या फोन बद्दल कंपनीने दावा केला आहे कि हा जगातील सर्वात छोटा, सर्वात हल्का आणि सर्वात बारीक 5G स्मार्टफोन आहे.

डिजाइन

डिजाइन पाहता iPhone 12 mini 5G गेल्यावर्षी सादर केल्या गेलेल्या आयफोन 11 पेक्षा वेगळ्या आणि नवीन डिजाइन मध्ये सादर केला गेला आहे. आयफोन 12 मिनी मध्ये छोटे, शार्प आणि फ्लॅट ऐज मिळतील. सोबतच यात चांगल्या क्वालिटीची बॉडी आहे. ‘मिनी’ मध्ये एक मजबूत फ्रंट ग्लास, नवीन कलर आणि बारीक बेजल्स सह एक ओएलईडी डिस्प्ले मिळतो. तर फ्रंटला असलेल्या नॉच मध्ये बॉयोमीट्रिक्ससाठी फेस आईडी मिळते. iPhone 12 मिनी च्या मागे चौकोनी डुअल कॅमेरा आणि एक एलईडी फ्लॅश लाइट मिळते. साइजच्या बाबतीती हा फोन iPhone SE पेक्षा पण छोटा आहे.

डिस्प्ले

Apple iPhone 12 Mini 5G मध्ये 5.4-इंचाचा ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन ओएलईडी सुपर रेटिना डिस्प्ले सह येतो. इतकेच नव्हे तर स्क्रीन 2,532 x 1,170p रिजोल्यूशन, 460ppi पिक्सल डेंसिटी, HDR 10 आणि HLG HDRसपोर्ट सह येते. स्क्रीन मजबूत बनवण्यासाठी सिरॅमिक शील्डचा वापर केला गेला आहे. यामुळे हा आयफोन आधीपेक्षा जास्त ड्यूरेबल झाला आहे.

दमदार कॅमेरा

आयफोन 12 मिनी मध्ये 12-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा आहेत, ज्यात क्रमशः एफ/1.6 अपर्चर आणि एफ/2.4 अपर्चर सह एक वाइड-अँगल आणि अल्ट्रा वाइड-अँगल शूटर आहे. फोनच्या फ्रंट कॅमेऱ्यात सेल्फी आणि वीडियो चॅटसाठी 12MP अपर्चर f / 2.2 ट्रू डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. कॅमेरा नवीन स्मार्ट मोड (फ्रंट कॅमेऱ्यासह), स्मार्ट एचडीआर 3 आणि नाइट मोड टाइम-लॅप्स सह येतो. कंपनीने सर्व नवीन आयफोन प्रमाणेच या फोन मध्ये नाइट मोड पण चांगले लो-लाइट रिजल्ट देण्यासाठी अपडेट केला आहे.

प्रोसेसर

फोन मध्ये अपग्रेडेड A14 बायोनिक चिपसेट देण्यात आला आहे जो ए13 चिपसेटच्या तुलनेत खूप वेगाने काम करेल. हा प्रोसेसर आधी लेटेस्ट iPad Air वर उपलब्ध आहे आणि हा चौथ्या पिढीच्या न्यूरल इंजन सह येतो. या नवीन चिप मध्ये 11.8 बिलियन ट्रांजिस्टर आणि 40% तेज सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट (सीपीयू) आहे. यात 30% फास्ट ग्राफिक्स पण आहेत आणि हा 5-नॅनोमीटर मॅन्युफॅक्चरिंग प्रक्रियेसह बनवण्यात आला आहे.

बॅटरी पावर आणि फास्ट चार्जिंग

ऍप्पल कधीच आपल्या आयफोन मधील बॅटरीचा खुलासा करत नाही. पण कंपनीने हि माहिती बॅटरी लाइफ म्हणून दिली आहे. कंपनीचा दावा आहे कि iPhone 12 mini मध्ये 15 तास वीडियो प्लेबॅक मिळेल. फोन मॅगसेफ वायरलेस चार्जिंग (15W पर्यंत) आणि ची वायरलेस चार्जिंगला (7.5W पर्यंत ) सपोर्ट करतो.

किंमत आणि विक्रीची माहिती

iPhone 12 mini तीन स्टोरेज वेरिएंट- 64GB, 128GB, आणि 256GB मध्ये सादर केला गेला आहे. iPhone 12 mini च्या 64GB वेरिएंटची किंमत 69,900 रुपये, 128GB वेरिएंटची किंमत 74,900 रुपये आणि 256GB वेरिएंटची किंमत 84,900 रुपये आहे. फोन blue, green, black, white आणि PRODUCT(RED) मध्ये येतो. फोन भारतात 30 ऑक्टोबर पासून मिळेल.

The post हा आहे सर्वात छोटा 5G iPhone, जाणून घ्या याबाबत सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-launch-smallest-5g-iphone-12-mini-price-features-other-details/feed/ 0
Apple का सर्वात पावरफुल फोन iPhone 12 Pro Max झाला लॉन्च, याच्या फीचर्सना देणार नाही कोणीच टक्कर https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-12-pro-max-officially-launched-feature-specs-price/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-12-pro-max-officially-launched-feature-specs-price/#respond Wed, 14 Oct 2020 13:35:42 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8512 iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max मध्ये मुख्य फरक स्क्रीन साइज आणि बॅटरीचा आहे.

The post Apple का सर्वात पावरफुल फोन iPhone 12 Pro Max झाला लॉन्च, याच्या फीचर्सना देणार नाही कोणीच टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Apple ने काल ऑनलाइन इवेंट मध्ये आपल्या नवीन टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत ऍडव्हान्स प्रोडक्ट्स सादर केले आहेत. यात स्मार्टहोम गॅजेट HomePod Mini पासून नवीन आयफोन 12 सीरीजचा पण समावेश आहेत. सर्वात खास बाब अशी कि प्रथमच कंपनीने एक साथ 4 फोन लॉन्च केले आहेत. Apple ने iPhone 12, iPhone 12 Mini, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max लॉन्च केले आहेत. तसेच आयफोन 12 सीरीज सोबतच ऍप्पल ने 5G फोन सेग्मेंट मध्ये पण एंट्री केली आहे. काल लॉन्च झालेले ऍप्पलचे हे चारही फोन्स 5जीला सपोर्ट करतात. पुढे मी Apple iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

लुक व डिजाईन

Apple iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max कंपनीने मेटल यूनिबॉड डिजाईन वर सादर केले आहेत आणि याची बॉडी स्टेनलेश स्टीलची बनली आहे. फोनचा डिस्प्ले बेजल लेस आहे तसेच स्क्रीनच्या वरच्या बाजूला मधोमध रुंद नॉच देण्यात आली आहे. कंपनीने जुनी डिजाइन पुन्हा वापरली आहे. त्याचप्रमाणे फोनच्या बॅक पॅनल वर उजवीकडे रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो चोकोनी आकाराचा आहे. बॅक पॅनल वरच मधोमध Apple चा लोगो आहे.

डिस्प्ले

iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max मध्ये मुख्य फरक स्क्रीन साइज आणि बॅटरीचा आहे. प्रो मॉडेल मध्ये 6.1 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. तर प्रो मॅक्स मध्ये 6.7 इंचाची स्क्रीन आहे. कंपनीने सेरॉमिक शिल्ड कर्व्ड डिस्प्लेचा वापर केला आहे.

iPhone 12 Pro मध्ये 2532 X 1170 पिक्सल रेजल्यूशन असलेला OLED डिस्प्ले पॅनल आहे आणि पिक्सल डेनसिटी 460 पीपीआई आहे. तसेच iPhone 12 Pro Max मध्ये पण पॅनल OLED आहे परंतु पिक्सल रेजल्यूशन 2778 X 1284 आहे आणि याची पिक्सल डेनसिटी 458 पीपीआई आहे. दोन्ही फोन्सची स्क्रीन 2,000,000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो आणि 1200nits ब्राइटनेसला सपोर्ट करते.

फोटोग्राफी

Apple iPhone 12 Pro आणि Pro Max फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो एलईडी फ्लॅश सह फोनच्या बॅक पॅनल वर आहे. यात 12 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे जो एफ/1.6 अपर्चर सह येतो. हा सेंसर अल्ट्रावाइड अँगल लेंस आहे जी 26एमएम फोकल लेंथला सपोर्ट करते. नवीन आयफोनचा हा सेंसर OIS फीचर सह येतो.

तसेच दुसरा सेंसर एफ/2.0 अपर्चर सह येतो आणि हि 12 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आहे. फोनचा हा कॅमेरा सेंसर 52एमएम फोकल लेंथ सह 4एक्स डिजीटल जूमला सपोर्ट करतो. हि लेंस पण ओआईएस फीचर सह येते. तिसरा सेंसर पण 12 मेगापिक्सलचा आहे जो डेफ्थ सेंसिंगसाठी आहे.

पावरफुल प्रोसेसर

वर सांगितल्याप्रमाणे आयफोन 12 सीरीज ऍप्पलची पहली 5जी आयफोन सीरीज आहे. Apple iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max दोन्ही मध्ये 5जी सपोर्ट आहे. हे फोन्स 5 नॅनोमीटर फॅब्रिकेशन वर बनलेल्या ऍप्पल बॉयोनिक ए14 चिपसेट वर चालतात. विशेष म्हणजे हा चिपसेट 16-कोर न्यूरल इंजन वर बनला आहे कंपनीचा दावा आहे कि हा परफॉर्मेंस 80 टक्क्यांपर्यंत बूस्ट करुस शकतो. ऍप्पलचा हा चिपसेट आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलॉजी सह येतो आणि AR tasks म्हणजे आग्यूमेंटेड रियालिटी संबंधित कामे फास्ट आणि लॅग फ्री पद्धतीने करतो. ऍप्पलने हा सुपर फास्ट, जास्त ऍडव्हान्स आणि आधीपेक्षा जास्त सिक्योर असल्याचे म्हटले आहे. तुम्हाला तर माहित आहे कंपनी कधीच रॅमची माहिती देत नाही. यावेळी पण कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

iOS 14

ऍप्पलने आपली iPhone 12 सीरीज लेटेस्ट आयओएस 14 सह बाजारात आणली आहे. हि नवीन ऑपरेटिंग सिस्टम आधीपेक्षा जास्त कस्टमाइजेशन फीचर्स सह रीडिजाइन केलेल्या होम स्क्रीन सह येते. iOS 14 मध्ये जुन्या टुडे व्यू सह, विजेट्स वेगवेगळ्या प्रकारच्या आणि आकारात होम स्क्रीन वर ऍड करता येतील. यूजर्ससाठी विजेट जोडण्यासाठी आणि कस्टमाइज करण्यासाठी एक नवीन “विजेट गॅलरी” आणि “स्मार्ट स्टॅक” विजेट आहे. नवीन ऍप लाइब्रेरी सोबतच सिक्योरिटी आणि ऍप मॅनेजमेंटचे शानदार फीचर्स पण आयओएस 14 मध्ये आहे.

वेरिएंट्स व किंमत

Apple iPhone 12 Pro भारतात तीन स्टोरेज वेरिएंट्स उपलब्ध होईल. 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,19,900 रुपये असेल तर 256 GB स्टोरेज वेरिएंट 1,29,900 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. तसेच 512 GB स्टोरेज वेरिएंटसाठी तुम्हाला 1,49,900 रुपये द्यावे लागतील.

Apple iPhone 12 Pro Max चे पण तीन वेरियंट आहेत. कंपनीने 128 GB, 256 GB आणि 512 GB चा ऑप्शन सादर केला आहे आणि यांची किंमत क्रमश: 1,29,900 रुपये 1,39,900 रुपये आणि 1,59,900 रुपये आहे.

6 नोव्हेंबर पासून यांची बुकिंग भारतात सुरु होईल आणि 13 नोव्हेंबर पासून हे फोन्स भारतात विक्रीसाठी उपलब्ध होतील.

ऍप्पल आयफोन 12 प्रो मॅक्स वीडियो

The post Apple का सर्वात पावरफुल फोन iPhone 12 Pro Max झाला लॉन्च, याच्या फीचर्सना देणार नाही कोणीच टक्कर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-12-pro-max-officially-launched-feature-specs-price/feed/ 0