Xiaomi ने गेल्या महिन्यात अंर्तराष्ट्रीय मंचावर आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत ‘मी 10टी’ सीरीज सादर केली होती. 30 सप्टेंबरला हि सीरीज यूरोपियन मार्केट मध्ये आली होती, त्यानंतर भारतीय मी फॅन्स हि सीरीज भारतात येण्याची वाट बघत होते. आज आपल्या फॅन्सची मागणी पूर्ण करत आणि भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत Xiaomi ने Mi 10T सीरीज भारतात लॉन्च केली आहे. कंपनीने या सीरीज अंतगर्त Xiaomi Mi 10T आणि Xiaomi Mi 10T Pro स्मार्टफोन जोडले आहेत जे 5G कनेक्टिविटीला सपोर्ट करतात.
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Xiaomi Mi 10T आणि Mi 10T Pro कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केले आहेत जे 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या मोठ्या फुलएचडी+ डॉट डिस्प्लेला सपोर्ट करतात. या दोन्ही फोन्सची स्क्रीन 144Hz रिफ्रेश रेट वर चालते जो ट्रिपल कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. हा डिस्प्ले 1500:1 कान्ट्रॉस्ट रेशियो, 650 nits मॅक्सिमम ब्राइटनेस आणि HDR10 सारख्या फीचर्स सह येतो तसेच शाओमीने या दोन्ही स्मार्टफोन्स रिडिंग मोड 3.0 तसेच सनलाईट डिस्प्ले 3.0 सह येतात.
शाओमी मी 10टी सीरीजची दुसरी सर्वात मोठी यूएसपी आहे याचा कॅमेरा सेग्मेंट आहे. Xiaomi Mi 10T आणि Mi 10T Pro स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. शाओमीने मी 10टी प्रो 108 मेगापिक्सलच्या प्राइमरी कॅमेरा लेंस सह लॉन्च केला आहे. हा Samsung HMX सेंसर आहे जो एफ/1.69 अपर्चरला सपोर्ट करतो. दुसरीकडे शाओमी मी 10टी स्मार्टफोन एफ/1.89 अपर्चर असलेल्या 64 मेगापिक्सलच्या प्राइमरी Sony IMX682 सेंसरला सपोर्ट करतो.
या दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये एफ/2.4 अपर्चर असलेली 13 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. शाओमी मी 10टी प्रो चा रियर कॅमेरा 30x पर्यंत तसेच मी 10टी स्मार्टफोन 10x पर्यंत डिजीटल जूमला सपोर्ट करतो. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 20 मेगापिक्सलचा अल्ट्राक्लियर पंच-होल कॅमेरा देण्यात आला आहे. हा एक Samsung S5K3T2 सेंसर आहे.
Xiaomi Mi 10T आणि Mi 10T Pro स्मार्टफोन अँड्रॉइडच्या सर्वात नवीन ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड 11 वर लॉन्च केले गेले आहेत जे मीयूआई 12 सह चालतात. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोन्स मध्ये 2.84गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसर सह 7नॅनोमीटर फॅब्रिकेशन वर बनलेला क्वॉलकॉमचा सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 865 आहे. हा चिपसेट X55 मॉडम सह येतो जो 5G नेटवर्कला सपोर्ट करतो. तसेच ग्राफिक्ससाठी फोन मध्ये एड्रेनो 650 जीपीयू देण्यात आला आहे.
Xiaomi Mi 10T मार्केट मध्ये दोन वेरिएंट्स मध्ये आला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. Xiaomi Mi 10T Pro ने पण भारतीय बाजारात दोन वेरिएंट्स मध्ये एंट्री केली आहे. Xiaomi Mi 10T Pro ने पण भारतीय बाजारात एकाच वेरिएंट मध्ये एंट्री घेतली आहे. मी 10टी प्रो 8 जीबी रॅमला सपोर्ट करतो त्यासोबतच 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हे दोन्ही डिवाईस LPDDR5 RAM आणि UFS 3.1 फ्लॅश स्टोरेजला सपोर्ट करतात.
Xiaomi Mi 10T आणि Xiaomi Mi 10T Pro हे दोन्ही स्मार्टफोन भारतात मोठ्या बॅटरी सह लॉन्च झाले आहेत. शाओमीने आपले फोन्स 5,000एमएएच च्या दमदार बॅटरी सह सादर केले आहेत. मी 10टी आणि मी 10टी प्रो दोन्ही स्मार्टफोन्सची बॅटरी चार्जर आणि वायरलेस दोन्ही पद्धतीने चार्ज केला जाऊ शकतात. मोठी बॅटरी वेगाने चार्ज करण्यासाठी फोन 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येतो. चांगली बाब अशी आहे कि 33W fast charger रिटेल बॉक्स मध्ये मिळतो.
किंमत
Xiaomi Mi 10T चा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज असलेला बेस वेरिएंट 35,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे तसेच फोनच्या 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटने 37,999 रुपयांमध्ये बाजारात एंट्री घेतली आहे.
Xiaomi Mi 10T Pro स्मार्टफोन कंपनीने 39,999 रुपयांमध्ये भारतात लॉन्च केला आहे, जो 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. हे दोन्ही फोन आज पासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाले आहेत जे शॉपिंग साइट फ्लिपकार्ट आणि शाओमी अधिकृत स्टोर्स वर Cosmic Black आणि Lunar Silver कलर मध्ये विकत घेता येतील.

















