iPhone 12 Mini प्रमाणे Xiaomi घेऊन येऊ शकते Redmi Mini, जाणून घ्या खासियत

ऍप्पलने अलीकडेच आपला सर्वात छोटा 5G आयफोन 12 मिनी लॉन्च केला होता. छोटी स्क्रीन सह लालेलाल हा फोन खूप पावरफुल आहे जो लोकांना आकर्षित करत आहे. हे पाहून चीन स्मार्टफोन मेकर कंपनी शाओमीच्या रेडमी ब्रँडचे जनरल मॅनेजर Lu Weibing यांनी संकेत दिले आहेत. यावरून अंदाज लावला जात आहे कि येत्या काही दिवसांत कंपनी रेडमी मिनी लॉन्च करू शकते. सोबत Lu चे म्हणणे आहे कि साइज छोटी असल्यामुळे बॅटरीच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

सध्या मोठी स्क्रीन असलेले स्मार्टफोन्सच्या एकूण साइजचा मोठा भाग त्याची बॅटरी घेते, त्यामुळे मिनी फोन मध्ये छोटी बॅटरी असल्यामुळे त्याची क्षमता कमी असेल. येणाऱ्या काही दिवसांत समजले कि रेडमी मिनी मध्ये काय खास असेल.

हे देखील वाचा : Xiaomi घेऊन येत आहे अजून एक पावरफुल फोन Redmi K30s, स्पेसिफिकेशन्स सह वेबसाइट वर झाला लिस्ट

Weibing ने चीनच्या सोशल मीडिया साइट Weibo वर आपल्या अकाउंट वरून याची माहिती दिली आहे. Lu Weibing म्हणतात कि कंपनी रेडमी मिनी बनवू इच्छित आहे पण यासाठी बॅटरीशी तडजोड करावी लागेल. त्यामुळे मिनी फोनची बॅटरी किती पावरफुल असेल हे आता सांगता येणार नाही. अलीकडेच समोर आलेल्या एका रिपोर्ट मध्ये समोर आले आहे कि iPhone 12 mini मध्ये 2,227mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

जेव्हा हि बातमी समोर आली होती कि ऍप्पल आपल्या फ्लॅगशिप आयफोन 12 सीरीज सोबतच आयफोन 12 मिनी स्मार्टफोन पण लॉन्च करणार आहे, तेव्हा रेडमीचे प्रोडक्ट डायरेक्टर Wang Teng यांनी पण सांगितले होते कि ते रेडमी मिनी बनवण्याच्या योजनेवर काम करत आहेत.

हे देखील वाचा : Xiaomi ने केले शक्ती प्रदर्शन, भारतात लॉन्च झाले पावरफुल Xiaomi Mi 10T आणि Mi 10T Pro 5G स्मार्टफोन

iPhone 12 Mini 5G चे स्पेसिफिकेशन्स

आयफोन 12 मिनी 5जी बद्दल बोलायचे झाले तर यात 5.4 इंचाचा डिस्प्ले आहे, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 1080×2340 पिक्सल आहे आणि याच्या पुढे आणि मागे गोरिल्ला ग्लास आहे. फोन iOS 14 वर बेस्ड आहे जो A14 Bionic (5 nm) प्रोसेसर वर चालतो. कंपनी द्वारे हा फोन 64GB, 128GB आणि 256GB वेरियंट मध्ये लॉन्च केला गेला होता. फोटोग्राफीसाठी आयफोन 12 मिनी मध्ये 12 मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

ऍप्पल आयफोन 12 मिनी व्हिडीओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here