Apple का सर्वात पावरफुल फोन iPhone 12 Pro Max झाला लॉन्च, याच्या फीचर्सना देणार नाही कोणीच टक्कर

Apple ने काल ऑनलाइन इवेंट मध्ये आपल्या नवीन टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत ऍडव्हान्स प्रोडक्ट्स सादर केले आहेत. यात स्मार्टहोम गॅजेट HomePod Mini पासून नवीन आयफोन 12 सीरीजचा पण समावेश आहेत. सर्वात खास बाब अशी कि प्रथमच कंपनीने एक साथ 4 फोन लॉन्च केले आहेत. Apple ने iPhone 12, iPhone 12 Mini, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max लॉन्च केले आहेत. तसेच आयफोन 12 सीरीज सोबतच ऍप्पल ने 5G फोन सेग्मेंट मध्ये पण एंट्री केली आहे. काल लॉन्च झालेले ऍप्पलचे हे चारही फोन्स 5जीला सपोर्ट करतात. पुढे मी Apple iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max बद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

लुक व डिजाईन

Apple iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max कंपनीने मेटल यूनिबॉड डिजाईन वर सादर केले आहेत आणि याची बॉडी स्टेनलेश स्टीलची बनली आहे. फोनचा डिस्प्ले बेजल लेस आहे तसेच स्क्रीनच्या वरच्या बाजूला मधोमध रुंद नॉच देण्यात आली आहे. कंपनीने जुनी डिजाइन पुन्हा वापरली आहे. त्याचप्रमाणे फोनच्या बॅक पॅनल वर उजवीकडे रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो चोकोनी आकाराचा आहे. बॅक पॅनल वरच मधोमध Apple चा लोगो आहे.

डिस्प्ले

iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max मध्ये मुख्य फरक स्क्रीन साइज आणि बॅटरीचा आहे. प्रो मॉडेल मध्ये 6.1 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. तर प्रो मॅक्स मध्ये 6.7 इंचाची स्क्रीन आहे. कंपनीने सेरॉमिक शिल्ड कर्व्ड डिस्प्लेचा वापर केला आहे.

iPhone 12 Pro मध्ये 2532 X 1170 पिक्सल रेजल्यूशन असलेला OLED डिस्प्ले पॅनल आहे आणि पिक्सल डेनसिटी 460 पीपीआई आहे. तसेच iPhone 12 Pro Max मध्ये पण पॅनल OLED आहे परंतु पिक्सल रेजल्यूशन 2778 X 1284 आहे आणि याची पिक्सल डेनसिटी 458 पीपीआई आहे. दोन्ही फोन्सची स्क्रीन 2,000,000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो आणि 1200nits ब्राइटनेसला सपोर्ट करते.

फोटोग्राफी

Apple iPhone 12 Pro आणि Pro Max फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो एलईडी फ्लॅश सह फोनच्या बॅक पॅनल वर आहे. यात 12 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे जो एफ/1.6 अपर्चर सह येतो. हा सेंसर अल्ट्रावाइड अँगल लेंस आहे जी 26एमएम फोकल लेंथला सपोर्ट करते. नवीन आयफोनचा हा सेंसर OIS फीचर सह येतो.

तसेच दुसरा सेंसर एफ/2.0 अपर्चर सह येतो आणि हि 12 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आहे. फोनचा हा कॅमेरा सेंसर 52एमएम फोकल लेंथ सह 4एक्स डिजीटल जूमला सपोर्ट करतो. हि लेंस पण ओआईएस फीचर सह येते. तिसरा सेंसर पण 12 मेगापिक्सलचा आहे जो डेफ्थ सेंसिंगसाठी आहे.

पावरफुल प्रोसेसर

वर सांगितल्याप्रमाणे आयफोन 12 सीरीज ऍप्पलची पहली 5जी आयफोन सीरीज आहे. Apple iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max दोन्ही मध्ये 5जी सपोर्ट आहे. हे फोन्स 5 नॅनोमीटर फॅब्रिकेशन वर बनलेल्या ऍप्पल बॉयोनिक ए14 चिपसेट वर चालतात. विशेष म्हणजे हा चिपसेट 16-कोर न्यूरल इंजन वर बनला आहे कंपनीचा दावा आहे कि हा परफॉर्मेंस 80 टक्क्यांपर्यंत बूस्ट करुस शकतो. ऍप्पलचा हा चिपसेट आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलॉजी सह येतो आणि AR tasks म्हणजे आग्यूमेंटेड रियालिटी संबंधित कामे फास्ट आणि लॅग फ्री पद्धतीने करतो. ऍप्पलने हा सुपर फास्ट, जास्त ऍडव्हान्स आणि आधीपेक्षा जास्त सिक्योर असल्याचे म्हटले आहे. तुम्हाला तर माहित आहे कंपनी कधीच रॅमची माहिती देत नाही. यावेळी पण कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

iOS 14

ऍप्पलने आपली iPhone 12 सीरीज लेटेस्ट आयओएस 14 सह बाजारात आणली आहे. हि नवीन ऑपरेटिंग सिस्टम आधीपेक्षा जास्त कस्टमाइजेशन फीचर्स सह रीडिजाइन केलेल्या होम स्क्रीन सह येते. iOS 14 मध्ये जुन्या टुडे व्यू सह, विजेट्स वेगवेगळ्या प्रकारच्या आणि आकारात होम स्क्रीन वर ऍड करता येतील. यूजर्ससाठी विजेट जोडण्यासाठी आणि कस्टमाइज करण्यासाठी एक नवीन “विजेट गॅलरी” आणि “स्मार्ट स्टॅक” विजेट आहे. नवीन ऍप लाइब्रेरी सोबतच सिक्योरिटी आणि ऍप मॅनेजमेंटचे शानदार फीचर्स पण आयओएस 14 मध्ये आहे.

वेरिएंट्स व किंमत

Apple iPhone 12 Pro भारतात तीन स्टोरेज वेरिएंट्स उपलब्ध होईल. 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,19,900 रुपये असेल तर 256 GB स्टोरेज वेरिएंट 1,29,900 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. तसेच 512 GB स्टोरेज वेरिएंटसाठी तुम्हाला 1,49,900 रुपये द्यावे लागतील.

Apple iPhone 12 Pro Max चे पण तीन वेरियंट आहेत. कंपनीने 128 GB, 256 GB आणि 512 GB चा ऑप्शन सादर केला आहे आणि यांची किंमत क्रमश: 1,29,900 रुपये 1,39,900 रुपये आणि 1,59,900 रुपये आहे.

6 नोव्हेंबर पासून यांची बुकिंग भारतात सुरु होईल आणि 13 नोव्हेंबर पासून हे फोन्स भारतात विक्रीसाठी उपलब्ध होतील.

ऍप्पल आयफोन 12 प्रो मॅक्स वीडियो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here