ASUS ROG Phone - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:31:45 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Noob पण बनेल Pro! नवीन शक्तिशाली गेमिंग स्मार्टफोन ASUS ROG Phone 6D आणि 6D Ultimate लाँच, पाहा ताकद https://www.91mobiles.com/marathi/16gb-ram-6000mah-battery-mobile-asus-rog-phone-6d-launched-know-price-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/16gb-ram-6000mah-battery-mobile-asus-rog-phone-6d-launched-know-price-specifications-details/#respond Tue, 20 Sep 2022 06:33:10 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13261 तरुणाईमध्ये गेमिंग स्मार्टफोन्सचं वेड वाढलं आहे. PUBG, Freefire सारखे गेम्स खेळण्यासाठी गेमर्स आरओजीच्या गेमिंग स्मार्टफोन्सना पसंती देतात. ROG म्हणजे Republic of Gamers. टेक कंपनी असूसनं आपल्या या सेगमेंटचा विस्तार करत दोन नवीन मोबाइल फोन ASUS ROG Phone 6D आणि ASUS ROG Phone 6D Ultimate लाँच केले आहेत. 16GB RAM, MediaTek Dimensity 9000+ processor, 6000mAh Battery […]

The post Noob पण बनेल Pro! नवीन शक्तिशाली गेमिंग स्मार्टफोन ASUS ROG Phone 6D आणि 6D Ultimate लाँच, पाहा ताकद first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
तरुणाईमध्ये गेमिंग स्मार्टफोन्सचं वेड वाढलं आहे. PUBG, Freefire सारखे गेम्स खेळण्यासाठी गेमर्स आरओजीच्या गेमिंग स्मार्टफोन्सना पसंती देतात. ROG म्हणजे Republic of Gamers. टेक कंपनी असूसनं आपल्या या सेगमेंटचा विस्तार करत दोन नवीन मोबाइल फोन ASUS ROG Phone 6D आणि ASUS ROG Phone 6D Ultimate लाँच केले आहेत. 16GB RAM, MediaTek Dimensity 9000+ processor, 6000mAh Battery आणि AeroActive Portal सारख्या दमदार फीचर्ससह हे स्मार्टफोन आले आहेत.

ASUS ROG Phone 6D Specifications

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता, आसूस आरओजी फोन 6डी आणि 6डी अल्टीमेट 20.4:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह लाँच झाले आहेत जे 2448 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.78 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतात. फोनची स्क्रीन ओएलईडी पॅनलवर बनली आहे तसेच 165हर्ट्ज रिफ्रेश रेट, 720हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट व 800निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करते. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसनं प्रोटेक्ट केला गेला आहे.

16GB RAM 6000mAh Battery Mobile Asus Rog Phone 6d Launched Know Price Specifications Details

ASUS ROG Phone 6D आणि 6D Ultimate अँड्रॉइड 12 आधारित आरओजी जेन युआयवर चालतात. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोन्समध्ये मीडियाटेक डिमेनसिटी 9000+ चिपसेट देण्यात आला आहे तसेच ग्राफिक्ससाठी माली-जी710 एमसी10 जीपीयू आहे. हे मोबाइल फोन LPDDR5x RAM आणि UFS 3.1 storage टेक्नॉलॉजीवर चालतात. हे देखील वाचा: …म्हणून त्याने iPhone 14 Pro खरेदी करण्यासाठी केरळवरून थेट गाठली दुबई

फोटोग्राफीसाठी नवीन आरओजी मोबाइल फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करते आहेत. स्मार्टफोन्समध्ये एफ/1.9 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सोनी आयएमएक्स766 सेन्सर देण्यात आला आहे. सोबत एफ/2.4 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी मोबाइलमध्ये 12 मेगापिक्सल सोनी आयएमएक्स663 सेन्सर देण्यात आला आहे.

16GB RAM 6000mAh Battery Mobile Asus Rog Phone 6d Launched Know Price Specifications Details

ASUS ROG Phone 6D आणि ROG Phone 6D Ultimate मध्ये गेमिंगसाठी एयरट्रिगर 6 अल्ट्रासॉनिक सेन्सर्स तसेच ग्रिप प्रेस डिटेक्शनसह देण्यात आले आहेत. पावर बॅकअपसाठी दोन्ही स्मार्टफोनमध्ये 65वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 6,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हे फोन आयपीएक्स4 रेटिंगसह येतात. हे देखील वाचा: 12,499 रुपयांमध्ये लाँच होईल Vivo Y16; याच आठवड्यात सुरु होईल भारतात विक्री

ASUS ROG Phone 6D Price

ASUS ROG Phone 6D 16 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच याची किंमत 72,500 रुपयांच्या आसपास आहे. तर ASUS ROG Phone 6D Ultimate मध्ये 16 जीबी रॅमसह 512 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे आणि हा 1 लाख रुपयांमध्ये लाँच झाला आहे. या स्मार्टफोनच्या भारतातील लाँचची कोणतीही अधिकृत माहिती कंपनीनं दिली नाही, परंतु या सीरिजचे अन्य स्मार्टफोन भारतात उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे कदाचित भारतातील वाढत्या गेमिंग इंडस्ट्रीचा फायदा घेण्यासाठी कंपनी हे नवीन हँडसेट देखील भारतात आणू शकते.

The post Noob पण बनेल Pro! नवीन शक्तिशाली गेमिंग स्मार्टफोन ASUS ROG Phone 6D आणि 6D Ultimate लाँच, पाहा ताकद first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/16gb-ram-6000mah-battery-mobile-asus-rog-phone-6d-launched-know-price-specifications-details/feed/ 0
बदलेल ‘फ्लॅगशिप’ ची व्याख्या, 16GB रॅम आणि स्नॅपड्रॅगॉन 888 5G चिपसेटसह लाॅन्च होईल ASUS ROG Phone 5 https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-phone-5-listed-on-geekbench-with-16gb-ram-snapdragon-888-soc/ https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-phone-5-listed-on-geekbench-with-16gb-ram-snapdragon-888-soc/#respond Tue, 09 Feb 2021 13:25:36 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9955 ASUS ROG Phone 5 संबंधित इतर लीक्स आणि सर्टिफिकेशन्स पाहता फोन बद्दल सांगण्यात आले आहे कि हा हाई रिफ्रेश रेट असलेल्या ओएलईडी पॅनलसह लाॅन्च होईल ज्यात 6.78 इंचाचा मोठा डिस्प्ले मिळू शकतो.

The post बदलेल ‘फ्लॅगशिप’ ची व्याख्या, 16GB रॅम आणि स्नॅपड्रॅगॉन 888 5G चिपसेटसह लाॅन्च होईल ASUS ROG Phone 5 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
पावरफुल गेमिंग स्मार्टफोन्सचा उल्लेख करायचा झाला तर ASUS ROG Phone चे नाव यादीत सर्वात वर येते. ROG म्हणजे Republic of Gamers हि सीरीज खासकरून त्या मोबाईल युजर्ससाठी डिजाईन केली गेली आहे जी फोन मध्ये हेवी ग्राफिक्स असलेले गेम खेळणे पसंत करतात. मागे बातमी आली होती कि ASUS ROG Phone 3 च्या यशानंतर कंपनी ASUS ROG Phone 5 स्मार्टफोन बाजारात घेऊन येण्याची तयारी करत आहे. आज असूस आरओजी फोन 5 बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर पण लिस्ट झाला आहे.

ASUS ROG Phone 5 चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर ASUS_I005DA मॉडेल नंबरसह लिस्ट केला गेला आहे. हि लिस्टिंग कालची म्हणजे 8 फेब्रुवारीची आहे जिथे फोनच्या स्पेसिफिकेशन्ससंबंधित महत्वाचे डिटेल्स मिळाले आहेत. लिस्टिंग मध्ये फोनच्या मदरबोर्ड सेक्शन मध्ये ‘lahaina’ लिहिण्यात आले आहे. हे कोडनेम क्वाॅलकाॅम स्नॅपड्रॅगॉन 888 चिपसेटचे आहे. स्नॅपड्रॅगॉन 888 चिपसेट क्वाॅलकाॅमने आतापर्यंत सादर केलेल्या सर्व चिपसेट मध्ये सर्वात जास्त ताकदवान आहे आणि हा चिपसेट 5G ला पण सपोर्ट करतो.

गीकबेंच लिस्टिंग नुसार असूस आरओजी फोन 5 स्मार्टफोन 16 जीबी रॅमसह लाॅन्च केला जाईल. पण फोन एकापेक्षा जास्त वेरिएंट्स मध्ये बाजारात येईल आणि 16 जीबी रॅम असलेला सर्वात मोठा वेरिएंट असू शकतो. लिस्टिंग मध्ये ASUS ROG Phone 5 लेटेस्ट अँड्रॉइड 11 ओएससह दाखवण्यात आला आहे ज्यात 1.80गीगाहर्ट्ज बेस स्पीड असलेला आक्टा-कोर प्रोसेसर मिळेल. आरओजी फोन 5 ला सिंगल-कोर मध्ये 1125 आणि मल्टी-कोर मध्ये 3714 बेंचमार्क स्कोर मिळाला आहे.

हे देखील वाचा : Xiaomi ने आणला 108MP कॅमेरा असलेला सर्वात पावरफुल 5G फोन Mi 11, Samsung ची करेल का सुट्टी?

असे असू शकतात स्पेसिफिकेशन्स

ASUS ROG Phone 5 संबंधित इतर लीक्स आणि सर्टिफिकेशन्स पाहता फोन बद्दल सांगण्यात आले आहे कि हा हाई रिफ्रेश रेट असलेल्या ओएलईडी पॅनलसह लाॅन्च होईल ज्यात 6.78 इंचाचा मोठा डिस्प्ले मिळू शकतो. फोनचे डायमेंशन 172.834 x 77.252 x 10.29एमएम असल्याचे सांगण्यात आले आहे. जुन्या लीक मध्ये असूस आरओजी फोन 5 चा 8 जीबी रॅम वेरिएंट पण समोर आला आहे.

ROG Phone 3

असूस आरओजी फोन 5 बद्दल रिपोर्ट समोर आला आहे कि हा फोन फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल ज्यात 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर मिळेल. तसेच पावर बॅकअपसाठी आगामी आरओजी फोन 5 मध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते जी 65वाॅट रॅपिड चार्ज टेक्नॉलॉजीसह येईल. फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्ससाठी कंपनीच्या घोषणेची वाट बघावी लागेल.

The post बदलेल ‘फ्लॅगशिप’ ची व्याख्या, 16GB रॅम आणि स्नॅपड्रॅगॉन 888 5G चिपसेटसह लाॅन्च होईल ASUS ROG Phone 5 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-phone-5-listed-on-geekbench-with-16gb-ram-snapdragon-888-soc/feed/ 0
12 जीबी रॅम आणि 6000एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला पावरफुल Asus ROG Phone 3 https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-phone-3-12gb-128gb-variant-india-launch-price-at-52999-sale-16-october/ https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-phone-3-12gb-128gb-variant-india-launch-price-at-52999-sale-16-october/#respond Tue, 06 Oct 2020 13:17:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8409 Asus ROG Phone 3 चा नवीन वेरिएंट 12 जीबी रॅम मेमरी वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी की इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

The post 12 जीबी रॅम आणि 6000एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला पावरफुल Asus ROG Phone 3 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ASUS ने जुलै मध्ये आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत ASUS ROG Phone 3 स्मार्टफोन भारतात लॉन्च केला होता. खासकरून मोबाईल मध्ये गेम खेळण्याची आवड असलेल्या लोकांसाठी बनवण्यात आलेला हा फोन ROG म्हणजे Republic of Gamers कॅटेगरी अंतर्गत सादर झाला होता जो भारतात दोन वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच आता आपल्या फॅन्सना भेट देत असूसने आरओजी फोन 3 चा अजून एक नवीन रॅम व स्टोरेज वेरिएंट भारतात लॉन्च केला आहे.

Asus ROG Phone 3 चा नवीन वेरिएंट 12 जीबी रॅम मेमरी वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी की इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची किंमत 52,999 रुपये ठेवण्यात आली आहे जो येत्या 16 ऑक्टोबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर विक्रीसाठी उपलब्ध होईल. असूस आरओजी फोन 3 चा आधीच 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 49,999 रुपये तर 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट 57,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Asus ROG Phone 3

असूस आरओजी फोन 3 को 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.59 इंचाच्या एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे जो 144हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 270हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट वर चालतो. हि स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येते जी 2.5डी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 6 ने प्रोटेक्ट केली गेली आहे. ROG Phone 3 च्या बॅक पॅनल वर RGB लाइटिंग आहे जी नोटिफिकेशन्स इत्यादि सह चमकते.

Asus ROG Phone 3 अँड्रॉइड 10 वर लॉन्च केला गेला आहे जो 3.1गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या 64 बिट ऑक्टा-कोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या स्नॅपड्रॅगॉन 865 प्लस चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये एड्रेनो 650जीपीजू देण्यात आला आहे. हेवी गेमिंग करताना फोन गरम होऊ नये म्हणून आरओजी फोन 3 “गेमकूल 3” कूलिंग सिस्टम सह येतो. तसेच फोन मध्ये टच सेंसिटिव अल्ट्रासॉनिक बंपर/शोल्डर बटन एयरट्रिगर सारखे ऍडव्हान्स फीचर्स आहेत.

फोटोग्राफीसाठी Asus ROG Phone 3 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा SONY IMX686 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्यासोबत एफ/2.4 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेंसर आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 24 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी हा फोन 30वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 6,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

आसूस आरओजी फोन 3 वीडियो

The post 12 जीबी रॅम आणि 6000एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला पावरफुल Asus ROG Phone 3 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-phone-3-12gb-128gb-variant-india-launch-price-at-52999-sale-16-october/feed/ 0
12 जीबी आणि स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस चिपसेट सह लॉन्च झाला भारतातील सर्वात पावरफुल गेमिंग फोन ASUS ROG Phone II https://www.91mobiles.com/marathi/gaming-phone-asus-rog-phone-2-launched-in-india-12gb-ram-snapdragon-855-plus-price-sale-specs/ https://www.91mobiles.com/marathi/gaming-phone-asus-rog-phone-2-launched-in-india-12gb-ram-snapdragon-855-plus-price-sale-specs/#respond Mon, 23 Sep 2019 11:59:17 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5386 8 जीबी रॅम वेरिएंट सह 18वॉट चार्जर बॉक्स मध्ये दिला आहे तर फोनच्या 12 जीबी रॅम वेरिएंट सह 30वॉटचा चार्जर बॉक्स मध्ये मिळेल.

The post 12 जीबी आणि स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस चिपसेट सह लॉन्च झाला भारतातील सर्वात पावरफुल गेमिंग फोन ASUS ROG Phone II first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ASUS ने आज भारतात आपला हाईएंड गेमिंग स्मार्टफोन पोर्टफोलियो वाढवत नवीन डिवाईस ROG Phone II लॉन्च केला आहे. ROG म्हणजे Republic of Gamers. ASUS चा हा नवीन डिवाईस पावरफुल स्पेसिफिकेशन्स सह येतो तसेच हा फोन भारतातील पहिला स्मार्टफोन बनला आहे जो क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस वर लॉन्च झाला आहे. कंपनीने हा फोन खासकरून गेमिंगच्या चाहत्यांसाठी सादर केला आहे जो अनेक आर्कषक फीचर्स सह येतो.

किंमत आणि सेल

ASUS ROG Phone II भारतात दोन वेरिएंट्स मध्ये सादर केला गेला आहे. फोनचा एक वेरिएंट 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 12 जीबी दमदार रॅम मेमरी सह 512 जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. कंपनीने 8 जीबी रॅम असलेला वेरिएंट 37,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे तसेच ROG Phone II चा 12 जीबी रॅम वाले वेरिएंट 59,999 रुपयांमध्ये बाजार मध्ये आला आहे. ASUS ROG Phone II चा 8 जीबी रॅम वेरिएंट येत्या 30 सप्टेंबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल. तर 12 जीबी रॅम वेरिएंट साठी तारीख घोषित झालेली नाही.

स्पेसिफिकेशन्स

ASUS ROG Phone II क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस चिपसेट सह येतात. स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस क्वालकॉमचा सर्वात नवीन आणि सर्वात जास्त पावरफुल फोन आहे. हा चिपसेट 4 कोरयो गोल्ड कोर आणि 4 कोरयो सिल्वर कोरने बनला आहे जो जीपीयू प्रोसेसिंग 15 टक्क्यांपर्यंत जास्त बूस्ट करू शकतो. तसेच फोन मध्ये 675मेगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वर काम करणारा एड्रेनो 640 जीपीयू आहे.

या फोन मध्ये 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.6-इंचाचा मोठा फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो जो 120हर्ट्ज रिफ्रेशरेट वर विजुअल देतो. ASUS ROG Phone II डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सह 48 मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 सेंसर देण्यात आला आहे. त्याचबोरोबर 13 मेगापिक्सलचा सेकेंडरी वाइड-अँगल सेंसर आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.2 अपर्चर वाल्या 24 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

ROG Phone II मध्ये पावर बॅकअप साठी ASUS द्वारा 6,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. फोनची बॅटरी 30वॉट ROG HyperCharge ला सपोर्ट करते जी 3A केबलने चार्ज करता येईल. विशेष म्हणजे या फोन बॅटरी क्विक चार्ज 4.0 टेक्नॉलॉजीने पण चार्ज करता येईल. ASUS आपल्या लेटेस्ट ROG Phone II च्या 8 जीबी रॅम वेरिएंट सह 18वॉट चार्जर बॉक्स मध्ये दिला आहे तर फोनच्या 12 जीबी रॅम वेरिएंट सह 30वॉटचा चार्जर बॉक्स मध्ये मिळेल.

The post 12 जीबी आणि स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस चिपसेट सह लॉन्च झाला भारतातील सर्वात पावरफुल गेमिंग फोन ASUS ROG Phone II first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/gaming-phone-asus-rog-phone-2-launched-in-india-12gb-ram-snapdragon-855-plus-price-sale-specs/feed/ 0
12जीबी रॅम, 6000एमएएच बॅटरी आणि स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस सह लॉन्च झाला ASUS ROG Phone 2 https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-phone-2-officially-launched-6000mah-battery-snapdragon-855-plus-120hz-amoled/ https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-phone-2-officially-launched-6000mah-battery-snapdragon-855-plus-120hz-amoled/#respond Tue, 23 Jul 2019 09:50:20 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4872 कंपनीने फोनची किंमत सांगितली नाही पण पावरफुल स्पेसिफिकेशन्स हि ASUS ROG Phone 2 ची सर्वात मोठी यूएसपी आहे.

The post 12जीबी रॅम, 6000एमएएच बॅटरी आणि स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस सह लॉन्च झाला ASUS ROG Phone 2 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ASUS ने आज टेक मंचावर आपल्या फ्लॅगशिप अंतर्गत ROG Phone 2 स्मार्टफोन सादर केला आहे. ROG म्हणजे Republic of Gamers. यावरून स्पष्ट होते कि हा फोन एक गेमिंग स्मार्टफोन म्हणून लॉन्च केला गेला आहे जो हाईएंड स्पेसिफिकेशन्स सह येतो. ASUS द्वारा लॉन्च हा लेटेस्ट डिवाईस आज चीनी बाजारात उतरवण्यात आला आहे जो आगामी काळात ग्लोबल मार्केट मध्ये येईल. कंपनीने फोनची किंमत सांगितली नाही पण पावरफुल स्पेसिफिकेशन्स हि ASUS ROG Phone 2 ची सर्वात मोठी यूएसपी आहे. चला एक नजर टाकू ROG Phone 2 च्या ताकदीवर.

स्नॅपड्रॅगॉन 855+

फोनच्या स्पेसिफिकेशन्सची सुरवात याच्या प्रोसेसर पासून करायची झाल्यास ROG Phone 2 जगातील टॉप स्मार्टफोन्स मध्ये सामील होतो जे क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस चिपसेट सह येतात. स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस क्वालकॉमचा सर्वात नवीन आणि सर्वात जास्त पावरफुल फोन आहे. हा चिपसेट 4 कोरयो गोल्ड कोर आणि 4 कोरयो सिल्वर कोरने बनला आहे जो जीपीयू प्रोसेसिंग 15 टक्क्यांपर्यंत जास्त बूस्ट करू शकतो. तसेच फोन मध्ये 675मेगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वर काम करणारा एड्रेनो 640 जीपीयू आहे.

डिस्प्ले

ASUS ROG Phone 2 मध्ये 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.6-इंचाचा मोठा फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेची पिक्सल डेनसिटी 391पीपीआई आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेशरेट वर विजुअल देतो. त्याचबरोबर ROG Phone 2 चा डिस्प्ले पॅनल 10बिट एचडीआर ला सपोर्ट करतो.

रॅम व स्टोरेज

या पावरफुल गेमिंग फोन मध्ये प्रोसेसिंग अजूनच स्मूद करण्यासाठी कंपनीने ASUS ROG Phone 2 मध्ये 12जीबी चा दमदार रॅम दिला आहे. चीन मध्ये 12जीबी रॅम सोबत हा फोन 256जीबी इंटरनल मेमरी आणि 512जीबी इंटरनल मेमरीच्या दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे.

फोटोग्राफी

ASUS ROG Phone 2 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सह 48-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 13-मेगापिक्सलचा सेकेंडरी वाइड-एंगल सेंसर आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.2 अपर्चर वाल्या 24-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

बॅटरी

ROG Phone 2 मध्ये पावर बॅकअप साठी ASUS द्वारा 6,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. फोनची बॅटरी 30वॉट ROG HyperCharge ला सपोर्ट करते जी 3A केबलने चार्ज करता येईल. विशेष म्हणजे या फोनची बॅटरी क्विक चार्ज 4.0 टेक्नॉलॉजीने पण चार्ज करता येईल.

The post 12जीबी रॅम, 6000एमएएच बॅटरी आणि स्नॅपड्रॅगॉन 855 प्लस सह लॉन्च झाला ASUS ROG Phone 2 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/asus-rog-phone-2-officially-launched-6000mah-battery-snapdragon-855-plus-120hz-amoled/feed/ 0