12,499 रुपयांमध्ये लाँच होईल Vivo Y16; याच आठवड्यात सुरु होईल भारतात विक्री

vivo y16 india launch price 12499 vivo mobile phone

Vivo Y16 India Launch: विवो कंपनी गेल्या काही दिवसांत Vivo Y35 आणि Vivo Y22 भारतात लाँच केले आहेत. विवो वाय35 स्मार्टफोन 18,499 रुपयांमध्ये लाँच झाला आहे, तर विवो वाय22 ची प्राइस 14,499 रुपये आहे. या दोन्ही स्मार्टफोन्सनंतर आता कंपनी भारतात अजून एक वाय सीरीज मोबाइल फोन Vivo Y16 लाँच करणार आहे. 91मोबाइल्सला एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे की विवो वाय16 12,499 रुपये प्राइसवर या आठवड्यात भारतात लाँच होईल.

91मोबाइल्सला सूत्रांच्या हवाल्याने माहिती मिळाली आहे की विवो इंडिया आपल्या ‘वाय’ सीरीज अंतगर्त Vivo Y16 स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. Vivo Y16 Price 12,499 रुपये असेल तसेच हा मोबाइल फोन या आठवड्यात भारतीय बाजारात येईल. याआधी Vivo Y16 स्मार्टफोन जागतिक बाजारात उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे या आठवड्यात विवो वाय16 लाँच केल्यानंतर कंपनी पुढील महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये स्वस्त Vivo Y02 देखील भारतात लाँच करू शकते.

vivo y16 india launch price 12499 vivo mobile phone

Vivo Y16 Price

Vivo Y16 4GB+64GB Price= 12499/-

विवो वाय16 भारतात सध्या सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच केला जाईल ज्यात 4GB RAM + 64GB Storage असेल. 12 हजार बजेटमधील हा विवो स्मार्टफोन Gold आणि Black अशा दोन कलरमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: एकच नंबर! 12 हजारांच्या बजेटमध्ये 8GB रॅमसह Vivo Y32t ची झाली बाजारात एंट्री

vivo y16 india launch price 12499 vivo mobile phone

Vivo Y16 Specifications

  • 6.51 HD+ Display
  • 4GB + 1GB RAM
  • 64GB ROM
  • Helio P35 Processor
  • Back Camera- 13MP + 2MP
  • Front Camera- 5MP
  • Android- 12
  • Color- Gold & Black

विवो वाय16 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 6.51 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह भारतात लाँच होईल. Vivo Y16 अँड्रॉइड 12 आधारित फनटच ओएस 12 वर सादर केला जाईल ज्यात प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेट दिला जाईल.

Vivo Y16 Extended RAM 2.0 टेक्नॉलॉजीसह येईल ज्यात 1जीबी व्हर्च्युअल रॅम जोडता येईल. हा स्मार्टफोन 1टीबी मायक्रोएसडी कार्डला देखील सपोर्ट करेल. या आगामी विवो स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. हे देखील वाचा: 15 हजार रुपयांपेक्षा स्वस्तात आला Vivo चा दमदार 5G Phone; 8GB RAM सह मिळतात तगडे फीचर्स \

vivo y16 india launch price 12499 vivo mobile phone

फोटोग्राफीसाठी Vivo Y16 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा दिला जाईल. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सल सेकंडरी लेन्स असेल. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा विवो मोबाइल 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here