Noob पण बनेल Pro! नवीन शक्तिशाली गेमिंग स्मार्टफोन ASUS ROG Phone 6D आणि 6D Ultimate लाँच, पाहा ताकद

16GB RAM 6000mAh Battery Mobile Asus Rog Phone 6d Launched Know Price Specifications Details

तरुणाईमध्ये गेमिंग स्मार्टफोन्सचं वेड वाढलं आहे. PUBG, Freefire सारखे गेम्स खेळण्यासाठी गेमर्स आरओजीच्या गेमिंग स्मार्टफोन्सना पसंती देतात. ROG म्हणजे Republic of Gamers. टेक कंपनी असूसनं आपल्या या सेगमेंटचा विस्तार करत दोन नवीन मोबाइल फोन ASUS ROG Phone 6D आणि ASUS ROG Phone 6D Ultimate लाँच केले आहेत. 16GB RAM, MediaTek Dimensity 9000+ processor, 6000mAh Battery आणि AeroActive Portal सारख्या दमदार फीचर्ससह हे स्मार्टफोन आले आहेत.

ASUS ROG Phone 6D Specifications

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता, आसूस आरओजी फोन 6डी आणि 6डी अल्टीमेट 20.4:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह लाँच झाले आहेत जे 2448 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.78 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतात. फोनची स्क्रीन ओएलईडी पॅनलवर बनली आहे तसेच 165हर्ट्ज रिफ्रेश रेट, 720हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट व 800निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करते. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसनं प्रोटेक्ट केला गेला आहे.

16GB RAM 6000mAh Battery Mobile Asus Rog Phone 6d Launched Know Price Specifications Details

ASUS ROG Phone 6D आणि 6D Ultimate अँड्रॉइड 12 आधारित आरओजी जेन युआयवर चालतात. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोन्समध्ये मीडियाटेक डिमेनसिटी 9000+ चिपसेट देण्यात आला आहे तसेच ग्राफिक्ससाठी माली-जी710 एमसी10 जीपीयू आहे. हे मोबाइल फोन LPDDR5x RAM आणि UFS 3.1 storage टेक्नॉलॉजीवर चालतात. हे देखील वाचा: …म्हणून त्याने iPhone 14 Pro खरेदी करण्यासाठी केरळवरून थेट गाठली दुबई

फोटोग्राफीसाठी नवीन आरओजी मोबाइल फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करते आहेत. स्मार्टफोन्समध्ये एफ/1.9 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सोनी आयएमएक्स766 सेन्सर देण्यात आला आहे. सोबत एफ/2.4 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी मोबाइलमध्ये 12 मेगापिक्सल सोनी आयएमएक्स663 सेन्सर देण्यात आला आहे.

16GB RAM 6000mAh Battery Mobile Asus Rog Phone 6d Launched Know Price Specifications Details

ASUS ROG Phone 6D आणि ROG Phone 6D Ultimate मध्ये गेमिंगसाठी एयरट्रिगर 6 अल्ट्रासॉनिक सेन्सर्स तसेच ग्रिप प्रेस डिटेक्शनसह देण्यात आले आहेत. पावर बॅकअपसाठी दोन्ही स्मार्टफोनमध्ये 65वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 6,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हे फोन आयपीएक्स4 रेटिंगसह येतात. हे देखील वाचा: 12,499 रुपयांमध्ये लाँच होईल Vivo Y16; याच आठवड्यात सुरु होईल भारतात विक्री

ASUS ROG Phone 6D Price

ASUS ROG Phone 6D 16 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच याची किंमत 72,500 रुपयांच्या आसपास आहे. तर ASUS ROG Phone 6D Ultimate मध्ये 16 जीबी रॅमसह 512 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे आणि हा 1 लाख रुपयांमध्ये लाँच झाला आहे. या स्मार्टफोनच्या भारतातील लाँचची कोणतीही अधिकृत माहिती कंपनीनं दिली नाही, परंतु या सीरिजचे अन्य स्मार्टफोन भारतात उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे कदाचित भारतातील वाढत्या गेमिंग इंडस्ट्रीचा फायदा घेण्यासाठी कंपनी हे नवीन हँडसेट देखील भारतात आणू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here