Battery - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 30 Jan 2023 12:42:21 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Smartphone Battery Saving Tips: चार्ज केल्यावर 1-2 तासांत उतरते फोनची बॅटरी; अशी वाढवा बॅटरी लाइफ https://www.91mobiles.com/marathi/smartphone-battery-saving-tips/ https://www.91mobiles.com/marathi/smartphone-battery-saving-tips/#respond Mon, 30 Jan 2023 12:42:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17349 Smartphone Battery Saving Tips: स्मार्टफोनच्या बॅटरी लाइफची काळजी नेहमीच युजर्सना सतावत असते. कोणत्याही फोनची बॅटरी लाइफ अनेक गोष्टींवर अवलंबून असते जसे की बॅकग्राउंडमधील अ‍ॅप्सची संख्या, वापर करण्याची पद्धत आणि फोनची सेटिंग. अनेकदा अशी वेळ येते जेव्हा चार्जिंगसाठी वीज नसते आणि बॅटरी वेगानं उतरत असते. अशा वेळी तुम्ही पुढील पद्धतींचा अवलंब करून तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लाइफ […]

The post Smartphone Battery Saving Tips: चार्ज केल्यावर 1-2 तासांत उतरते फोनची बॅटरी; अशी वाढवा बॅटरी लाइफ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • स्मार्टफोनची सेटिंग्स अ‍ॅडजस्ट करून बॅटरी लाइफ वाढवता येईल.
  • स्मार्टफोनच्या बॅकग्राउंडमधील अ‍ॅप्स बंद करून बॅटरी लाइफ वाढवता येते.
  • स्क्रीनची ब्राइटनेस कमी करून बॅटरी लाइफ वाढवता येते.

Smartphone Battery Saving Tips: स्मार्टफोनच्या बॅटरी लाइफची काळजी नेहमीच युजर्सना सतावत असते. कोणत्याही फोनची बॅटरी लाइफ अनेक गोष्टींवर अवलंबून असते जसे की बॅकग्राउंडमधील अ‍ॅप्सची संख्या, वापर करण्याची पद्धत आणि फोनची सेटिंग. अनेकदा अशी वेळ येते जेव्हा चार्जिंगसाठी वीज नसते आणि बॅटरी वेगानं उतरत असते. अशा वेळी तुम्ही पुढील पद्धतींचा अवलंब करून तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवू शकता.

Smartphone Battery Saving Tips

  • स्क्रीन ब्राइटनेस कमी करा
  • स्क्रीन टर्न ऑफ टाइम कमी करा
  • ब्राइटनेस लेव्हल ऑटोमॅटिकवर सेट करा
  • वायब्रेशन बंद करा
  • जास्त बॅटरी वापरणारे अ‍ॅप्स बंद करा
  • पावर सेविंग मोड वापरा
  • सिंक सेटिंग्स अ‍ॅडजस्ट करा
  • ब्लॅक किंवा डार्क थीम वापरा.

स्क्रीन ब्राइटनेस कमी करा

बऱ्याचदा फोनचा डिस्प्ले सर्वाधिक बॅटरी वापरतो. हे वेगानं बॅटरी संपण्याचं सर्वात मोठं कारण असू शकतं. स्क्रीनची ब्राइटनेस कमी करून बॅटरीची खपत खूप कमी करता येईल आणि तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढू शकते. हे देखील वाचा: दुकानात जाऊन जुना फोन एक्सचेंज करण्याऐवजी ‘या’ वेबसाइटवर विका; मिळेल बेस्ट किंमत

स्क्रीन बंद होण्याची वेळ कमी करा

स्मार्टफोन युजर्सना ऑटोमॅटिक स्क्रीन बंद करण्यासाठी टाइम इंटरवेल सेट करू देतो. हा वेळ नेहमी कमी ठेवावा. ही वेळ कमी केल्यास तुमचीच बॅटरी लाइफ वाढेल कारण बॅटरी लाइफ वाचवण्यासाठी वापरात नसताना डिस्प्ले लगेच बंद होईल.

ब्राइटनेस ऑटोमॅटिकवर सेट करा

सध्या सर्व स्मार्टफोन अँबियट लाइट सेन्सरसह येतात, जो स्क्रीन ब्राइटनेस आजूबाजूच्या लाइटनुसार ऑटोमॅटिक स्मार्टफोनची ब्राइटनेस कमी-जास्त करतो. त्यामुळे बॅटरी लाइफ वाढते. हा सेन्सर इंडोर वापरत असताना फोनची ब्राइटनेस कमी करतो देतो आणि बाहेर गरजेनुसार वाढवतो.

वायब्रेशन बंद करा

रिंगटोनच्या तुलनेत वायब्रेशन जास्त पावर वापरतो. त्यामुळे बॅटरी लाइफ वाढवण्यासाठी तुम्ही वायब्रेशन बंद करू शकता.

जास्त बॅटरी खाणारे अ‍ॅप्स बंद करा

बॅकग्राउंड अ‍ॅप्स मोठ्या प्रमाणावर सिस्टम रिसोर्सचा वापर करता, त्यामुळे बॅटरी लवकर संपते. त्यामुळे जास्त बॅटरीचा वापर करणारे अ‍ॅप्स बंद करावे. असे केल्यास तुमच्या फोनची बॅटरी लाइफ वाढेल. फोनच्या सेटिंगमध्ये बॅटरी ऑप्शनमधून तुम्ही त्या अ‍ॅप्सची माहिती घेऊ शकता जे जास्त बॅटरी वापरत आहेत.

पावर सेविंग मोड वापरा

सध्या सर्व स्मार्टफोनमध्ये पावर सेविंग मोड दिला जातो. जो बॅकग्राउंड सर्व्हिस करून, स्क्रीन ब्राइटनेस कमी करून आणि CPU परफॉर्मेंस कमी करून फोनची बॅटरी लाइफ वाढवतो.

अ‍ॅप्स बंद करा

स्मार्टफोनची बॅटरी संपवण्याचे काम अनावश्यक अ‍ॅप्स करतात. त्यामुळे फोनची पावर वाचवण्यासाठी असे अ‍ॅप्स बंद केले पाहिजेत.

सिंक सेटिंग्स अ‍ॅडजस्ट करा

ईमेल आणि सोशल मीडिया अपडेटवरील डेटा सिंक जास्त बॅटरी खातात. त्यामुळे तुम्हाला फोनची सिंक सेटिंग्स कमी वेळा किंवा फक्त वाय-फायशी कनेक्ट झाल्यावर ऑन होईल अशी सेट करावी. हे देखील वाचा: Mobile Network Issue: खराब नेटवर्क कनेक्टिव्हिटी किंवा कमी इंटरनेट स्पीड असा करा ठीक, जाणून घ्या सोपा उपाय

ब्लॅक किंवा डार्क थीम वापर करा

डार्क मोड किंवा ब्लॅक थीम OLED स्क्रीनमध्ये डिस्प्ले ब्लॅक कलर पिक्सेल बंद करते. त्यामुळे स्क्रीन कमी पावर वापरते आणि बॅटरी लाइफ वाढते. म्हणून शक्य असेल तेव्हा ब्लॅक किंवा डार्क थीमचा वापर करावा.

The post Smartphone Battery Saving Tips: चार्ज केल्यावर 1-2 तासांत उतरते फोनची बॅटरी; अशी वाढवा बॅटरी लाइफ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/smartphone-battery-saving-tips/feed/ 0
अरे वा! फणसाच्या मदतीने चार्ज करता येईल तुमचा स्मार्टफोन, जाणून घ्या हि टेक्नीक https://www.91mobiles.com/marathi/smartphone-batteries-charged-jackfruit-technology-mobile-phone/ https://www.91mobiles.com/marathi/smartphone-batteries-charged-jackfruit-technology-mobile-phone/#respond Mon, 09 Mar 2020 13:22:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6747 फणस आणि डूरियन हि फळे वीज साठवू शकतात आणि याचा वापर छोटे इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट चार्ज करण्यासाठी केला जाऊ शकतो

The post अरे वा! फणसाच्या मदतीने चार्ज करता येईल तुमचा स्मार्टफोन, जाणून घ्या हि टेक्नीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आता पर्यंत आपण आपला फोन चार्ज करण्यासाठी मोबाईल फोनचा चार्जर पावर प्लगशी कनेक्ट करून चार्ज करत होतो. पण तुम्हाला माहिती आहे का तुम्ही तुमचा फोन फणसाच्या मदतीने पण चार्ज करू शकता. हे वाचायला थोडे विचित्र वाटेल कि फळाच्या मदतीने फोन कसा चार्ज केला जाऊ शकतो. काही दिवसांपूर्वी बटाट्याने फोन चार्ज होत असल्याची बातमी ऑनलाइन प्रकाशित झाली होती. तसेच हि टेक्नीक यूट्यूब वर अनेक वीडियोच्या माध्यमातून दाखवण्यात आली होती. आता संशोधकांनी एका अश्या पद्धतीचा शोध घेतला आहे ज्यामुळे उरलेल्या फळांच्या तुकड्यांच्या मदतीने फोन चार्ज करता येईल.

फळ आणि भाज्यांपासून बनणाऱ्या सुपर-कपॅसिटरच्या मदतीने वीज साठवता येते. या विजेचा वापर करून एखाद्या प्रोडक्टची छोटी बॅटरी चार्ज केली जाऊ शकते. या विजेच्या मदतीने इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट उदा. मोबाईल फोन, टॅबलेट आणि लॅपटॉप चार्ज केले जाऊ शकतात.

यूनिवर्सिटी ऑफ सिडनीच्या संशोधकानेचे हे सांशोधन जर्नल ऑफ एनर्जी स्टोरेज मध्ये प्रकाशित झाले आहे. या संशोधनातून समोर आले आहे कि फणस आणि डूरियन हि फळे वीज साठवू शकतात आणि याचा वापर छोटे इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट चार्ज करण्यासाठी केला जाऊ शकतो. या रिसर्च मध्ये सांगण्यात आले आहे कि फळ आणि भाज्या सुपर कपॅसिटर म्हणून वापरता येतील.

ऑस्ट्रेलियाच्या एका यूनिवर्सिटी रिपोर्ट मध्ये समोर आले आहे कि स्कूल ऑफ केमिकल अँड बायोमोलेक्युलर इंजीनियरिंगचे अकॅडेमिक एसोसिएट प्रोफेसर विंसेंट गोम्स यांनी फणसला सुपर-कपॅसिटर मध्ये रूपांतरित करण्यात यश मिळवले आहे. त्यांच्या मते सुपर-कपॅसिटर ऊर्जा धारणांसारखी असते जी हळुवारपणे बाहेर पडते. या ऊर्जाच्या मदतीने छोटे इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट चार्ज केले जाऊ शकतात.

The post अरे वा! फणसाच्या मदतीने चार्ज करता येईल तुमचा स्मार्टफोन, जाणून घ्या हि टेक्नीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/smartphone-batteries-charged-jackfruit-technology-mobile-phone/feed/ 0
आली नवीन टेक्नोलॉजी, आता पाच दिवस चालेल स्मार्टफोनची बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/australia-first-to-test-new-lithium-batteries-phone-get-five-day-battery-backup/ https://www.91mobiles.com/marathi/australia-first-to-test-new-lithium-batteries-phone-get-five-day-battery-backup/#respond Tue, 07 Jan 2020 16:00:10 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6221 बोलले जात आहे कि या बॅटरीच्या मदतीने फोन पाच दिवस चालेल.

The post आली नवीन टेक्नोलॉजी, आता पाच दिवस चालेल स्मार्टफोनची बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन मध्ये बॅटरीच्या बाबतीती आजही अनेक ग्राहक त्रासलेले असतात. डिवाइस वारंवार चार्ज करण्याची समस्या काही अंशी कमी झाली आहे. पण नवीन टेक्नोलॉजी वर काम करत असलेल्या उभा समस्येवर उत्तर शोधत आहेत. आता एका रिसर्चने एक नवीन टेक्नॉलजी डेवेलप केली आहे जिच्या मदतीने स्मार्टफोन बॅटरी सलग पाच दिवस संपणार नाही.

या टेक्नॉलजीचा वापर स्मार्टफोन्सच्या ऐवजी इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये केला जाईल. कारची बॅटरी चार्ज केल्याविना 1,000 किलोमीटर पेक्षा जास्त चालवता येईल. नवीन बॅटरी सॉल्यूशन मध्ये ट्रडिशनल लिथियम-आयन कॉम्बिनेशनच्या जागी नवीन कॉम्बिनेशन यूजर्सना दिला जाईल. आतापर्यंत लिथियम-आयन बॅटरीज स्मार्टवॉच, स्मार्टफोन आणि पेसमेकरला पावर देण्यासाठी वापरल्या जात होत्या. बोलले जात आहे कि या बॅटरीच्या मदतीने फोन पाच दिवस चालेल.

आता रिसर्चर्सनी अल्ट्रा-हाई कॅपॅसिटी मिळवण्यासाठी लिथियम-सल्फर कॉम्बिनेशनचा वापर केला आहे, ज्याचा परिणाम वेगळा आहे. हा प्रयोग ऑस्ट्रेलियाच्या मोनाश यूनिवर्सिटीच्या संशोधकांनी केला आहे. रिसर्चर्स म्हणतात कि त्यांच्या टीमने सल्फर कॅथोड्सची डिजाइन रि-कन्फिगर करून हे बॅटरी कॉम्बिनेशन वापरले आहे.

रिसर्च टीमच्या मते या बॅटरी टेक्नॉलजीचे ट्रायल यावर्षी कार्स आणि ग्रिड्स मध्ये केले जात आहेत, ज्यामुळे ऑस्ट्रेलिया मध्ये इलेक्ट्रिक कार मार्केटला पण फायदा मिळू शकतो. हि बॅटरी लवकरच स्मार्टफोन्स मध्ये पण वापरली जाऊ शकते. पण याची जास्त माहिती समोर आली नाही.

The post आली नवीन टेक्नोलॉजी, आता पाच दिवस चालेल स्मार्टफोनची बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/australia-first-to-test-new-lithium-batteries-phone-get-five-day-battery-backup/feed/ 0