Smartphone Battery Saving Tips: चार्ज केल्यावर 1-2 तासांत उतरते फोनची बॅटरी; अशी वाढवा बॅटरी लाइफ

Highlights

 • स्मार्टफोनची सेटिंग्स अ‍ॅडजस्ट करून बॅटरी लाइफ वाढवता येईल.
 • स्मार्टफोनच्या बॅकग्राउंडमधील अ‍ॅप्स बंद करून बॅटरी लाइफ वाढवता येते.
 • स्क्रीनची ब्राइटनेस कमी करून बॅटरी लाइफ वाढवता येते.

Smartphone Battery Saving Tips: स्मार्टफोनच्या बॅटरी लाइफची काळजी नेहमीच युजर्सना सतावत असते. कोणत्याही फोनची बॅटरी लाइफ अनेक गोष्टींवर अवलंबून असते जसे की बॅकग्राउंडमधील अ‍ॅप्सची संख्या, वापर करण्याची पद्धत आणि फोनची सेटिंग. अनेकदा अशी वेळ येते जेव्हा चार्जिंगसाठी वीज नसते आणि बॅटरी वेगानं उतरत असते. अशा वेळी तुम्ही पुढील पद्धतींचा अवलंब करून तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढवू शकता.

Smartphone Battery Saving Tips

 • स्क्रीन ब्राइटनेस कमी करा
 • स्क्रीन टर्न ऑफ टाइम कमी करा
 • ब्राइटनेस लेव्हल ऑटोमॅटिकवर सेट करा
 • वायब्रेशन बंद करा
 • जास्त बॅटरी वापरणारे अ‍ॅप्स बंद करा
 • पावर सेविंग मोड वापरा
 • सिंक सेटिंग्स अ‍ॅडजस्ट करा
 • ब्लॅक किंवा डार्क थीम वापरा.

स्क्रीन ब्राइटनेस कमी करा

बऱ्याचदा फोनचा डिस्प्ले सर्वाधिक बॅटरी वापरतो. हे वेगानं बॅटरी संपण्याचं सर्वात मोठं कारण असू शकतं. स्क्रीनची ब्राइटनेस कमी करून बॅटरीची खपत खूप कमी करता येईल आणि तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लाइफ वाढू शकते. हे देखील वाचा: दुकानात जाऊन जुना फोन एक्सचेंज करण्याऐवजी ‘या’ वेबसाइटवर विका; मिळेल बेस्ट किंमत

स्क्रीन बंद होण्याची वेळ कमी करा

स्मार्टफोन युजर्सना ऑटोमॅटिक स्क्रीन बंद करण्यासाठी टाइम इंटरवेल सेट करू देतो. हा वेळ नेहमी कमी ठेवावा. ही वेळ कमी केल्यास तुमचीच बॅटरी लाइफ वाढेल कारण बॅटरी लाइफ वाचवण्यासाठी वापरात नसताना डिस्प्ले लगेच बंद होईल.

ब्राइटनेस ऑटोमॅटिकवर सेट करा

सध्या सर्व स्मार्टफोन अँबियट लाइट सेन्सरसह येतात, जो स्क्रीन ब्राइटनेस आजूबाजूच्या लाइटनुसार ऑटोमॅटिक स्मार्टफोनची ब्राइटनेस कमी-जास्त करतो. त्यामुळे बॅटरी लाइफ वाढते. हा सेन्सर इंडोर वापरत असताना फोनची ब्राइटनेस कमी करतो देतो आणि बाहेर गरजेनुसार वाढवतो.

वायब्रेशन बंद करा

रिंगटोनच्या तुलनेत वायब्रेशन जास्त पावर वापरतो. त्यामुळे बॅटरी लाइफ वाढवण्यासाठी तुम्ही वायब्रेशन बंद करू शकता.

जास्त बॅटरी खाणारे अ‍ॅप्स बंद करा

बॅकग्राउंड अ‍ॅप्स मोठ्या प्रमाणावर सिस्टम रिसोर्सचा वापर करता, त्यामुळे बॅटरी लवकर संपते. त्यामुळे जास्त बॅटरीचा वापर करणारे अ‍ॅप्स बंद करावे. असे केल्यास तुमच्या फोनची बॅटरी लाइफ वाढेल. फोनच्या सेटिंगमध्ये बॅटरी ऑप्शनमधून तुम्ही त्या अ‍ॅप्सची माहिती घेऊ शकता जे जास्त बॅटरी वापरत आहेत.

पावर सेविंग मोड वापरा

सध्या सर्व स्मार्टफोनमध्ये पावर सेविंग मोड दिला जातो. जो बॅकग्राउंड सर्व्हिस करून, स्क्रीन ब्राइटनेस कमी करून आणि CPU परफॉर्मेंस कमी करून फोनची बॅटरी लाइफ वाढवतो.

अ‍ॅप्स बंद करा

स्मार्टफोनची बॅटरी संपवण्याचे काम अनावश्यक अ‍ॅप्स करतात. त्यामुळे फोनची पावर वाचवण्यासाठी असे अ‍ॅप्स बंद केले पाहिजेत.

सिंक सेटिंग्स अ‍ॅडजस्ट करा

ईमेल आणि सोशल मीडिया अपडेटवरील डेटा सिंक जास्त बॅटरी खातात. त्यामुळे तुम्हाला फोनची सिंक सेटिंग्स कमी वेळा किंवा फक्त वाय-फायशी कनेक्ट झाल्यावर ऑन होईल अशी सेट करावी. हे देखील वाचा: Mobile Network Issue: खराब नेटवर्क कनेक्टिव्हिटी किंवा कमी इंटरनेट स्पीड असा करा ठीक, जाणून घ्या सोपा उपाय

ब्लॅक किंवा डार्क थीम वापर करा

डार्क मोड किंवा ब्लॅक थीम OLED स्क्रीनमध्ये डिस्प्ले ब्लॅक कलर पिक्सेल बंद करते. त्यामुळे स्क्रीन कमी पावर वापरते आणि बॅटरी लाइफ वाढते. म्हणून शक्य असेल तेव्हा ब्लॅक किंवा डार्क थीमचा वापर करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here