Mobile Network Issue: खराब नेटवर्क कनेक्टिव्हिटी किंवा कमी इंटरनेट स्पीड असा करा ठीक, जाणून घ्या सोपा उपाय

Highlights

  • मोबाइल फोनमध्ये नेटवर्क नसणे किंवा इंटरनेट नीट न चालणे रोजचंच झालं आहे.
  • घरातील इलेक्ट्रॉनिक डिवाइसेसमुळे नेटवर्कचा प्रॉब्लम होऊ शकतो.
  • बऱ्याचदा फोनच्या सेटिंगमुळे देखील नेटवर्कमध्ये प्रॉब्लम येतो.

Mobile Network Issue: स्मार्टफोन आपल्या इतका आयुष्याचा महत्वाचा भाग बनला आहे की आपण मोबाइल फोनविना एक दिवस घालवण्याची कल्पना देखील करू शकत नाही. त्यामुळे मोबाइल फोनमध्ये नेटवर्क नसल्यास किंवा इंटरनेट नखरे करत असल्यास होणाऱ्या त्रासाचा अंदाज तुम्ही लावू शकता. यासाठी आज आम्ही तुम्हाला फोनमधील नेटवर्कमध्ये येणाऱ्या समस्यांची माहिती देणार आहोत. तसेच त्यावरील सोपे उपाय देखील सांगणार आहोत.

नेटवर्क कनेक्टिव्हिटीची समस्या

नेटवर्क कनेक्टिव्हिटीमध्ये समस्या आल्यामुळे फोन कॉल किंवा इंटरनेट स्पीड चांगला न मिळणं रोजचंच झालं आहे. देशातील सर्वच स्मार्टफोन युजर्सना कधी ना कधी तरी या समस्येचा सामना करावा लागतो. नेटवर्क कनेक्टिव्हिटीच्या समस्येला आपल्या घरातील इलेक्ट्रोड-मॅग्नेटिक इंडक्शन किंवा स्मार्टफोनची सेटिंग देखील कारणीभूत असू शकते.

इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन डिवाइसेस

जर तुमच्या घरात नेटवर्क कनेक्टिव्हिटीची समस्या असेल तर सर्वप्रथम हे पाहा की प्रॉब्लम फक्त तुमच्या फोनमध्ये आहे का. तसे नसेल तर फोन वापरताना तुम्ही तुमच्या घरातील इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन डिवाइसेस जसे की – इंडक्शन कूकर, इलेक्ट्रिक जेनरेटर शक्य असल्यास बंद करून ठेऊ शकता. तुमच्या घराच्या जवळपास ट्रान्सफॉमर असेल तर देखील मोबाइल नेटवर्कची समस्या भेडसावू शकते.

स्मार्टफोनची सेटिंग

बऱ्याचदा फोनमधील चुकीच्या सेटिंगमुळे आपलं नेटवर्क नीट काम करत नाही. पुढे आम्ही स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये बदल करून फोनमधील नेटवर्कची समस्या कशी दूर करायची याची स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे. हे देखील वाचा: Aadhaar आणि Voter ID असं करा ऑनलाइन लिंक, जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत

अँड्रॉइड युजर्स

अँड्रॉइड स्मार्टफोन युजर्सना सर्वप्रथम फोनमधील सेटिंग मेन्यू ओपन करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला Wi-Fi अँड नेटवर्कवर टॅप करावं लागेल. मग सिम अँड नेटवर्कवर क्लिक करा आणि सिम सिलेक्ट करून नेटवर्क ऑपरेटर ऑटोमॅटिक करा.

आयओएस युजर्स

आयओएस युजर्सना सेटिंग मेन्यूनंतर मोबाइल अँड सिम ऑप्शनवर टॅप करावं लागेल. त्यानंतर सिम सेटिंगमध्ये जा इथे तुम्हाला नेटवर्क सेटिंगची निवड करून आणि ऑटोमॅटिक ऑप्शनवर टॅप करावं लागेल.

फोनच्या सेटिंग्समध्ये बदल करून देखील जर तुमचं नेटवर्क नीट झालं नसेल तर तुम्हाला तुमच्या टेलीकॉम ऑपरेटरशी संपर्क साधावा लागेल. हे देखील वाचा: पॅन कार्ड नाही? मग फक्त काही मिनिटांत डाउनलोड करा e-PAN Card, जाणून घ्या पद्धत

इंटरनेट संबंधी समस्या

एखादी वेबसाइट किंवा अ‍ॅप ओपन करताना समस्या येत असेल तर त्या वेबसाइट किंवा अ‍ॅपचं सर्व्हर डाउन असण्याची शक्यता जास्त आहे. जर समस्या सर्व अ‍ॅप्स आणि वेबसाइट अ‍ॅक्सेस केल्यावर कायम असेल तर एकदा तुमच्या फोनचं इंटरनेट कनेक्शन बंद करा किंवा फोनचा फ्लाइट मोड ऑन-ऑफ करून नेटवर्कची समस्या जातेय का पाहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here