आली नवीन टेक्नोलॉजी, आता पाच दिवस चालेल स्मार्टफोनची बॅटरी

स्मार्टफोन मध्ये बॅटरीच्या बाबतीती आजही अनेक ग्राहक त्रासलेले असतात. डिवाइस वारंवार चार्ज करण्याची समस्या काही अंशी कमी झाली आहे. पण नवीन टेक्नोलॉजी वर काम करत असलेल्या उभा समस्येवर उत्तर शोधत आहेत. आता एका रिसर्चने एक नवीन टेक्नॉलजी डेवेलप केली आहे जिच्या मदतीने स्मार्टफोन बॅटरी सलग पाच दिवस संपणार नाही.

या टेक्नॉलजीचा वापर स्मार्टफोन्सच्या ऐवजी इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये केला जाईल. कारची बॅटरी चार्ज केल्याविना 1,000 किलोमीटर पेक्षा जास्त चालवता येईल. नवीन बॅटरी सॉल्यूशन मध्ये ट्रडिशनल लिथियम-आयन कॉम्बिनेशनच्या जागी नवीन कॉम्बिनेशन यूजर्सना दिला जाईल. आतापर्यंत लिथियम-आयन बॅटरीज स्मार्टवॉच, स्मार्टफोन आणि पेसमेकरला पावर देण्यासाठी वापरल्या जात होत्या. बोलले जात आहे कि या बॅटरीच्या मदतीने फोन पाच दिवस चालेल.

आता रिसर्चर्सनी अल्ट्रा-हाई कॅपॅसिटी मिळवण्यासाठी लिथियम-सल्फर कॉम्बिनेशनचा वापर केला आहे, ज्याचा परिणाम वेगळा आहे. हा प्रयोग ऑस्ट्रेलियाच्या मोनाश यूनिवर्सिटीच्या संशोधकांनी केला आहे. रिसर्चर्स म्हणतात कि त्यांच्या टीमने सल्फर कॅथोड्सची डिजाइन रि-कन्फिगर करून हे बॅटरी कॉम्बिनेशन वापरले आहे.

रिसर्च टीमच्या मते या बॅटरी टेक्नॉलजीचे ट्रायल यावर्षी कार्स आणि ग्रिड्स मध्ये केले जात आहेत, ज्यामुळे ऑस्ट्रेलिया मध्ये इलेक्ट्रिक कार मार्केटला पण फायदा मिळू शकतो. हि बॅटरी लवकरच स्मार्टफोन्स मध्ये पण वापरली जाऊ शकते. पण याची जास्त माहिती समोर आली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here