Corona Virus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 02 Apr 2020 13:48:23 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung मोफत देईल क्वॉरन्टीन मधील लोकांना स्मार्टफोन आणि शाळेत वाटेल टॅबलेट डिवाईस https://www.91mobiles.com/marathi/samsung-donates-free-smartphones-to-quarantined-coronavirus-patients-tablet-device/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-donates-free-smartphones-to-quarantined-coronavirus-patients-tablet-device/#respond Thu, 02 Apr 2020 13:48:23 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6983 Samsung शिक्षण संस्थांमध्ये मोफत टॅबलेट पण देणार आहे ज्याच्या मदतीने घर बसल्या विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल.

The post Samsung मोफत देईल क्वॉरन्टीन मधील लोकांना स्मार्टफोन आणि शाळेत वाटेल टॅबलेट डिवाईस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
COVID-19 म्हणजे कोरोना वायरसचा दंश सध्या संपूर्ण जग झेलत आहे. चीन मध्ये सुरु झालेल्या या महामारीने संपूर्ण जगासहित भारताला पण आपल्या विळख्यात घेतले आहे. Coronavirus चा सामना करण्याचे सरकार तर प्रयत्न करत आहे त्याचबरोबर इतर लोक पण आपले योगदान देत आहेत. टेक विश्वाबाबत बोलायचे झाले तर Xiaomi, OPPO, Vivo, Realme आणि Infinix व Tecno सारखे ब्रँडस पण आपापल्या परीने कोरोनामुळे होणारे नुकसान कमी करण्यास मदत करत आहेत. आता Samsung संबंधित बातमी येत आहे कि या कंपनीने दोन पाऊले पुढे जात quarantine मधील लोकांना मोफत स्मार्टफोन आणि एयर प्यूरिफायर वाटण्याची घोषणा केली आहे.

सॅमसंगने स्टेटमेंटच्या माध्यमातून सांगितले आहे कि कंपनी कोरोनाशी लढा देत असलेल्या लोकांची मदत करण्यासाठी स्मार्टफोन, टॅबलेट आणि एयर प्यूरीफायर मोफत वाटेल. सीनेटच्या रिपोर्टनुसार Samsung ने घोषणा केली आहे कि कंपनी आपल्या होम मार्केट मध्ये क्वॉरन्टीन मधील लोकांना मोफत स्मार्टफोन देईल. सॅमसंगचा प्रयत्न असा आहे कि मोबाईल फोन दिल्यामुळे घरापासून लांब असलेल्या लोकांना आपल्या परिवाराशी संपर्क साधता येईल आणि यामुळे त्यांचे स्वास्थ्य सुधारेल.

त्याचबरोबर Samsung शिक्षण संस्थांमध्ये मोफत टॅबलेट पण देणार आहे ज्याच्या मदतीने घर बसल्या विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि सॅमसंगने क्वॉरन्टीन सेंटर आणि हॉस्पिटल्स मध्ये पण ब्रँडचे एयर प्यूरीफायर आणि इतर ऍक्सेसरीज देत आहे. विशेष म्हणजे सॅमसंग 29 मिलियन डॉलरची मदत करत आहे जिच्या माध्यमातून फेस मास्क, हँड सॅनिटायजर आणि इतर गोष्टी उपलब्ध केल्या जात आहेत ज्या कोरोना विरोधातील युद्धात मदत करतील.

भारतात वाढला इंटरनेटचा वापर

रिपोर्ट मध्ये समोर आले आहे कि Coronavirus मुळे देशात झालेल्या लॉकडाउन नंतर देशात इंटरनेटच्या वापरात वेगाने वाढ झाली आहे. रिपोर्टनुसार या काळात भारतात इंटरनेटचा वापर 30 टक्क्यांनी वाढला आहे. फक्त इतकेच नव्हे तर इंटरनेटचा वापर आधीच्या तुलनेत जास्त झाला आहे तर दुसरीकडे हा वापरामुळे इंटरनेटच्या स्पीड मध्ये पण 20 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

स्पीड अजून झाला कमी

रिपोर्टनुसार ISPAI म्हणजे इंटरनेट सर्विसेज प्रोवाइडर्स एसोसिएशन ऑफ इंडियाने सांगितले आहे कि गेल्या आठवड्यात भारतात झालेल्या लॉकडाउन नंतर देशात इंटरनेटच्या वापरात वाढ झाली आहे. इंटरनेटचा वापर जास्त झाल्यामुले स्पेक्ट्रम वर भार पडला आहे आणि इंटरनेट स्पीड घटला आहे. सध्या हि घसरण 20 टक्क्यांची आहे पण अजून दोन आठवडे सुरु राहणाऱ्या लॉकडाउन मध्ये इंटरनेटचा स्पीड अजून कमी होईल. रिपोर्ट नुसार इंटरनेट स्पीड 25 ते 30 टक्क्यांनी अजून कमी होऊ शकतो. विश्लेषकांच्या मते सरासरी इंटरनेट स्पीड 9Mbps ते 10Mbps पर्यंत राहण्याची शक्यता आहे.

70 टक्क्यांनी वाढला आहे वापर

लॉकडाउन नंतर अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्याना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश दिले आहेत. घरातून ऑफिसचे काम करताना सर्वांना इंटरनेटचा वापर जास्त करावा लागत आहे. देशात इंटरनेटचा वापर सरासरी 30 टक्क्यांनी वाढला आहे. मागील काही दिवसांत वर्क फ्रॉम होममुळे इंटरनेट यूजर्सची संख्या तीन पटीने वाढली आहे. रिपोर्ट नुसार लॉकडाउन सुरु झाल्यावर बेंगळुरू आणि हैदराबाद सारख्या शहरांत इंटरनेट डेटाचा वापर 70 टक्क्यांनी वाढला आहे.

The post Samsung मोफत देईल क्वॉरन्टीन मधील लोकांना स्मार्टफोन आणि शाळेत वाटेल टॅबलेट डिवाईस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-donates-free-smartphones-to-quarantined-coronavirus-patients-tablet-device/feed/ 0
BSNL आणि Vodafone-Idea ने बदलले आपले नाव, जाणून घ्या संपूर्ण माहिती https://www.91mobiles.com/marathi/bsnl-and-vodafone-idea-have-changed-their-operator-name-awareness-for-coronavirus/ https://www.91mobiles.com/marathi/bsnl-and-vodafone-idea-have-changed-their-operator-name-awareness-for-coronavirus/#respond Thu, 02 Apr 2020 11:59:10 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6973 बीएसएनएल यूजर्सना मोबाईल स्क्रीन वर BSNL Mobile च्या जागी आता ‘BSNL Stay at Home’ दिसत आहे.

The post BSNL आणि Vodafone-Idea ने बदलले आपले नाव, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL आणि प्राइवेट कंपनी Vodafone Idea ने आपल्या नेटवर्क ऑपरेटर नावात बदल केला आहे. हे ऐकून तुम्हाला पण हैराणी होत असेल कि कंपन्यांनी असे का केले असेल. यामागील कारण असे कि जगभरात पसरलेल्या कोरोना सारख्या महामारी बाबत यूजर्सना जागरूक करण्यासाठी कंपन्यांनी आपल्या नेटवर्कच्या नावात बदल केला आहे.

सध्या Covid-19 मुळे चिंताग्रस्त दिसत आहेत. हेच लक्षात घेऊन टेलिकॉम कंपन्या आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. काहींना काही कारण शोधून त्या यूजर्सना घरात थांबण्यासाठी लोकांना जगरुक करत आहेत. कोरोना वायरस संक्रमण रोखण्यासाठी कोणताही उपाय सापडेलला नाही आणि फक्त सोशल डिस्टेंसिंगच्या माध्यमातून या रोगाला मात दिली जाऊ शकते.

नेटवर्कची नवीन नावे

कोरोना वायरस बाबत लोकांना जागरुक करण्यासाठी बीएसएनएल यूजर्सना मोबाईल स्क्रीन वर BSNL Mobile च्या जागी आता ‘BSNL Stay at Home’ दिसत आहे. तर दुसरीकडे वोडाफोन नेटवर्कचे नाव फोनच्या स्क्रीन वर ‘Vodafone-Be Safe’ असे दिसत आहे.

वाढवली वैधता

इतकेच नव्हे तर दोन्ही कंपन्यांनी इतर टेलीकॉम कंपन्यांप्रमाणे एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. लॉकडाउन च्या काळात कोणत्याही यूजरला रिचार्ज करावा लागू नये यासाठी कंपन्यांनी यूजर्सच्या प्रीपेड प्लानची वैधता वाढवली आहे. बीएसएनएलने आपल्या प्रीपेड प्लान्सची वैधता 20 एप्रिल 2020 पर्यंत वाढवली आहे. त्याचबरोबर कंपनी सर्व सब्सक्राइबर्सना 10 रुपयांचा टॉक टाइम पण देत आहे. तर दुसरीकडे वोडाफोन-आइडियाने आपल्या प्रीपेड प्लानची वैधता 17 एप्रिल पर्यंत वाढवली आहे आणि फ्री टॉक टाइम दिला जात आहे.

चीनच्या वुहान मध्ये नोव्हेंबर 2019 पासून कोरोना संक्रमणाची सुरवात झाली होती. आज या वायरसच्या विळख्यात चीन समवेत संपूर्ण जग आले आहे. हा खतरनाक वायरस पाहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी संपूर्ण भारतात 21 दिवसांच्या बंदाची घोषणा केली आहे. म्हणजे 14 एप्रिल पर्यंत संपूर्ण देश लॉकडाउन असेल.

The post BSNL आणि Vodafone-Idea ने बदलले आपले नाव, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bsnl-and-vodafone-idea-have-changed-their-operator-name-awareness-for-coronavirus/feed/ 0
Vodafone Idea यूजर्सना मिळाली भेट, प्रीपेड प्लानची वॅलिडिटी वाढली https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-announces-validity-extension-and-rs-10-balance-for-low-income-users-corona-virus-impact/ https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-announces-validity-extension-and-rs-10-balance-for-low-income-users-corona-virus-impact/#respond Wed, 01 Apr 2020 12:46:19 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6962 कंपनीने फीचर्स फोन्सचा वापर करणाऱ्या कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांसाठी प्रीपेड प्लानची वॅलिडिटी 17 एप्रिल पर्यंतसाठी वाढवली आहे.

The post Vodafone Idea यूजर्सना मिळाली भेट, प्रीपेड प्लानची वॅलिडिटी वाढली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतीय टेलीकॉम कंपनी Vodafone Idea ने पण कोरोनोचा प्रभाव पाहून आपल्या प्रीपेड यूजर्सची वॅलिडिटी वाढवण्याची घोषणा केली आहे. वोडाफोन आइडियाच्या आधी BSNL, Jio आणि Airtel ने अशीच घोषणा केली आहे. वोडाफोन आइडियाच्या मते ते कमी इनकम असलेल्या यूजर्ससाठी आपल्या प्लानची वैधता वाढवत आहेत.

कंपनीने फीचर्स फोन्सचा वापर करणाऱ्या कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांसाठी प्रीपेड प्लानची वॅलिडिटी 17 एप्रिल पर्यंतसाठी वाढवली आहे. तसेच अश्या ग्राहकांना 10 रुपयांचा टॉकटाइम पण दिला जाईल.

या घोषणेच्या मागे कंपनीचा उद्देश कोरोना वायरसमुळे चालू असलेल्या लॉकडाउन मध्ये कमी उतपणे असलेल्या ग्राहकांना कॉल करताना कोणतीही अडचण येऊ न देणे हा आहे. याआधी टेलिकॉम कंपनी भारती एयरटेलने सोमवारी घोषणा केली होती कि कंपनी आपल्या 8 कोटी प्रीपेड ग्राहकांची वॅलिडिटी 17 एप्रिल पर्यंत वाढवत आहे. त्याचबरोबर या ग्राहकांना 10 रुपयांचा टॉकटाइम पण देण्यात आला आहे. तसेच जियोफोनच्या ग्राहकांना 17 एप्रिल 2020 पर्यंत कॉलिंगसाठी 100 मिनिट्स आणि 100 SMS फ्री मिळतील.

सरकारी टेलिकॉम कंपन्या BSNL आणि MTNL ने पण आपल्या प्रीपेड मोबाईल सेवेची वॅलिडिटी वाढवण्याची घोषणा केली होती. पण सरकारी टेलीकॉम कंपन्या 20 एप्रिल पर्यंतसाठी BSNL आणि MTNL यूजर्सच्या नंबरची वैधता वाढवत आहेत. सोबतच ग्राहकांना 10 रुपयांचा अतिरिक्त टॉकटाइम दिला जात आहे.

चीनच्या वुहान मध्ये नोव्हेंबर 2019 पासून कोरोना संक्रमणाची सुरवात झाली होती. आज या वायरसच्या विळख्यात चीन समवेत संपूर्ण जग आले आहे. हा खतरनाक वायरस पाहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी संपूर्ण भारतात 21 दिवसांच्या बंदाची घोषणा केली आहे. म्हणजे 14 एप्रिल पर्यंत संपूर्ण देश लॉकडाउन असेल.

The post Vodafone Idea यूजर्सना मिळाली भेट, प्रीपेड प्लानची वॅलिडिटी वाढली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-announces-validity-extension-and-rs-10-balance-for-low-income-users-corona-virus-impact/feed/ 0
Jio फ्री मध्ये तुमच्या नंबर वर देत आहे 498 रुपयांचा रिचार्ज, जाणून घ्या यामागील सत्य https://www.91mobiles.com/marathi/jio-498-free-pack-fake-message-being-circulated-on-whatsapp-dont-click-link/ https://www.91mobiles.com/marathi/jio-498-free-pack-fake-message-being-circulated-on-whatsapp-dont-click-link/#respond Thu, 26 Mar 2020 17:29:52 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6915 हि एक फिशिंग लिंक असू शकते जी उघडण्याआधी तपासली पाहिजे.

The post Jio फ्री मध्ये तुमच्या नंबर वर देत आहे 498 रुपयांचा रिचार्ज, जाणून घ्या यामागील सत्य first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कोरोना वायरससारख्या महामारीच्या वेळी व्हाट्सऍप वर एक मेसेज वायरल होत आहे, ज्यात दावा केला जात आहे कि Reilance Jio कडून 498 रुपयांचा रिचार्ज फ्री मध्ये दिला जात आहे. या मेसेज सोबतच एक लिंक पण पाठवली जात आहे, जिच्या बाबत दावा केला जात आहे कि या लिंक वर क्लिक करून यूजर्स 498 रुपयांचा रिचार्ज फ्री मिळवू शकतात.

काय आहे मेसेज मध्ये

व्हाट्सऍप आणि सोशल मीडिया वर जियोच्या नावाने जो मेसेज वायरल होत आहे त्या मेसेज मध्ये लिहिण्यात आले आहे, ‘Jio या संकटाच्या काळात देत आहे आहे सर्व इंडियन यूजर्सना 498 रुपयांचा फ्री रिचार्ज, त्यासाठी आताच खालील लिंक वर क्लिक करून तुमचा फ्री रीचार्ज मिळवा …https:jionewoffer.online.. लक्षात असू दे: हि ऑफर फक्त 31 March पर्यंत आहे!’

मेसेज मागील सत्य

जियोच्या फ्री रिचार्ज बाबत या मेसेज मध्ये एक लिंक आहे, जी ओपन केल्यावर तुमच्याकडून काही माहिती मागितली जाईल. जर तुम्ही लक्ष दिले तर या साईटचे डोमेन नॉर्मल वेबसाइट पेक्षा थोडे वेगळे आहे. त्यावरून स्पष्ट होते कि या मेसेज द्वारे कोणतरी तुमचा फोन हॅक करण्याचा प्रयत्न करत आहे.

हॅकर्स पासून सावधान

अशाप्रकारेच्या मेसेजचा वापर हॅकर्स लोकांचे फोन किंवा लॅपटॉप हॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत. या लिंकच्या मदतीने सामान्य माणसांची खाजगी माहिती चोरणे खूप सोप्पे आहे. जर तुमच्याकडे पण जियो ऑफरच्या नावाने असा मेसेज आला असेल तर चुकूनही त्यावर क्लिक करू नका आणि हा मेसेज कोणालाही फॉरवर्ड पण करू नका.

फेक मेसेज कसा ओळखायचा

-माहिती विश्वासू ठिकाणाहून आलेय का ते बघा.

-अधिकृत वेबसाइट वर जाऊन माहिती घ्या.

-मेसेज तपासल्याशिवाय त्यातील लिंक वर क्लिक करू नका.

-ULRs https: // चा अर्थ असा आहे कि साइट एन्क्रिप्टेड आहे, पण सुरक्षित असेल असे नाही. Https://jionewoffer.online याचे एक प्रमुख उदाहरण आहे. हि एक फिशिंग लिंक असू शकते जी उघडण्याआधी तपासली पाहिजे.

-अज्ञात नंबर वरून आलेल्या ईमेल आणि एसएमएस च्या URL लिंक वर क्लिक करू नये.

The post Jio फ्री मध्ये तुमच्या नंबर वर देत आहे 498 रुपयांचा रिचार्ज, जाणून घ्या यामागील सत्य first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-498-free-pack-fake-message-being-circulated-on-whatsapp-dont-click-link/feed/ 0
लॉकडाउन मध्ये मित्रांसोबत ऑनलाइन खेळा हे बेस्ट गेम्स https://www.91mobiles.com/marathi/games-you-should-play-while-youre-in-home-lockdown-coronavirus-fight/ https://www.91mobiles.com/marathi/games-you-should-play-while-youre-in-home-lockdown-coronavirus-fight/#respond Thu, 26 Mar 2020 13:36:58 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6908 आज आम्ही तुम्हाला त्या गेम्स बाबत माहिती देणार आहोत, ज्यात मल्टीप्लेयरचा ऑप्शन असतो आणि हे ऑनलाइन तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पण खेळू शकता.

The post लॉकडाउन मध्ये मित्रांसोबत ऑनलाइन खेळा हे बेस्ट गेम्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कोरोनामुळे जगभरात सर्व व्यवहार स्थगित करण्यात आले आहेत. तसेच 14 एप्रिल पर्यंत संपूर्ण भारत लॉकडाउन करण्यात आला आहे. या लॉकडाउन मध्ये वेळ घालवण्यासाठी लोक वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत. आम्ही लॉकडाउनच्या काळात तुमचा वेळ चांगला जावा यासाठी काही अश्या मोबाईल गेम्स बाबत सांगणार आहोत, जे तुम्हाला वेळ घालवण्यास मदत करतील.

आज आम्ही तुम्हाला त्या गेम्स बाबत माहिती देणार आहोत, ज्यात मल्टीप्लेयरचा ऑप्शन असतो आणि हे ऑनलाइन तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पण खेळू शकता. प्ले स्टोर वर असे अनेक गेम्स आहेत, यातील बेस्ट गेम्स शोधून आम्ही तुमच्यासाठी 5 स्मार्टफोन गेम्सची यादी घेऊन आलो आहोत.

पबजी

सर्वात आधी बोलूया प्लेयर अननोन्स बॅटलग्राउंड म्हणजे PUBG बाबत. हे नाव कदाचित सर्वांना माहित असेल. हा गेम लॉन्च झाल्यापासून आतापर्यंत याची नशा तरुणांच्या डोक्यातून उतरली नाही. हा गेम तुम्ही तुमच्या मित्रांसोबत खेळू शकता. यात चार लोकांचा ग्रुप असतो. तसेच तुम्ही या ऑनलाइन गेम मध्ये बोलू पण शकता. शानदार ग्राफिक्स सह हा गेम येतो.

लूडो किंग

हा तुमच्या बालपणातील आवडता खेळ लूडोचा ऑनलाइन वर्जन आहे. या गेमचे नाव लूडो किंग आहे, जो तुम्ही आणि तुमचे तीन मित्र मिळून खेळू शकता. इतकेच नव्हे तर हा गेम कमी रोम व रॅम स्मार्टफोन असलेल्या फोन्स मध्ये पण सह खेळता येतो. इतकेच नव्हे तर या गेम मधेच साप शिडी खेळण्याचा ऑप्शन पण आहे.

कॉल ऑफ ड्यूटी मोबाईल

PUBG ची लोकप्रियता पाहून काही दिवसांपूर्वी हा गेम मोबाईलसाठी सादर केला गेला होता. या गेम मध्ये 5vs5 मोड पण मिळतो, जो प्लेयर्सना सर्वात जास्त आवडतो. वेगवेगळे मॅप्स आणि लोकेशंस वर पाच प्लेयर्सची टीम दुसऱ्या टीम विरुद्ध खेळते.

अस्फाल्ट 9

अस्फाल्ट 9 एक पॉप्यूलेर रेसिंग गेम आहे. जर तुम्ही रेसिंग गेमचे चाहते असाल तर हा गेम तुम्हाला खूप आवडेल या गेम तुम्ही लो-ग्राफिक्स पासून हाई-ग्राफिक्स सह पण खेळू शकतात. गेम मध्ये रेसिंग ट्रॅक्स पण निवडता येतात.

रूल्स ऑफ सर्वाइवल

Rules of Survival एक फ्री मल्टीप्लयेर ऑनलाइन बॅटल रॉयल गेम आहे. हा गेम मोठ्या प्रमाणात पबजी सारखा आहे. या गेम मध्ये पण तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत एक ग्रुप बनवून दुसऱ्या ग्रुप्सना हरवायचे असते. यात पण PUBG प्रमाणे तुम्हाला शेवटपर्यंत जिवंत राहायचे असते.

The post लॉकडाउन मध्ये मित्रांसोबत ऑनलाइन खेळा हे बेस्ट गेम्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/games-you-should-play-while-youre-in-home-lockdown-coronavirus-fight/feed/ 0
Jio Fiber यूजर्सना मिळेल दुप्पट डेटा, जाणून घ्या कशाप्रकारे मिळेल फायदा https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-fiber-plan-inr-351-monthly-rs-199-weekly-10mbps-speed-internet-data-benefits/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-fiber-plan-inr-351-monthly-rs-199-weekly-10mbps-speed-internet-data-benefits/#respond Tue, 24 Mar 2020 12:34:24 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6873 जियो कोणत्याही सर्विस चार्ज विना बेसिक JioFiber कनेक्टिविटी देणार आहे, ज्यात 10Mbps च्या स्पीड सह जियोची हि सर्विस फ्री असेल.

The post Jio Fiber यूजर्सना मिळेल दुप्पट डेटा, जाणून घ्या कशाप्रकारे मिळेल फायदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Reliance Jio ने अलीकडेच कोरोना वायरसमुळे वर्क फ्रॉम होम करत असलेल्या यूजर्ससाठी एक नवीन 251 रुपये असलेला प्लान सादर केला होता. मोबाईल यूजर्स नंतर आता कंपनीने ब्रॉडबँड यूजर्ससाठी एक मोठी घोषणा केली आहे. जियो कोणत्याही सर्विस चार्ज विना बेसिक JioFiber कनेक्टिविटी देणार आहे, ज्यात 10Mbps च्या स्पीड सह जियोची हि सर्विस फ्री असेल.

जियो त्या सर्व ठिकाणी हि ब्रॉडबँड सर्विस देईल जिथे भौगोलिकदृष्टया शक्य असेल. तसेच जियोफाइबरच्या जुन्या ग्राहकांना सर्व प्लान्स मध्ये आता डबल डेटा मिळेल. जियोने हे पाऊल वर्क फ्रॉम होम मध्ये अडचण येऊ नये म्हणून उचलले आहे.

राउटरचे पॅसे द्यावे लागतील

जियो यूजर्ससाठी बेसिक फाइबर कनेक्टिविटी फ्री असेल. पण यूजर्सना फक्त राउटरसाठी पॅसे दयावे लागतील. इतकेच नव्हे तर जियोच्या बेसिक प्लान मध्ये कोणतीही फेयर यूजेज पॉलिसी (FUP) नसेल, ज्याचा अर्थ असा आहे कि यूजर्स चांगल्या स्पीड वर इंटरनेट वापरू शकेल . जियोफाइबरच्या मंथली प्लानची सुरवात 699 रुपयांपासून होते.

याव्यतिरिक्त कंपनीने अलीकडेच 251 रुपयांचा ‘Work From Home Pack’ सादर केला होता. जियोच्या ‘Work From Home Pack’ बद्दल बोलायचे तर या प्लानची किंमत 251 रुपये आहे आणि हा पॅक फक्त प्रीपेड ग्राहकांसाठी सादर केला गेला आहे. या पॅक मध्ये ग्राहकांना 2 जीबी डेटा रोज मिळेल. तसेच 2 जीबी डेटा लिमिट संपल्यावर इंटरनेट स्पीड 64 kbps होईल. या पॅकची वॅलिडिटी 51 दिवस आहे.

त्याचबरोबर रिलायंस जियो ने घोषणा केली आहे कि ते आपल्या 4G डेटा ऍड-ऑन वाउचर्स वर दुप्पट डेटा देतील. कंपनीने 11 रुपये, 21 रुपये, 51 रुपये आणि 101 रुपयांचे डेटा वाउचर अपग्रेड केले होते. या लिस्ट मध्ये येणाऱ्या 251 रुपयांच्या वाउचर मध्ये कोणताही बदल केला गेला नाही. या वाउचर मध्ये जुनेच फायदे मिळतील.

रिलायंस जियोच्या 11 रुपयांच्या डेटा वाउचर मध्ये आधी 400MB डेटा मिळत होता. पण बदलानंतर या प्लान मध्ये 800MB डेटा सह 75 मिनिट्स जियो ते नॉन जियो कॉलिंग मिनिट्स मिळत आहे. तर 21 रुपयांच्या डेटा वाउचर मध्ये आधी कंपनी 1 GB डेटा देत होती. पण आता 2 GB डेटा दिला जात आहे. तसेच प्लान मध्ये नॉन जियो नेटवर्क वर 200 कॉलिंग मिनिट्स मिळत आहेत.

51 रुपयांच्या डेटा वाउचर मध्ये आधी कंपनी 3GB डेटा देत होती. पण आता या वाउचर मध्ये 6 GB डेटा मिळत आहे. तसेच वाउचर मध्ये जियो टू नॉन जियो नेटवर्क वर कॉलिंगसाठी 500 मिनिट्स मिळत आहेत. 101 रुपयांच्या डेटा प्लान मध्ये कंपनी आधी 6 GB डेटा ऑफर करत होती, आता कंपनी यात 12 GB डेटा ऑफर करत आहे. त्याचबरोबर नॉन जियो नंबर्स वर कॉलिंगसाठी 1000 मिनिट्स मिळत आहेत.

The post Jio Fiber यूजर्सना मिळेल दुप्पट डेटा, जाणून घ्या कशाप्रकारे मिळेल फायदा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-fiber-plan-inr-351-monthly-rs-199-weekly-10mbps-speed-internet-data-benefits/feed/ 0
Corona मुळे सुधारेल इंटरनेटची परिस्थिती अजून वाढेल स्पीड, जाणून घ्या अधिक माहिती https://www.91mobiles.com/marathi/corona-covid-19-better-internet-speed-for-work-from-home-act-free-300mbps-speed-data-kerala-cm-pinarayi-vijayan/ https://www.91mobiles.com/marathi/corona-covid-19-better-internet-speed-for-work-from-home-act-free-300mbps-speed-data-kerala-cm-pinarayi-vijayan/#respond Thu, 12 Mar 2020 13:09:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6773 COVID-19 म्हणजे कोरोनाच्या उपायावर संशोधन चालू आहे. हा वायरस प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे लोकांच्या आयुष्यावर प्रभाव टाकत आहे.

The post Corona मुळे सुधारेल इंटरनेटची परिस्थिती अजून वाढेल स्पीड, जाणून घ्या अधिक माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीन मधून सुरु झालेल्या एका संकटाने आज संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. Corona वायरसचा प्रकोप जगात पसरला आहे आणि भारत पण यातून वाचू शकला नाही. देशात कोरोनाच्या संशयित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. सरकार लोकांना सुरक्षित राहण्याचे दिशानिर्देश देत आहे. तर सामान्य लोक पण या घातक वायरस पासून वाचण्याचा प्रयत्न करत आहेत. COVID-19 म्हणजे कोरोनाच्या उपायावर संशोधन चालू आहे. हा वायरस प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे लोकांच्या आयुष्यावर प्रभाव टाकत आहे. आता एक अशीच बातमी समोर येत आहे ज्यातून समजले आहे कि कोरोना वायरसमुळे देशातील इंटरनेटची स्थिती सुधारणार आहे.

केरळच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांना त्यांच्या विभागातील इंटरनेट व्यवस्था मजबूत करण्याचा आदेश दिला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे लोक आपल्या घरातून बाहेर कमी निघत आहेत आणि लोक Work from home म्हणजे आपल्या घरातून ऑफिसचे काम करत आहेत. त्यामुळे इंटरनेटचा वापर जास्त होत आहे आणि जास्त वापरामुळे इंटरनेट मॉडम वर पण अतिरिक्त बोझ पडत आहे. हे हातळण्यासाठी इंटरनेट दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले कि इंटरनेट सर्विस प्रोवाइडर्सना आपल्या नेटवर्कचा बॅंडविड्थ वाढवावा लागेल तसेच ब्रॉडबॅंड इंटरनेटच्या रेंज मध्ये पण वाढ करावी लागेल. तसेच इंटरनेट देणाऱ्या कंपन्यांना पण आपली सर्विस आधीपेक्षा वेगवान करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे केरळच्या सीएम व्यतिरिक्त इंटरनेट ब्रॉडबॅंड सर्विस कंपनी एसीटी पण आपल्या ग्राहकांना Corona मुळे अतिरिक्त बेनिफिट देत आहे.

एसीटी ब्रॉडबॅंडने आपल्या यूजर्सना 300Mbps च्या स्पीड वर इंटरनेट देण्याची घोषणा केली आहे. म्हणजे या कंपनीचे ग्राहक आता 300एमबीपीएस च्या स्पीड वर इंटरनेट देऊ शकतील आणि तसेच त्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क पण द्यावे लागणार नाही. त्याचबोरबर हि कंपनी आपल्या ग्राहकांना अनलिमिटेड एफयूपी कॉलिंगची सुविधा पण देत आहे. एसीटी सध्या 31 मार्च पर्यंत हि सुविधा देत आहे जी पुढे वाढवली जाऊ शकते.

The post Corona मुळे सुधारेल इंटरनेटची परिस्थिती अजून वाढेल स्पीड, जाणून घ्या अधिक माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/corona-covid-19-better-internet-speed-for-work-from-home-act-free-300mbps-speed-data-kerala-cm-pinarayi-vijayan/feed/ 0