Corona मुळे सुधारेल इंटरनेटची परिस्थिती अजून वाढेल स्पीड, जाणून घ्या अधिक माहिती

चीन मधून सुरु झालेल्या एका संकटाने आज संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. Corona वायरसचा प्रकोप जगात पसरला आहे आणि भारत पण यातून वाचू शकला नाही. देशात कोरोनाच्या संशयित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. सरकार लोकांना सुरक्षित राहण्याचे दिशानिर्देश देत आहे. तर सामान्य लोक पण या घातक वायरस पासून वाचण्याचा प्रयत्न करत आहेत. COVID-19 म्हणजे कोरोनाच्या उपायावर संशोधन चालू आहे. हा वायरस प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे लोकांच्या आयुष्यावर प्रभाव टाकत आहे. आता एक अशीच बातमी समोर येत आहे ज्यातून समजले आहे कि कोरोना वायरसमुळे देशातील इंटरनेटची स्थिती सुधारणार आहे.

केरळच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांना त्यांच्या विभागातील इंटरनेट व्यवस्था मजबूत करण्याचा आदेश दिला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे लोक आपल्या घरातून बाहेर कमी निघत आहेत आणि लोक Work from home म्हणजे आपल्या घरातून ऑफिसचे काम करत आहेत. त्यामुळे इंटरनेटचा वापर जास्त होत आहे आणि जास्त वापरामुळे इंटरनेट मॉडम वर पण अतिरिक्त बोझ पडत आहे. हे हातळण्यासाठी इंटरनेट दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले कि इंटरनेट सर्विस प्रोवाइडर्सना आपल्या नेटवर्कचा बॅंडविड्थ वाढवावा लागेल तसेच ब्रॉडबॅंड इंटरनेटच्या रेंज मध्ये पण वाढ करावी लागेल. तसेच इंटरनेट देणाऱ्या कंपन्यांना पण आपली सर्विस आधीपेक्षा वेगवान करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे केरळच्या सीएम व्यतिरिक्त इंटरनेट ब्रॉडबॅंड सर्विस कंपनी एसीटी पण आपल्या ग्राहकांना Corona मुळे अतिरिक्त बेनिफिट देत आहे.

एसीटी ब्रॉडबॅंडने आपल्या यूजर्सना 300Mbps च्या स्पीड वर इंटरनेट देण्याची घोषणा केली आहे. म्हणजे या कंपनीचे ग्राहक आता 300एमबीपीएस च्या स्पीड वर इंटरनेट देऊ शकतील आणि तसेच त्यांना कोणतेही अतिरिक्त शुल्क पण द्यावे लागणार नाही. त्याचबोरबर हि कंपनी आपल्या ग्राहकांना अनलिमिटेड एफयूपी कॉलिंगची सुविधा पण देत आहे. एसीटी सध्या 31 मार्च पर्यंत हि सुविधा देत आहे जी पुढे वाढवली जाऊ शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here