Jio फ्री मध्ये तुमच्या नंबर वर देत आहे 498 रुपयांचा रिचार्ज, जाणून घ्या यामागील सत्य

कोरोना वायरससारख्या महामारीच्या वेळी व्हाट्सऍप वर एक मेसेज वायरल होत आहे, ज्यात दावा केला जात आहे कि Reilance Jio कडून 498 रुपयांचा रिचार्ज फ्री मध्ये दिला जात आहे. या मेसेज सोबतच एक लिंक पण पाठवली जात आहे, जिच्या बाबत दावा केला जात आहे कि या लिंक वर क्लिक करून यूजर्स 498 रुपयांचा रिचार्ज फ्री मिळवू शकतात.

काय आहे मेसेज मध्ये

व्हाट्सऍप आणि सोशल मीडिया वर जियोच्या नावाने जो मेसेज वायरल होत आहे त्या मेसेज मध्ये लिहिण्यात आले आहे, ‘Jio या संकटाच्या काळात देत आहे आहे सर्व इंडियन यूजर्सना 498 रुपयांचा फ्री रिचार्ज, त्यासाठी आताच खालील लिंक वर क्लिक करून तुमचा फ्री रीचार्ज मिळवा …https:jionewoffer.online.. लक्षात असू दे: हि ऑफर फक्त 31 March पर्यंत आहे!’

मेसेज मागील सत्य

जियोच्या फ्री रिचार्ज बाबत या मेसेज मध्ये एक लिंक आहे, जी ओपन केल्यावर तुमच्याकडून काही माहिती मागितली जाईल. जर तुम्ही लक्ष दिले तर या साईटचे डोमेन नॉर्मल वेबसाइट पेक्षा थोडे वेगळे आहे. त्यावरून स्पष्ट होते कि या मेसेज द्वारे कोणतरी तुमचा फोन हॅक करण्याचा प्रयत्न करत आहे.

हॅकर्स पासून सावधान

अशाप्रकारेच्या मेसेजचा वापर हॅकर्स लोकांचे फोन किंवा लॅपटॉप हॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत. या लिंकच्या मदतीने सामान्य माणसांची खाजगी माहिती चोरणे खूप सोप्पे आहे. जर तुमच्याकडे पण जियो ऑफरच्या नावाने असा मेसेज आला असेल तर चुकूनही त्यावर क्लिक करू नका आणि हा मेसेज कोणालाही फॉरवर्ड पण करू नका.

फेक मेसेज कसा ओळखायचा

-माहिती विश्वासू ठिकाणाहून आलेय का ते बघा.

-अधिकृत वेबसाइट वर जाऊन माहिती घ्या.

-मेसेज तपासल्याशिवाय त्यातील लिंक वर क्लिक करू नका.

-ULRs https: // चा अर्थ असा आहे कि साइट एन्क्रिप्टेड आहे, पण सुरक्षित असेल असे नाही. Https://jionewoffer.online याचे एक प्रमुख उदाहरण आहे. हि एक फिशिंग लिंक असू शकते जी उघडण्याआधी तपासली पाहिजे.

-अज्ञात नंबर वरून आलेल्या ईमेल आणि एसएमएस च्या URL लिंक वर क्लिक करू नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here