Data Security - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 31 Mar 2023 12:22:17 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 ऑनलाईन फसवणूक आणि Cyber Crime ची तक्रार पोलीस स्टेशनला न जात कशी करायची? जाणून घ्या https://www.91mobiles.com/marathi/how-to-file-online-complaint-for-cyber-crime-in-india-know-process-step-by-step/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-file-online-complaint-for-cyber-crime-in-india-know-process-step-by-step/#respond Sun, 02 Apr 2023 03:30:23 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12403 भारतात इंटरनेटचा वापर वेगानं वाढत आहे. स्वस्त डेटा आणि स्मार्टफोन्समुळे सर्व सामान्य जनता ऑनलाईन येऊ लागली आहे. फक्त सोशल मीडिया आणि करमणूक नव्हे तर बँकेचे व्यवहार आणि पैसे व महत्वाच्या कागदपत्रांची देवाण घेवाण देखील ऑनलाईन होऊ लागली आहे. परंतु ऑनलाइन या ऑनलाईन विश्वात सायबर गुन्हे आणि फ्रॉड्सची संख्या देखील वाढत आहे. Facebook-Instagram सारख्या सोशल मीडिया […]

The post ऑनलाईन फसवणूक आणि Cyber Crime ची तक्रार पोलीस स्टेशनला न जात कशी करायची? जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतात इंटरनेटचा वापर वेगानं वाढत आहे. स्वस्त डेटा आणि स्मार्टफोन्समुळे सर्व सामान्य जनता ऑनलाईन येऊ लागली आहे. फक्त सोशल मीडिया आणि करमणूक नव्हे तर बँकेचे व्यवहार आणि पैसे व महत्वाच्या कागदपत्रांची देवाण घेवाण देखील ऑनलाईन होऊ लागली आहे. परंतु ऑनलाइन या ऑनलाईन विश्वात सायबर गुन्हे आणि फ्रॉड्सची संख्या देखील वाढत आहे. Facebook-Instagram सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपासून डिजिटल पेमेंट व ऑनलाईन शॉपिंग इत्यादी बाबतीत Cyber Crime च्या घटना समोर येत आहेत.

काही मिनिटांच्या फोन कॉल आणि एखादं अ‍ॅप मोबाइलमध्ये डाउनलोड केल्यानं लोकांच्या बँक अकाऊंटमधून पैसे चोरले जात आहेत. मध्यमवर्गीय कुटुंब आणि भोळे लोक अशा सायबर गुन्ह्यांना जास्त बळी पडतात. आज आम्ही आमच्या वाचकांना सायबर गुन्ह्याला बळी पडल्यावर त्याची तक्रार ऑनलाईन कशी करायची, याची माहिती देणार आहोत. हे देखील वाचा: तुमचा Xiaomi फोन बनावट तर नाही ना? फसवणूक होण्याआधी अशी करून घ्या खात्री

Cyber Crime ची ऑनलाइन तक्रार कशी करायची

1. सर्वप्रथम राष्ट्रीय सायबर गुन्हे रिपोर्टिंग पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाइटवर जा, यासाठी cybercrime.gov.in वर क्लिक करा.

2. इथे पोर्टल संबंधित माहिती सोबतच युजरला विचारले जाईल की त्यांच्याद्वारे दिलेली सर्व माहिती योग्य आहे. ते मान्य करून पुढे जा.

3. इथे Report Cyber Crime Related to Women/Child आणि Report Other Cyber Crime चे दोन ऑप्शन आहेत. तुम्हाला जी तक्रार कार्याची आहे त्यावर क्लिक करा.

4. फसवणूक, फिशिंग, हॅकिंग व फ्रॉड सारख्या घटना ‘अदर सायबर क्राइम’ अंतगर्त येतात. त्यावर क्लिक केल्यावर मोबाइल नंबरसह अन्य माहिती द्यावी लागेल.

5. तर दुसरीकडे ‘सायबर क्राइम रिलेटेड टू विमेन/चिल्ड्रेन’ मध्ये पॉर्नोग्राफी, ऑनलाइन बुलिंग आणि Sexually Explicit कंटेंटचा समावेश आहे, ज्यांची तक्रार या सेग्मेंट अंतगर्त नोंदवता येईल.

6. इथे Report Anonymously आणि Report And Track दोन ऑप्शन देण्यात आले आहेत. ज्यात तुमची तुमची ओळख लपवून देखील सायबर क्राइमची तक्रार करता येते. गरजेनुसार युजर्स एका ऑप्शनची निवड करू शकतात. हे देखील वाचा: गोगल गायीच्या स्पिडनं चालू आहे का Jio चं इंटरनेट? ‘ही’ सेटिंग बदलताच मिळेल रॉकेट स्पीड

7. क्राइम कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर आरोपीचं नाव, जागा आणि पूर्वे मागितले जातील. सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर नंतर तक्रार सबमिट करा.

8. सायबर क्राइम रिपोर्ट केल्यानंतर एका यूनिक नंबरच्या स्वरूपात कम्प्लेंट आयडी दिला जाईल. या नंबरच्या माध्यमातून नंतर तुमची तक्रार ट्रॅक करता येईल.

अशी करा तक्रार ट्रॅक

9. तक्रार नोंदवल्यानंतर तिचं स्टेटस चेक करण्यासाठी आणि ट्रॅक करण्यासाठी सर्वप्रथम पोर्टलवर लॉग-इन करावं लागेल. त्यानंतर Report And Track बटनवर क्लिक करा.

10. इथे आधीचा कम्प्लेंट आयडी मागितला जाईल जो रिकाम्या जागी भरावा लागेल, त्यामुळे राष्ट्रीय सायबर गुन्हे रिपोर्टिंग पोर्टलद्वारे करण्यात आलेल्या कारवाईची माहिती समोर येईल.

हे पोर्टल थेट भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत येतं. याचा उद्देश पोलीस स्टेशनला न जाता ऑनलाइन पद्धतीनं गुन्हे नोंदवणं आहे. इथे तुमची ओळख न सांगता देखील तक्रार करता येते. तसेच अन्य माहिती किंवा मदतीसाठी भारत सरकारच्या विभागाद्वारे जारी टोल फ्री नंबर ‘155260’ वर संपर्क देखील केला जाऊ शकतो.

The post ऑनलाईन फसवणूक आणि Cyber Crime ची तक्रार पोलीस स्टेशनला न जात कशी करायची? जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-file-online-complaint-for-cyber-crime-in-india-know-process-step-by-step/feed/ 0
Airtel च्या सिस्टममध्ये झाला बिघाड, आपोआप पाठवले जात आहेत SMS, मोठ्या Data Scam ची आहे भीती https://www.91mobiles.com/marathi/airtel-users-privacy-data-security-risk-in-india-due-to-system-error/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-users-privacy-data-security-risk-in-india-due-to-system-error/#respond Fri, 07 May 2021 15:45:38 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10856 Airtel सिस्टममध्ये झालेला हा बिघाड तेव्हा प्रकाशात आला जेव्हा देशात एयरटेल मोबाईल युजर्सना त्यांच्या नंबरवर एक एसएमएस मिळाला.

The post Airtel च्या सिस्टममध्ये झाला बिघाड, आपोआप पाठवले जात आहेत SMS, मोठ्या Data Scam ची आहे भीती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंटरनेट मार्केट आणि टेक्नोलॉजीने गेल्या काही वर्षांमध्ये खूप प्रगती केली आहे. डिजिटल होत असलेल्या दुनियेत अनेकजण काम घर बसल्या मोबाईलवरून करतात. इंटरनेटच्या वाढत्या महत्वासोबत सामान्य लोकांची गोपनीयता आणि खाजगी माहिती धोक्यात येऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांत पण डेटा चोरीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यात आता भारतीय टेलीकॉम कंपनी Airtel च्या नावाचा पण समावेश झाल्याचे दिसत आहे. भारती एयरटेल कंपनीच्या सिस्टममध्ये एक मोठा बिघाड समोर आला आहे त्यामुळे एयरटेल युजर्सच्या डेटावर पण चोरीचा धोका संभवताना दिसत आहे. (Airtel users privacy data security risk in India due to system error)

कंपनीच्या नियंत्रणात राहिले नाहीत SMS

Airtel सिस्टममध्ये झालेला हा बिघाड तेव्हा प्रकाशात आला जेव्हा देशात एयरटेल मोबाईल युजर्सना त्यांच्या नंबरवर एक एसएमएस मिळाला. हा एसएमएस एयरटेलद्वारे AD-TEST1 हेडरसह आला होता, ज्यात ‘रिचार्ज’ संबंधित काही गोष्टी सांगण्यात आल्या होत्या, जे तुम्ही खाली दिलेल्या फोटोमध्ये पण बघू शकता. या एसएमएसमध्ये एयरटेल युजर्सचा खाजगी मोबाईल नंबर पण लिहिण्यात आला होता. मेसेज कंटेंटपेक्षा जास्त मेसेजच्या पत्त्याने ग्राहकांच्या मनात संशय निर्माण केला होता, कारण हा एक टेस्टिंग मेसेज होता.

एअरटेलच्या एररमुळे आलेला एसएमएस

वाचकांना सांगू इच्छितो कि सामान्यतः जेव्हा एखादा टेस्टिंग मेल किंवा मेसेज पाठवला जातो तेव्हा त्याचे शीर्षक TEST1, TEST2, TEST3 या क्रमात येते. हा मेसेज मिळाल्यावर अशी समजूत झाली कि कदाचित एयरटेल कंपनी एखाद्या सेवेची टेस्टिंग करत आहे आणि यासाठी काही निवडक युजर्सना हा टेस्ट एसएमएस पाठवत आहे. पण पुहे जे घडले त्यामुळे घटनेला वेगळेच वळण मिळाले.

एयरटेलने सिस्टममधील बिघाड मान्य केला

TEST1 च्या एसएमएसनंतर जवळपास 3 तासांनी Airtel कडून अजून एक मेसेज युजर्सना मिळाला जो AD-Airtel हेडरसह आला होता. या एसएमएसमध्ये एयरटेलने आधीच्या मेसेजचा उल्लेख करता म्हटले होते कि, ‘आज अनेक ग्राहकांना टेस्ट1 कडून एखादा मेसेज मिळाला असेल, तो एसएमएस सिस्टम एररमुळे पाठवण्यात आला आहे.’ या नवीन एसएमएसमध्ये एयरटेलने System Error ची कबुली देत ग्राहकांना आवाहन केले कि त्यांनी जुना एसएमएस इग्नोर करावा.

एअरटेलकडून आलेले उत्तर

कंपनीचे उत्तर

Airtel च्या सिस्टममध्ये आलेला बिघाड आणि याचे कारण युजर्सच्या खाजगी मोबाईल नंबरवर रिसीव झालेल्या एसएमएसबाबत जेव्हा कंपनीच्या कस्टमर केयर विभागात विचारणा करण्यात आली तेव्हा सांगण्यात आले कि हा एसएमएस एखाद्या सर्कलमध्ये नाही तर संपूर्ण भारतातील एयरटेल युजर्सच्या नंबरवर गेला आहे. कंपनीने मान्य केले कि त्यांच्या सिस्टममध्ये काही बिघाड झाला आहे आणि यामुळे Airtel Postpaid आणि Airtel Prepaid दोन्ही युजर्सना असा मेसेज मिळाला आहे.

हे देखील वाचा : Xiaomi लवकरच लॉन्च करेल Mi Pad 5 आणि Pad 5 Pro, समोर आले स्पेसिफिकेशन्स

डेटा लीकची भीती

एयरटेलच्या सिस्टममध्ये काय गडबड झाली आहे हे कंपनीने सार्वजनिक केले नाही. बातमी लिहिस्तोवर Airtel ने आपल्या कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा प्रेस रिलीजच्या माध्यमातून याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. सिस्टममध्ये आलेल्या बिघाडामुळे मोबाईल ग्राहकांच्या व एयरटेल युजर्सच्या डेटावर कोणता प्रभाव झाला आहे आणि त्यांची खाजगी माहिती Airtel कंपनीकडे किती सुरक्षित आहे, या गोष्टी अजूनही पडद्यामागे आहेत.

सामान्य नागरिकांमध्ये भीती याची आहे कि सिस्टम एररमुळे जर त्यांचा खाजगी मोबाईल नंबर कंपनीद्वारे विनाकारण वापरला जाऊ शकतो. आजच्या काळात जेव्हा मोठमोठे बॅंक ट्रांजेक्शन, KYC, Aadhaar Card आणि PAN Card सर्व एका मोबाईल नंबरच्या माध्यमातून सुरु असतात, त्यामुळे टेलीकॉम कंपनीद्वारे खाजगी मोबाईल नंबरचा असा वापर चुकीचा ठरतो.

हे देखील वाचा : 20,000 रुपयांच्या बजेटमधील टॉप 10 फास्ट चार्जिंग असलेले स्मार्टफोन्स, क्षणात होतील फुल चार्ज

BSNL ने पण केला होता अलर्ट जारी

अलीकडेच सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएलने पण अलर्ट जारी करून काही एसएमएसचे हेडर्स आणि पत्ते पण शेयर केले होते. कंपनीच्या एसएमएसमध्ये CP-SMSFST, AD-VIRINF, CP-BLMKND आणि BP-ITLINN चा समावेश होता, ज्यांच्यावर फसवणुकीचा शिक्का मारण्यात आला होता. भारत संचार निगम लिमिटेडने स्पष्ट सांगितले होते कि या हेडर्ससह येणारे एसएमएस कंपनीचे नाहीत, त्यामुळे या मेसेजमधील कोणतीही लिंक क्लिक करू नये आणि याला उत्तर देऊ नये.

The post Airtel च्या सिस्टममध्ये झाला बिघाड, आपोआप पाठवले जात आहेत SMS, मोठ्या Data Scam ची आहे भीती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-users-privacy-data-security-risk-in-india-due-to-system-error/feed/ 0