20,000 रुपयांच्या बजेटमधील टॉप 10 फास्ट चार्जिंग असलेले स्मार्टफोन्स, क्षणात होतील फुल चार्ज

Fast charging phone under 20000 in India

सध्या दिसत आहे कि जवळपास सर्व स्मार्टफोन कंपन्या आपल्या फोनमधील फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीची मर्यादा वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. या लिस्टमध्ये स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी, ओप्पो, वीवो इत्यादींचा समावेश आहे. जर तुम्ही मोठ्या प्रमाणात स्मार्टफोनचा वापर करत असाल आणि तुमच्याकडे चार्ज करण्यासाठी जास्त वेळ नसेल तर तुम्ही फास्ट चार्जिंग सपोर्ट असणारे स्मार्टफोन वापरले पाहिजेत. आता तुम्ही विचार करत असाल कि फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीमध्ये असे काय आहे ज्यामुळे फोन इतक्या लवकर चार्ज होतो. तसेच, हि टेक्नॉलॉजी असलेले फोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला किती रुपये खर्च करावे लागतील. या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आज आम्ही तुम्हाला Fast charging किंवा Quick Charging असलेल्या टॉप 10 स्मार्टफोन्सची माहिती देणार आहोत. (Fast charging phone under 20000 in India)

फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी म्हणजे काय?

फास्ट चार्ज टेक्नॉलॉजी तुमच्या फोनच्या चार्जर Wattage वर अवलंबून असते. फोन चार्जरचा Wattage जितका जास्त असेल, तुमचा फोन तेवढाच जास्त वेगाने चार्ज होईल. प्रत्येक स्मार्टफोनमध्ये पावर मॅनेजमेंट सर्किट बोर्ड असतो. यावरून ठरते कि कोणत्या वेळी बॅटरी किती वॉट वीज घेऊ शकते. ज्या स्मार्टफोनमध्ये क्विक चार्ज नसेल त्यांच्यात हे प्रमाण 10 वॉटपर्यंत मर्यादित आहे. फोन वेगाने चार्ज करण्यासाठी तुम्हाला फास्ट चार्जरची पण गरज पडेल.

Best Charging Phone List

Realme 8 Pro

रियलमी 8 प्रो मध्ये पावरफुल स्पेसिफिकेशन्स सोबतच दमदार बॅटरीची पण सोय करण्यात आली आहे. कंपनीने हा फोन 4,500एमएएच बॅटरीसह बाजारात आणला आहे जी 50वॉट सुपरडार्ट चार्ज टेक्नॉलॉजीसह येते. रियलमी फॅन्ससाठी कंपनीने Realme 8 Pro सह रिटेल बॉक्समध्ये 65वॉट चार्जरचा पण समावेश केला आहे. या फोनची किंमत 17,999 रुपयांपासून सुरु होते. बॅटरी व्यतिरिक्त फोनमध्ये शानदार डिस्प्ले, पावरफुल प्रोसेससर आणि शानदार कॅमेरा पण देण्यात आला आहे. Realme 8 Pro स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाचा फुलएचडी सुपर एमोलेड पंच-होल डिस्प्ले 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट सारख्या फीचर्ससह येतो. इतकेच नव्हे तर फोन लेटेस्ट ओएस अँड्रॉइड 11 वर चालतो जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह 8नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 720जी चिपसेटवर चालतो.

Realme 8 Pro

याव्यतिरिक्त Realme 8 Pro क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्याच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.88 अपर्चर असलेला 108 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनच्या बॅक पॅनलवर एफ/2.25 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि तेवढाच अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची B&W लेंस देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.45 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या सोनी आईएमएक्स471 फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy M31s

Samsung च्या या फोनसह 25 वॉच चार्जर मिळतो, जो या फोनला 30 मिनिटांत 34 टक्के आणि एक तासात 65 टक्के चार्ज करू शकतो. फोन पूर्णपणे चार्ज होण्यास दीड तास लागतो. एकंदरीत बॅटरी परफॉर्मन्स चांगली आहे आणि रिवर्स चार्जिंग पण एक चांगला फीचर असल्याचे बोलले जात आहे जो तुमचे इतर डिवाइस गॅलेक्सी एम31एस च्या 6,000mAh बॅटरीने चार्ज करू शकतो. सॅमसंग गॅलेक्सी एम31एस मिराज ब्लू आणि मिराज ब्लॅक सहित दोन रंगात उपलब्ध आहे. फोनमध्ये 6.5 इंचाची फुलएचडी+ 1080 X 2340 पिक्सल रेजोल्यूशन असेलली स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच Samsung Galaxy M31S कंपनीने एक्सिनोस 9611 चिपसेट दिला आहे ज्यात 2.3 GHZ चा ऑक्टा कोर प्रोसेसर देण्यात आला आहे.

Samsung Galaxy M31s

हा फोन आपल्या कॅमेरा क्षमतेमुळे खूप चर्चेत राहिला होता आणि सांगू इच्छितो कि यात 64MP चा क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. कंपनीने सोनीच्या IMX682 सेंसरचा उपयोग केला आहे. याची दुसरी लेंस 12 MP ची आहे जी वाइड अँगलला सपोर्ट करते. तिसरा आणि चौथा सेंसर 5 MP चा देण्यात आला आहे जी मॅक्रो आणि पोर्ट्रेट मोडसाठी आहेत. फोनमध्ये सेल्फीसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे जो 4K व्हिडीओसह वाइड अँगल मोडला सपोर्ट करतो.

Poco X3 Pro

फोनला पावर देण्यासाठी यात 5,160mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 33 वॉटच्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. पोकोचा दावा आहे कि एका चार्जमध्ये या फोनची बॅटरी 11 तास गेमिंग टाईम आणि 18 तास व्हिडीओ प्लेबॅक टाईम देऊ शकते. फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा 20:9 आस्पेक्ट रेशियोवर लॉन्च केला गेला आहे जो 1080 × 2400 पिक्सल रेजोल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल एलसीडी स्क्रीनला सपोर्ट करते. तसेच फोन अँड्रॉइड 11 ओएससह मीयुआय 12 वर चालतो. या फोनमध्ये 2.96गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 860 चिपसेट देण्यात आला आहे.

poco x3 Pro

POCO X3 Pro क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स582 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्याचबरोबर एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलचा वाइड अँगल लेंस आहे तसेच दोन एफ/2.4 अपर्चर असलेले 2 मेगापिक्सलचे सेंसर देण्यात आले आहेत ज्यात एक डेफ्थ सेंसर आणि एक मॅक्रो सेंसर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी पोको एक्स3 प्रो एफ/2.2 अपर्चर असलेल्या 20 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Redmi Note 10 Pro Max

पावर बॅकअपसाठी Redmi Note 10 Pro Max स्मार्टफोनमध्ये 5,020एमएएचची मोठी बॅटरी आहे. स्मार्टफोन 33वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. फोनसह येणाऱ्या 33W च्या फास्ट चार्जिंगच्या मदतीने फोन एक तासापेक्षा जास्त वेळात फुल चार्ज केला जाऊ शकतो. एकंदरीत या फोनचा बॅटरी बॅकअप ठीक-ठाक आहे. या फोनची आरंभिक किंमत 18,999 रुपये आहे जी फोनच्या 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची आहे. Redmi Note 10 Pro Max स्मार्टफोन 108 मेगापिक्सल असलेल्या प्राइमरी Samsung ISOCELL HM2 सेंसरला सपोर्ट करते. त्याचबरोबर स्मार्टफोन्सच्या बॅक पॅनलवर 5 मेगापिक्सल असलेली सुपर मॅक्रो लेंस, 8 मेगापिक्सल असलेली अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एक 2 मेगापिक्सल असलेला डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे.

Redmi NOte 10 Pro Max

सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सपोर्ट आहे. सोबत फोन लेटेस्ट अँड्रॉइड ओएस अँड्रॉइड 11 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी स्मार्टफोनमध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉमचा 8एनएम टेक्नॉलॉजीवर बनलेला स्नॅपड्रॅगॉन 732जी चिपसेट आहे. ग्राफिक्ससाठी हे स्मार्टफोन एड्रेनो 618 जीपीयू आणि 6.67 इंचाच्या डिस्प्लेला सपोर्ट करतो.

Vivo Y51A

पावर बॅकअपसाठी हा फोन 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. फोनची आरंभिक किंमत 17,990 रुपये आहे. या लिस्टमधील दुसऱ्या फोन्सपेक्षा या फोनमध्ये कमी पावर असलेला फास्ट चार्जिंग फीचर आहे. फोनचे इतर फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.58 इंचाचा फुलएचडी+ एलसीडी आयपीएस डिस्प्ले आहे. तसेच या फोनमध्ये आक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट देण्यात आला आहे.

VIVO Y51A

Vivo Y51A च्या मागे फ्लॅशसह एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे तसेच एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलचा वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Realme 7 Pro

फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे आणि हि फुल चार्ज झाल्यानंतर आरामात एक दिवस पुरते. 65W सुपर फास्ट चार्जिंग सपोर्टसह हि फुल चार्ज करण्यात जवळपास 40 मिनिटांचा वेळ लागतो. तसेच फक्त अर्ध्या तासात जवळपास 88 टक्के चार्ज होतो. Realme 7 Pro पाहता यात 6.4-इंचाची सुपर AMOLED फुलस्क्रीन 180Hz सॅम्पलिंग रेटसह देण्यात आली आहे. डिस्प्ले 20:9 रेश्यो, 2400x1080P FHD+ रिजोल्यूशन आणि 90.8% स्क्रीन-टू-बॉडी रेश्योसह येतो. रियलमी 7 प्रो मध्ये स्नॅपड्रॅगॉन 720G एसओसी आहे.

Realme X7 Pro

Realme 7 Pro मध्ये क्वाड कॅमेरा आणि फ्रंटला सिंगल पंच-होल सेंसर देण्यात आला आहे. फोनमध्ये मागे Sony IMX682 च्या अपर्चर f/1.8 सह 64 मेगापिक्सलचा अल्ट्रा हाई-रिजोल्यूशन असलेला वाइड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोन्समध्ये अपर्चर f/2.3 सह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड-अँगल लेंस, अपर्चर f/2.4 सह 2 मेगापिक्सल B&W पोर्टेट कॅमेरा आणि अपर्चर f/2.4 सह 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी Realme 7 Pro मध्ये अपर्चर f/2.5 सह 32 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि Realme 7 मध्ये अपर्चर F2.0 सह 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

OPPO A54

पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 10वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. इतर फोन्सच्या तुलनेत या डिवाइसमध्ये चार्जिंग सपोर्ट खूप कमी आहे. या फोनची किंमत 13,490 रुपये आहे. फोन 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.51 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेसह येतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये आक्टाकोर प्रोसेसरसह क्चॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 480 चिपसेट देण्यात आला आहे.

OPPO A54

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Oppo A54 5G क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.7 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि तेवढाच अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. फोनच्या फ्रंट पॅनलवर एफ/2.0 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

Realme Narzo 30 Pro 5G

पावर बॅकअपसाठी रियलमीच्या या 5G फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 30W डार्ट चार्ज टेक्नोलॉजीसह येते. कंपनीचा दावा आहे कि नवीन अपडेट 30W डार्ट चार्जसह 65 मिनिटांत 5000mAh ची बॅटरी 100% पर्यंत चार्ज करू शकते आणि फक्त 25 मिनिटांत हा फोन जवळपास 50% चार्ज करू शकते. रियलमी नारजो 30 प्रो 5G मध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 1080×2400 पिक्सलसह 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि मीडियाटेक डाइमेंसिटी 800यू 5जी चिपसेट आहे.

realme narzo 30 pro

Narzo 30 Pro 5G मध्ये मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि फ्रंटला सिंगल पंच-होल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. मागील कॅमेरा सेटअप पाहता यात f/1.8 अपर्चरसह 48 मेगापिक्सलची मेन 6P लेंस देण्यात आली आहे. तसेच f/2.3 अपर्चरसह 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल लेंस आणि f/2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आहे. व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोनमध्ये f/2.1 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Samsung Galaxy M51

या लिस्टमध्ये Samsung Galaxy M51 एकमेव असा फोन आहे जो फास्ट चार्जिंग सोबतच सर्वात मोठ्या बॅटरीने सुसज्ज आहे. फोनमध्ये 7,000एमएएच मोठी बॅटरी आहे जी सध्या भारतीय बाजारात खूप कमी फोन्समध्ये मिळते. दमदार बॅटरी सोबतच 25वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी आहे आणि कंपनी हा चार्जर फोनच्या बॉक्समध्ये देते. Galaxy M51 रिवर्स चार्जिंगला पण सपोर्ट करतो त्याचबरोबर फोनमध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे. सॅमसंगच्या दाव्यानुसार गॅलेक्सी एम51 एका चार्जमध्ये 34 तास व्हिडीओ प्लेबॅक, 64 तास वॉयस कॉल, 182 तास म्यूजिक प्लेबॅक आणि 24 तास ब्राउजिंग पावर देऊ शकतो.

Samsung Galaxy M51

सॅमसंग गॅलेक्सी एम51 च्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅश लाईटसह चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. या सेटअपमध्ये एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX682 सेंसर आहे. सोबत हा फोन 123डिग्री फिल्डव्यू क्षमता असलेल्या एफ/2.2 अपर्चर असलेल्या 12 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि तेवढाच अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. फोनमध्ये फ्रंटला 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेंसर आहे.

Realme X7 5G

रियलमी एक्स 7 5G ची आरंभिक किंमत 19,999 रुपये आहे आणि यातील बॅटरी 65W स्मार्ट फ्लॅश चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने फोन्स फास्ट चार्ज केले जाऊ शकतात. हि टेक्नॉलजी वोल्टेज कमी करून चार्जिंग पावर वाढवते आणि यात हीट पण कमी होते. Realme X7 मध्ये 4300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि स्टॅंडर्ड 10V / 6.5A फ्लॅश चार्ज एडाप्टरसह येते. फोनमध्ये 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला मीडियाटेक डायमनसिटी 800यू चिपसेट देण्यात आला आहे.

Realme X7

Realme X7 f/1.8 सह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी शूटर, अपर्चर f/2.3 सह अल्ट्रा-वाइड-अँगल 8 मेगापिक्सल सेंसर, अपर्चर /2.4 सह 2 मेगापिक्सलचा ब्लॅक आणि वाइट पोर्टेट सेंसर व अपर्चर f/2.4 सह 2 मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर देण्यात आला आहे. व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी Realme X7 मध्ये अपर्चर f/2.5 सह 32 मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here