Airtel च्या सिस्टममध्ये झाला बिघाड, आपोआप पाठवले जात आहेत SMS, मोठ्या Data Scam ची आहे भीती

airtel च्या ऑफिस समोरील व्यक्ती

इंटरनेट मार्केट आणि टेक्नोलॉजीने गेल्या काही वर्षांमध्ये खूप प्रगती केली आहे. डिजिटल होत असलेल्या दुनियेत अनेकजण काम घर बसल्या मोबाईलवरून करतात. इंटरनेटच्या वाढत्या महत्वासोबत सामान्य लोकांची गोपनीयता आणि खाजगी माहिती धोक्यात येऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांत पण डेटा चोरीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. यात आता भारतीय टेलीकॉम कंपनी Airtel च्या नावाचा पण समावेश झाल्याचे दिसत आहे. भारती एयरटेल कंपनीच्या सिस्टममध्ये एक मोठा बिघाड समोर आला आहे त्यामुळे एयरटेल युजर्सच्या डेटावर पण चोरीचा धोका संभवताना दिसत आहे. (Airtel users privacy data security risk in India due to system error)

कंपनीच्या नियंत्रणात राहिले नाहीत SMS

Airtel सिस्टममध्ये झालेला हा बिघाड तेव्हा प्रकाशात आला जेव्हा देशात एयरटेल मोबाईल युजर्सना त्यांच्या नंबरवर एक एसएमएस मिळाला. हा एसएमएस एयरटेलद्वारे AD-TEST1 हेडरसह आला होता, ज्यात ‘रिचार्ज’ संबंधित काही गोष्टी सांगण्यात आल्या होत्या, जे तुम्ही खाली दिलेल्या फोटोमध्ये पण बघू शकता. या एसएमएसमध्ये एयरटेल युजर्सचा खाजगी मोबाईल नंबर पण लिहिण्यात आला होता. मेसेज कंटेंटपेक्षा जास्त मेसेजच्या पत्त्याने ग्राहकांच्या मनात संशय निर्माण केला होता, कारण हा एक टेस्टिंग मेसेज होता.

एअरटेलच्या एररमुळे आलेला एसएमएस

वाचकांना सांगू इच्छितो कि सामान्यतः जेव्हा एखादा टेस्टिंग मेल किंवा मेसेज पाठवला जातो तेव्हा त्याचे शीर्षक TEST1, TEST2, TEST3 या क्रमात येते. हा मेसेज मिळाल्यावर अशी समजूत झाली कि कदाचित एयरटेल कंपनी एखाद्या सेवेची टेस्टिंग करत आहे आणि यासाठी काही निवडक युजर्सना हा टेस्ट एसएमएस पाठवत आहे. पण पुहे जे घडले त्यामुळे घटनेला वेगळेच वळण मिळाले.

एयरटेलने सिस्टममधील बिघाड मान्य केला

TEST1 च्या एसएमएसनंतर जवळपास 3 तासांनी Airtel कडून अजून एक मेसेज युजर्सना मिळाला जो AD-Airtel हेडरसह आला होता. या एसएमएसमध्ये एयरटेलने आधीच्या मेसेजचा उल्लेख करता म्हटले होते कि, ‘आज अनेक ग्राहकांना टेस्ट1 कडून एखादा मेसेज मिळाला असेल, तो एसएमएस सिस्टम एररमुळे पाठवण्यात आला आहे.’ या नवीन एसएमएसमध्ये एयरटेलने System Error ची कबुली देत ग्राहकांना आवाहन केले कि त्यांनी जुना एसएमएस इग्नोर करावा.

एअरटेलकडून आलेले उत्तर

कंपनीचे उत्तर

Airtel च्या सिस्टममध्ये आलेला बिघाड आणि याचे कारण युजर्सच्या खाजगी मोबाईल नंबरवर रिसीव झालेल्या एसएमएसबाबत जेव्हा कंपनीच्या कस्टमर केयर विभागात विचारणा करण्यात आली तेव्हा सांगण्यात आले कि हा एसएमएस एखाद्या सर्कलमध्ये नाही तर संपूर्ण भारतातील एयरटेल युजर्सच्या नंबरवर गेला आहे. कंपनीने मान्य केले कि त्यांच्या सिस्टममध्ये काही बिघाड झाला आहे आणि यामुळे Airtel Postpaid आणि Airtel Prepaid दोन्ही युजर्सना असा मेसेज मिळाला आहे.

हे देखील वाचा : Xiaomi लवकरच लॉन्च करेल Mi Pad 5 आणि Pad 5 Pro, समोर आले स्पेसिफिकेशन्स

डेटा लीकची भीती

एयरटेलच्या सिस्टममध्ये काय गडबड झाली आहे हे कंपनीने सार्वजनिक केले नाही. बातमी लिहिस्तोवर Airtel ने आपल्या कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा प्रेस रिलीजच्या माध्यमातून याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. सिस्टममध्ये आलेल्या बिघाडामुळे मोबाईल ग्राहकांच्या व एयरटेल युजर्सच्या डेटावर कोणता प्रभाव झाला आहे आणि त्यांची खाजगी माहिती Airtel कंपनीकडे किती सुरक्षित आहे, या गोष्टी अजूनही पडद्यामागे आहेत.

सामान्य नागरिकांमध्ये भीती याची आहे कि सिस्टम एररमुळे जर त्यांचा खाजगी मोबाईल नंबर कंपनीद्वारे विनाकारण वापरला जाऊ शकतो. आजच्या काळात जेव्हा मोठमोठे बॅंक ट्रांजेक्शन, KYC, Aadhaar Card आणि PAN Card सर्व एका मोबाईल नंबरच्या माध्यमातून सुरु असतात, त्यामुळे टेलीकॉम कंपनीद्वारे खाजगी मोबाईल नंबरचा असा वापर चुकीचा ठरतो.

हे देखील वाचा : 20,000 रुपयांच्या बजेटमधील टॉप 10 फास्ट चार्जिंग असलेले स्मार्टफोन्स, क्षणात होतील फुल चार्ज

BSNL ने पण केला होता अलर्ट जारी

अलीकडेच सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएलने पण अलर्ट जारी करून काही एसएमएसचे हेडर्स आणि पत्ते पण शेयर केले होते. कंपनीच्या एसएमएसमध्ये CP-SMSFST, AD-VIRINF, CP-BLMKND आणि BP-ITLINN चा समावेश होता, ज्यांच्यावर फसवणुकीचा शिक्का मारण्यात आला होता. भारत संचार निगम लिमिटेडने स्पष्ट सांगितले होते कि या हेडर्ससह येणारे एसएमएस कंपनीचे नाहीत, त्यामुळे या मेसेजमधील कोणतीही लिंक क्लिक करू नये आणि याला उत्तर देऊ नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here