Xiaomi लवकरच लॉन्च करेल Mi Pad 5 आणि Pad 5 Pro, समोर आले स्पेसिफिकेशन्स

mi pad 5 चा फोटो

Xiaomi लवकरच मार्केटमध्ये टॅबलेट लॉन्च करण्याची योजना बनवत आहे. कंपनीने आता गेल्यावर्षी 2018 मध्ये आपला टॅबलेट लॉन्च केला होता. कोरोना संक्रमणामुळे ई-लर्निंग आणि वर्क फ्रॉम होमच्या उदयामुळे टॅबलेटची मागणी वाढत आहे. त्यामुळेच कदाचित कंपनी टॅबलेट लॉन्च करत आहे. शाओमीच्या अपकमिंग टॅबलेटबद्दल लीक रिपोर्टमध्ये दावा केला जात आहे कि हा टॅब फ्लॅगशिप कॉनफिग्रेशनसह सादर केला जाऊ शकतो. (Xiaomi will soon launch MI Pad 5 and Pad 5 Pro specifications leaked)

शाओमीचा अपकमिंग Mi Pad 5 टॅबलेट चिनी सर्टिफिकेशन साइट 3C वर स्पॉट केला गेला आहे. या लिस्टिंगमध्ये या टॅबलेटसंबंधित काही स्पेसिफिकेशन समोर आले आहेत. या लिस्टिंगनुसार शाओमीचा हा टॅबलेट डुअलसेल बॅटरीसह सादर केला जाऊ शकतो, जिची एकूण क्षमता 8520mAh आहे. या टॅबमधील एका बॅटरीची क्षमता 4260mAh आहे. Xiaomi ने या टॅबबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. अफवांनुसार शाओमीचा हा टॅब दोन मॉडेल Mi Pad 5 आणि Pad 5 Pro मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : Samsung घेऊन येत आहे कमालीची कॅमेरा टेक्नोलॉजी, Galaxy S22 Ultra पासून फोटोग्राफीमध्ये मिळेल DSLR सारखी मजा

बातम्यांनुसार शाओमीचे हे दोन्ही अपकमिंग टॅब MediaTek Dimensity 1200 आणि Snapdragon 870 चिपसेटसह सादर केले जाऊ शकतात. शाओमीचा अपकमिंग Mi Pad5 Pro फ्लॅगशिप स्पेसिफिकेशन्ससह सादर केला जाऊ शकतो, ज्याची मार्केटमध्ये थेट टक्कर iPad Pro आणि Huawei Mate Pad Pro शी होईल.

हे देखील वाचा : Samsung चा नवीन कारनामा, लॉन्च केला Galaxy S20 FE फोनचा तिसरा नवीन मॉडेल

Mi Pad 5 Pro बद्दल बोलले जात आहे कि या टॅबलेटमध्ये LCD डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचे रिजोल्यूशन 2K आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आणि टच सॅंप्लिंग रेट 240Hz आहे. तसेच प्रो वर्जनमध्ये शाओमी स्टायलस सपोर्ट दिला जाऊ शकतो. Xiaomi ने अलीकडेच सांगितले होते कि ते टॅबलेटसाठी आपला कस्टम युआय MIUI डेवलप करत आहेत. या इंटरफेस मध्ये हॅन्डहेल्ड पीसी मोड आणि पीसी सेंट्रिक इंटरफेसमध्ये क्लासिक स्टार आणि कंट्रोल सेंटर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here