Fast Charging - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 14 Apr 2023 12:27:37 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 सर्वात फास्ट चार्ज होणारे टॉप 10 स्मार्टफोन; झटक्यात होतात फुल चार्ज https://www.91mobiles.com/marathi/sarvat-fast-charge-honara-phone/ https://www.91mobiles.com/marathi/sarvat-fast-charge-honara-phone/#respond Sat, 15 Apr 2023 12:26:17 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20296 फोन मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून टेक्नॉलॉजी वेगानं अपग्रेड होत आहे. खासकरून मोबाइल चार्जिंगच्या बाबती तरी हेच म्हणता येईल. आता मोबाइल फोन चार्ज करण्यासाठी तासंतास चार्जिंगवर फोन ठेवण्याची गरज नाही. सध्या मार्केटमध्ये अनेक असे स्मार्टफोन आहेत जे 10 मिनिटांत फुल चार्ज होतात. हो तुम्ही बरोबर वाचलंत! दहा मिनिटांत फोन 0 ते 100 टक्के चार्ज होत आहेत. […]

The post सर्वात फास्ट चार्ज होणारे टॉप 10 स्मार्टफोन; झटक्यात होतात फुल चार्ज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
फोन मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून टेक्नॉलॉजी वेगानं अपग्रेड होत आहे. खासकरून मोबाइल चार्जिंगच्या बाबती तरी हेच म्हणता येईल. आता मोबाइल फोन चार्ज करण्यासाठी तासंतास चार्जिंगवर फोन ठेवण्याची गरज नाही. सध्या मार्केटमध्ये अनेक असे स्मार्टफोन आहेत जे 10 मिनिटांत फुल चार्ज होतात. हो तुम्ही बरोबर वाचलंत! दहा मिनिटांत फोन 0 ते 100 टक्के चार्ज होत आहेत. आज आम्ही तुम्हाला सर्वात फास्ट चार्जिंग असलेल्या टॉप 10 स्मार्टफोनची लिस्ट शेयर करत आहोत.

सर्वात फास्ट चार्जिंग असलेले स्मार्टफोन

  1. Realme GT3
  2. iQOO 11 Pro
  3. Infinix Zero Ultra
  4. ZTE nubia Red Magic 8 Pro+vOnePlus 10T
  5. Motorola Edge 40 ProvXiaomi Poco F4 GT
  6. Xiaomi 13 Pro
  7. Xiaomi Redmi Note 12 Pro+
  8. OnePlus 11

Realme GT3 240W

  • बॅटरी : 4600mAh
  • चार्जिंग : 240W
  • चार्जिंग टाइम : 10 मिनिटे
  • प्रोसेसर : Snapdragon 8+ Gen 1

Realme GT3 स्मार्टफोन 240W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह सादर करण्यात आला आहे. हा फोन फक्त दहा मिनिटांत फुल चार्ज होतो. तसेच कंपनीचा दावा आहे की GT3 फोन चार मिनिटांच्या चार्जिंगवर 0 ते 50 टक्के चार्ज होतो. हा फोन Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर, 16GB पर्यंतच्या रॅम, 1TB पर्यंतच्या स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. रियलमीच्या फ्लॅगशिप फोनमध्ये 6.74-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले मिळतो, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आहे. कॅमेरा सेटअप पाहता यात ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 50MP Sony IMX890 सेन्सर आहे.

iQOO 11 Pro

  • बॅटरी : 4700mAh
  • चार्ज : 200W
  • चार्जिंग टाइम : 10 मिनिटे
  • प्रोसेसर : Snapdragon 8 Gen 2

iQOO 11 Pro चे फीचर्स पाहता फोनमध्ये 6.78-इंचाचा E6 AMOLED Quad HD+ कर्व डिस्प्ले मिळतो, ज्याचा रिफ्रेश 120Hz आहे. हा फोन Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर, 16GB पर्यंत LPDDR5X RAM आणि 512GB पर्यंतच्या स्टोरेज ऑप्शनसह येतो. फोनमध्ये 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोन 4,700mAh ची बॅटरी आणि 200W फास्ट चार्जिंग सपोर्टसह लाँच करण्यात आला आहे.

Infinix Zero Ultra

  • बॅटरी : 4500mAh
  • चार्जिंग : 180W
  • चार्जिंग टाइम : 12 मिनिटे
  • प्रोसेसर : Dimensity 920

Infinix Zero Ultra स्मार्टफोनमध्ये 6.8-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट मिळतो. इनफिनिक्सच्या या फोनमध्ये MediaTek Dimensity 920 प्रोसेसर आणि Mali-G68 MC4 GPU देण्यात आला आहे. या फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी आणि 180W थंडर चार्ज मिळतो. जोडीला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 200MP आणि फ्रंटला 32MP चा कॅमेरा सेन्सर मिळतो.

Nubia Red Magic 8 Pro+

  • बॅटरी : 5000mAh
  • प्रोसेसर : 165W
  • चार्जिंग टाइम : 14 मिनिटे
  • प्रोसेसर : Snapdragon 8 Gen 2

Nubia RedMagic 8 Pro Plus स्मार्टफोनमध्ये 6.8-इंचाचा Full HD+ OLED डिस्प्ले मिळतो. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 50MP चा आहे. तसेच फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 165W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

OnePlus 10T

  • बॅटरी : 4800mAh
  • प्रोसेसर : 150W
  • चार्जिंग टाइम : 18 मिनिटे
  • प्रोसेसर : Snapdragon 8+ Gen 1

OnePlus 10T स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा Full-HD+ 10-bit AMOLED डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. या फोनमध्ये Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटसह 16GB पर्यंत रॅमचा सपोर्ट मिळतो. तसेच फोन 5000mAh बॅटरी आणि 150W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 50MP ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे.

Motorola Edge 40 Pro

  • बॅटरी : 4600mAh
  • प्रोसेसर : 125W
  • चार्जिंग टाइम : 23 मिनिटे
  • प्रोसेसर : Snapdragon 8 Gen 2

Motorola Edge 40 Pro मध्ये 6.67-इंचाचा pOLED पॅनल देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1,080 x 2,400 FHD+, रिफ्रेश रेट 165Hz आहे. या फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर मिळतो. मोटोरोलाच्या या फोनमध्ये 50MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये 4,60mAh ची बॅटरी आणि 125W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.

Poco F4 GT

  • बॅटरी : 4700mAh
  • प्रोसेसर : 120W
  • चार्जिंग टाइम : 17 मिनिटे
  • प्रोसेसर : Snapdragon 8 Gen 1

POCO F4 GT स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या AMOLED पॅनलचा रिफ्रेश रेट 120Hz आणि रिजोल्यूशन 2400×1080 पिक्सल आहे. POCO F4 GT मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर, 8GB/12GB रॅम आणि 128GB/256GB स्टोरेज मिळतो. यात 4,700mAh बॅटरी आणि 120W HyperCharge सपोर्ट मिळतो. पोकोच्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो.

Xiaomi 13 Pro

  • बॅटरी : 4820mAh
  • प्रोसेसर : 120W Hyper Charge
  • चार्जिंग टाइम : 19 मिनिटे
  • प्रोसेसर : Snapdragon 8 Gen 2

Xiaomi 13 Pro स्मार्टफोनमध्ये 6.73-इंचाचा 2K OLED डिस्प्ले पॅनल आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. शाओमीचा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह येतो, ज्यात 12GB रॅम आणि 512GB स्टोरेजचा ऑप्शन देण्यात आला आहे. या फोनमध्ये 4,820mAh ची बॅटरी आणि 120W फास्ट चार्जचा सपोर्ट मिळतो. फोटोग्राफी पाहता फोन 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो.

Xiaomi Redmi Note 12 Pro+

  • बॅटरी : 5000 mAh
  • प्रोसेसर : 120W
  • चार्जिंग टाइम : 19 मिनिटे
  • प्रोसेसर : MediaTek Dimensity 1080

Redmi Note 12 Pro Plus स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा FHD+ Super AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 1080 प्रोसेसर मिळतो. शाओमीच्या फोनमध्ये 200MP चा प्रायमरी कॅमेरा मिळतो. फोनमध्ये 4,980mAh ची बॅटरी मिलती आहे.

OnePlus 11

  • बॅटरी : 5000mAh
  • प्रोसेसर : 100W
  • चार्जिंग टाइम : 25 मिनिटे
  • प्रोसेसर : Snapdragon 8 Gen 2

OnePlus 11 5G स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा QHD+ E4 2.75D फ्लॅक्सीबल कर्व OLED LTPO 3.0 डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन क्वॉलकॉमच्या Snapdragon 8 Gen2 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. OnePlus 11 5G मध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो.

The post सर्वात फास्ट चार्ज होणारे टॉप 10 स्मार्टफोन; झटक्यात होतात फुल चार्ज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/sarvat-fast-charge-honara-phone/feed/ 0
260W Fast Charging असलेला ब्रँडचा पहिला फोन असू शकतो Infinix GT 10 Pro, रिपोर्टमधून खुलासा https://www.91mobiles.com/marathi/infinix-gt-10-pro-could-launch-with-260w-fast-charging-and-200mp-camera/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-gt-10-pro-could-launch-with-260w-fast-charging-and-200mp-camera/#respond Wed, 15 Mar 2023 12:30:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19524 इनफिनिक्स कंपनीनं काही दिवसांपूर्वी शक्तीप्रदर्शन करत ‘All-Round FastCharge’ टेक्नॉलॉजी सादर केली आहे. ही टेक्नॉलॉजी 260W wired आणि 110W wireless fast charging ला सपोर्ट करते. आता बातमी आली आहे की ही टेक्नॉलॉजी असलेला Infinix GT 10 Pro हा ब्रँडचा पहिला मोबाइल फोन बनू शकतो. या मोबाइल फोनचे अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती लीक झाली आहे ज्यात 200MP […]

The post 260W Fast Charging असलेला ब्रँडचा पहिला फोन असू शकतो Infinix GT 10 Pro, रिपोर्टमधून खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • इनफिनिक्स जीटी 10 प्रो 260W चार्जिंगसह लाँच होऊ शकतो.
  • या मोबाइल फोनमध्ये 200MP Rear Camera दिला जाऊ शकतो.
  • Infinix GT 10 Pro मध्ये मीडियाटेक डिमेनसिटी 9000 चिपसेट मिळू शकतो.

इनफिनिक्स कंपनीनं काही दिवसांपूर्वी शक्तीप्रदर्शन करत ‘All-Round FastCharge’ टेक्नॉलॉजी सादर केली आहे. ही टेक्नॉलॉजी 260W wired आणि 110W wireless fast charging ला सपोर्ट करते. आता बातमी आली आहे की ही टेक्नॉलॉजी असलेला Infinix GT 10 Pro हा ब्रँडचा पहिला मोबाइल फोन बनू शकतो. या मोबाइल फोनचे अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती लीक झाली आहे ज्यात 200MP Camera चा देखील समावेश आहे.

Infinix Zero Ultra 5G

Infinix GT 10 Pro ची माहिती एमएसपी वेबसाइटच्या माध्यमातून समोर आली आहे. रिपोर्टनुसार इनफिनिक्सनं अलीकडेच प्रदर्शित केलेली 260वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी कंपनी जीटी 10 प्रो स्मार्टफोनच्या माध्यमातून मार्केटमध्ये सादर करू शकते. टिपस्टर पारस गुगलानीनं शेयर केलेल्या डिटेल्सनुसार वेबसाइटनं सांगितलं आहे की हा इनफिनिक्स फोन यावर्षी तिसऱ्या तिमाहीत म्हणजे जुलाई-ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान लाँच केला जाऊ शकतो. हे देखील वाचा: रियलमी जीटी नियो 5 एसईचा लाँच झाला कन्फर्म, कंपनीनं केली घोषणा

इनफिनिक्स जीटी 10 प्रो चे लीक स्पेसिफिकेशन्स

  • 260W Fast Charging
  • 200MP Rear Camera
  • 12GB RAM + 256GB ROM
  • MediaTek Dimensity 9000
Infinix Zero Ultra 5G

Infinix GT 10 Pro चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या माहितीनुसार या फोनची सर्वात मोठी यूएसपी 260वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असू शकते. या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून 4,400एमएएचची बॅटरी फक्त 8 मिनिटांत 0 ते 100 टक्क्यापर्यंत फुल चार्ज केली जाऊ शकते. रिपोर्टनुसार इनफिनिक्स जीटी 10 प्रो स्मार्टफोन 5,000एमएएचच्या बॅटरीसह सादर केला जाऊ शकतो.

इनफिनिक्स जीटी 10 प्रो मध्ये फोटोग्राफीसाठी 200 मेगापिक्सलचा सेन्सर दिला जाऊ शकतो जो रियर कॅमेरा सेटअपमध्ये मिळेल. रिपोर्टनुसार ही लेन्स ओआयएस फीचरसह येऊ शकते. तसेच आगामी इनफिनिक्स मोबाइल 6.8 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. रिपोर्टनुसार या फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनल आणि 120हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येऊ शकते. आशा आहे की ही स्क्रीन पंच-होल स्टाईल असेल. हे देखील वाचा: Samsung Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G सादर; कंपनीनं केली घोषणा

Infinix Zero 20

Infinix GT 10 Pro मध्ये प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक डिमेनसिटी 9000 चिपसेट असल्याचं लीकमध्ये सांगण्यात आलं आहे. हा 5जी चिपसेट 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला आहे. जीटी 10 प्रो स्मार्टफोन 12 जीबी रॅमसह मार्केटमध्ये लाँच केला जाऊ शकतो, जोडीला 256 जीबी इंटरनल स्टोरेज देखील मिळू शकते. कंपनीनं स्मार्टफोन लाँच बद्दल अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे समोर आलेले स्पेसिफिकेशन्स सध्या फक्त लीक म्हणता येतील.

The post 260W Fast Charging असलेला ब्रँडचा पहिला फोन असू शकतो Infinix GT 10 Pro, रिपोर्टमधून खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-gt-10-pro-could-launch-with-260w-fast-charging-and-200mp-camera/feed/ 0
300W Fast Charging टेक्नॉलॉजीची Redmi नं केली अधिकृत घोषणा https://www.91mobiles.com/marathi/300w-fast-charging-technology-by-redmi-100-percent-battery-in-5-minute/ https://www.91mobiles.com/marathi/300w-fast-charging-technology-by-redmi-100-percent-battery-in-5-minute/#respond Wed, 01 Mar 2023 05:09:17 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18264 Redmi नं आपल्या 300W ultra-fast charging टेक्नॉलॉजीची अधिकृत घोषणा केली आहे. ही कोणत्याही मोबाइल कंपनीद्वारे बाजारात आलेली सर्वात फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी आहे. 28 फेब्रुवारीला रियलमी ब्रँडनं 240W fast charging असलेला Realme GT3 स्मार्टफोन ग्लोबली लाँच केला. परंतु त्याआधीच Xiaomi सबब्रँड रेडमीनं आपली टेक्नॉलॉजी टेक विश्वासमोर ठेवली आहे. 300वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीची घोषणा रेडमीनं मायक्रोब्लागिंग साइट […]

The post 300W Fast Charging टेक्नॉलॉजीची Redmi नं केली अधिकृत घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • रेडमी ने 300W ultra-fast charging टेक्नॉलॉजी सादर केली आहे.
  • या टेक्नॉलॉजीनं 5 मिनिटांत फोन फुल चार्ज होऊ शकतो.
  • Redmi Note 12 Discovery फोनच्या माध्यमातून टेक्नॉलॉजी प्रदर्शित करण्यात आली.

Redmi नं आपल्या 300W ultra-fast charging टेक्नॉलॉजीची अधिकृत घोषणा केली आहे. ही कोणत्याही मोबाइल कंपनीद्वारे बाजारात आलेली सर्वात फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी आहे. 28 फेब्रुवारीला रियलमी ब्रँडनं 240W fast charging असलेला Realme GT3 स्मार्टफोन ग्लोबली लाँच केला. परंतु त्याआधीच Xiaomi सबब्रँड रेडमीनं आपली टेक्नॉलॉजी टेक विश्वासमोर ठेवली आहे.

300वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीची घोषणा रेडमीनं मायक्रोब्लागिंग साइट वेईबोच्या माध्यमातून केली आहे. कंपनीनं व्हिडीओ शेयर करून दाखवलं आहे की ही चार्जिंग किती वेळात फोन किती टक्के चार्ज करते. चिनी भाषेतील या पोस्टवरील कॅप्शनच्या इंग्रजी भाषांतरानुसार ‘300W Immortal Second Charger’ चा उल्लेख करण्यात आला आहे. हे देखील वाचा: फक्त 8 मिनिटांत बॅटरी फुल! 240W चार्जिंगसह Realme GT3 240W आला भारतात

5 मिनिटांत बॅटरी फुल चार्ज

रेडमीनं शेयर केलेल्या व्हिडीओमध्ये या चार्जिंग टेक्नॉलॉजीच्या मदतीनं Redmi Note 12 Discovery (Explorer Edition) स्मार्टफोन चार्ज करण्यात आल्याचं दाखवण्यात आलं आहे. या मोबाइल फोनमध्ये 4,100एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी पूर्णपणे ड्रेन केल्यानंतर चार्ज करण्यात आली आहे.

300W charging शी कनेक्ट केल्यावर या फोनची बॅटरी 0 वरून 50 टक्के होण्यास 2 मिनिट 11 सेकंदाचा वेळ लागला. तर 5 मिनिटांच्या आतच हा मोबाइल फोन फुल म्हणजे 100 टक्के चार्ज झाला होता. आतापर्यंत संपूर्ण स्मार्टफोन मार्केटमध्ये इतक्या वेगानं कोणताही डिवायस चार्ज करण्यात आलेला नाही.

कधी येणार बाजारात

Redmi नं 300W ultra-fast charging solution सादर तर केलं आहे, परंतु ही स्मार्टफोन्समध्ये कधी पर्यंत पाहायला मिळेल हे मात्र स्पष्ट झालं नाही. ही टेक्नॉलॉजी मोबाइल फोनमध्ये इनबिल्ट असेल की या टेक्नॉलॉजीचा वापर करण्यासाठी दुसरा अडॅप्टर चार्जरचा वापर करावा लागेल, हे देखील चिनी ब्रँड शाओमीनं सांगितलं नाही. हे देखील वाचा: WhatsApp वापरायचं असेल तर नवीन फोन घ्या! Apple, Samsung, LG आणि SONY च्या 49 मोबाइल्सवर नाही चालणार लोकप्रिय मेसेंजर

आशा आहे की रेडमी लवकरच 300वॉट चार्जिंगची आणखी माहिती देईल. तसेच ही टेक्नॉलॉजी रेडमी ब्रँडनं सादर केल्यामुळे हीचा वापर रेडमी नोट सीरिजमध्ये केला जाण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे मिडरेंज मधील स्मार्टफोन ग्राहकांना जगातील सर्वात वेगवान फास्ट चार्जिंग लवकरच अनुभवता येईल ही अपेक्षा आहे.

The post 300W Fast Charging टेक्नॉलॉजीची Redmi नं केली अधिकृत घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/300w-fast-charging-technology-by-redmi-100-percent-battery-in-5-minute/feed/ 0
चुटकीसरशी फुल चार्ज होणार फोन! 240W fast charging टेक्नॉलॉजी येतेय बाजारात; शाओमीला टाकले मागे https://www.91mobiles.com/marathi/240w-fast-charging-technology-launch-with-realme-gt-neo-5/ https://www.91mobiles.com/marathi/240w-fast-charging-technology-launch-with-realme-gt-neo-5/#respond Fri, 06 Jan 2023 05:40:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16607 रियलमीनं अधिकृत घोषणा करून सांगितलं आहे की कंपनीनं 240वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी तयार केली आहे तसेच लवकरच ही टेक्नॉलॉजी असलेला स्मार्टफोन बाजारात येईल. रियलमी जगातील पहिला मोबाइल ब्रँड असेल जो ही चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेला फोन लाँच करेल. आतापर्यंत मार्केटमध्ये 200W फास्ट चार्जिंग असलेले फोन आले आहेत परंतु 240W fast charging technology वर कोणताही डिवायस बनला […]

The post चुटकीसरशी फुल चार्ज होणार फोन! 240W fast charging टेक्नॉलॉजी येतेय बाजारात; शाओमीला टाकले मागे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमीनं अधिकृत घोषणा करून सांगितलं आहे की कंपनीनं 240वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी तयार केली आहे तसेच लवकरच ही टेक्नॉलॉजी असलेला स्मार्टफोन बाजारात येईल. रियलमी जगातील पहिला मोबाइल ब्रँड असेल जो ही चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेला फोन लाँच करेल. आतापर्यंत मार्केटमध्ये 200W फास्ट चार्जिंग असलेले फोन आले आहेत परंतु 240W fast charging technology वर कोणताही डिवायस बनला नाही.

कोणत्या फोनमध्ये मिळेल 240वॉट फास्ट चार्जिंग?

जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणता मोबाइल फोन एवढ्या दमदार फास्ट चार्जिंगसह येणार आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे Realme GT Neo 5. रियलमी कंपनीनं सांगितलं आहे की जीटी नियो5 फोन 240वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारा पहिला मोबाइल असेल. हा डिवायस पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारी 2023 मध्ये मार्केटमध्ये एंट्री करू शकतो. पुढे आम्ही या स्मार्टफोनच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

कसा असेल Realme GT Neo 5?

लिक्सनुसार, Realme GT Neo 5 स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा मोठा डिस्प्ले मिळेल, जो 2,772×1,240 पिक्सेल रिजोल्यूशनला सपोर्ट करणारा 1.5K ओएलईडी डिस्प्ले असेल आणि 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. प्रोसेसिंगसाठी Realme GT Neo 5 स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर देण्यात येईल. जोडीला 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 512GB पर्यंत UFS4.0 स्टोरेज दिली जाऊ शकते.

Realme GT Neo 5 मध्ये Android 13 आधारित रियलमी युआय 4.0 ची स्किन मिळू शकते. या फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Realme GT Neo 5 स्मार्टफोनमध्ये 50MP Sony IMX890 सेन्सर प्रायमरी कॅमेऱ्याचे काम करेल, जोडीला 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि 2MP चा माक्रो कॅमेरा मिळेल. फोनमधील फ्रंट कॅमेऱ्याची माहिती मात्र अद्याप मिळाली नाही.

Realme GT Neo 5 स्मार्टफोन दोन वेगवेगळ्या बॅटरी आणि फास्ट चार्जिंग व्हेरिएंटसह लाँच होईल. यातील एका मॉडेलमध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात येईल जो 150W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. तर दुसऱ्या मॉडेलमध्ये 4,600mAh ची छोटी बॅटरी मिळेल परंतु हा व्हेरिएंट 240W च्या दणकट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल, त्यामुळे काही मिनिटांतच हा हँडसेट फुलचार्ज होईल. हा डिवाइस इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करेल आणि यात एक प्लास्टिक फ्रेम देण्यात येईल. टिपस्टरनुसार, Realme GT Neo 5 मध्ये RBG लाइट्सचं फिचर असेल, जे पहिल्यांदाच कंपनीच्या स्मार्टफोनमध्ये मिळेल.

The post चुटकीसरशी फुल चार्ज होणार फोन! 240W fast charging टेक्नॉलॉजी येतेय बाजारात; शाओमीला टाकले मागे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/240w-fast-charging-technology-launch-with-realme-gt-neo-5/feed/ 0
स्लो चार्ज होत आहे का तुमचा स्मार्टफोन? जाणून घ्या कारणे आणि स्वतःच करा उपाय https://www.91mobiles.com/marathi/how-to-fast-charge-your-smartphone-tips-and-tricks/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-fast-charge-your-smartphone-tips-and-tricks/#respond Tue, 08 Sep 2020 13:16:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8042 पुढे आम्ही काही अश्या टिप्स सांगितल्या आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही मोबाईल फोन फास्ट चार्ज करू शकाल.

The post स्लो चार्ज होत आहे का तुमचा स्मार्टफोन? जाणून घ्या कारणे आणि स्वतःच करा उपाय first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
नवीन स्मार्टफोन घेताना आपण फोनचा लुक, कॅमेरा आणि प्रोसेसर सारख्या प्वाइंट्स सोबतच त्याच्या बॅटरीला पण तेवढेच महत्व देतो. असे करणे आवश्यक आहे, कारण जेव्हा फोन मध्ये चांगली बॅटरी नसते तेव्हा त्यात असलेल्या इतर गोष्टी पण निरुपयोगी होतात. महागडा फोन पण कामाचा राहत नाही जेव्हा त्यात बॅटरी नसते. सध्या स्मार्टफोन कंपन्या व ब्रँड्स मोठ्या बॅटरी सोबतच फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी पण घेऊन येत आहेत. पण एका वेळेनंतर फोन बॅटरीचा बॅकअप कमी होऊ लागतो हे तुम्ही पहिले असेल आणि चार्जिंग पण स्लो होते. फोनचा चार्जिंग स्पीड कमी होतो याकडे आपले कधी लक्ष जास्त जात नाही. अशी अनेक कारणे आहेत ज्यांच्यामुळे स्मार्टफोनचा चार्जिंग स्पीड स्लो होतो. जर तुमचा स्मार्टफोन पण चार्ज होण्यास जास्त वेळ घेत असेल तर पुढे आम्ही काही अश्या टिप्स सांगितल्या आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही मोबाईल फोन फास्ट चार्ज करू शकाल.

1. ओरिजनल चार्जरचा करा वापर

अनेकदा फोन बॉक्स मध्ये आलेला चार्जर हरवतो किंवा बिघडतो. त्यानंतर स्वस्त मिळतोय म्हणून लोक कोणत्याही लोकल चार्जरने फोन चार्ज करतात. असे केल्याने फक्त फोन स्लो चार्ज होतो असे नाही तर असा डुप्लिकेट किंवा नकली चार्जरच फोनची बॅटरी मध्ये ब्लास्ट होण्यामागे कारण बनतो, जे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.

2. डुप्लिकेट डेटा केबल पासून लांब रहा

अनेकदा चार्जर सोबत येणारी यूएसबी केबल तुटते किंवा खराब होते. त्यानंतर लोक फक्त मोबाईलच नाही तर आता कोणत्याही डिवाईसच्या डेटा केबलने आपला फोन चार्ज करू लागतात. चार्जर प्रमाणेच नकली यूएसबी केबलचा वापर फक्त फोन स्लो चार्ज करत नाही तर सोबतच बॅटरीचे स्वास्थ्य पण बिघडवतो. असे सतत केल्याने कालांतराने फोनची बॅटरी पूर्णपणे खराब होते आणि मग फोन कामातून जातो.

3. फोन कवर काढून चार्ज करा

लुक आणि डिजाईनमुळे आता असे फोन्स बनणे बंद झाले आहेत ज्यांचा बॅक कवर काढून बॅटरी काढता येते. आता फोन्सची बॅटरी रिमूवेबल नसते. तसेच स्टाईल व सुरक्षेसाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या फोन कवरचा पण वापर करतात. विशेष म्हणजे जेव्हा फोन चार्ज केला जातो तेव्हा बॅटरी हीट रिलीज करते. त्यामुळे कवर असल्यास उष्णता अडकून राहते आणि बाहेर जात नाही. फोन गरम झाल्यामुळे बॅटरीची इफिशन्सी म्हणजे क्षमता पण कमी होते. कवर नसेल तर हीट बाहेर निघेल तसेच फोन फास्ट चार्ज होईल.

4. हे मोड्स करा ऑन

फोनची बॅटरी जेव्हा खूप कमी होते तेव्हा चार्जिंग आणि प्रोसेसिंगचा जास्त लोड पडतो. लो बॅटरी असताना लोकेशन, जीपीएस, डेटा व सिंक इत्यादि बंद केल्यास बॅटरीची खपत कमी होईल आणि तिला चार्ज होण्यास सपोर्ट मिळेल. अश्यावेळी फोन मधील Power saving mode व असे इतर ऑप्शन ऑन करा जे बॅकग्राउंड ऍप्स चालू देत नाहीत म्हणजे स्मार्टफोन वेगाने चार्ज होईल.

5. स्विच ऑफ करून करा चार्ज

चार्जिंग चालू असताना फोनचा वापर केला नाही तर चांगलेच किंवा फोन थोडा वेळ स्विच ऑफच करावा. असे केल्याने फोनची सेल्युलर कनेक्टिविटी खंडित होईल आणि फोन वेगाने चार्ज होण्यास सुरवात होईल. तर दुसरीकडे फोन थोडा वेळ स्विच ऑफ केल्याने फोनच्या बॅटरी व प्रोसेसिंगला पण आराम मिळतो आणि त्यांची क्षमता वाढते.

वरील सर्व टिप्स तुम्ही पण वापरा आणि इतरांना पण सांगा. कारण हे उपाय फोन वेगाने चार्ज करण्यास मदत करतील तसेच तुमच्या स्मार्टफोनची हेल्थ मेन्टेन करण्यास आणि त्याचे आयुष्य वाढवण्यास मदत करतील.

The post स्लो चार्ज होत आहे का तुमचा स्मार्टफोन? जाणून घ्या कारणे आणि स्वतःच करा उपाय first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-fast-charge-your-smartphone-tips-and-tricks/feed/ 0
गजब, अशी टेक्नोलॉजी जी 1 मिनिटांत 80 टक्के चार्ज करेल स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/new-fast-charge-technology/ https://www.91mobiles.com/marathi/new-fast-charge-technology/#respond Tue, 03 Dec 2019 14:34:31 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5953 रिपोर्टनुसार हुवावे P30 मध्ये इस टेक्नॉलजीचा वापर करण्यात आला आहे.

The post गजब, अशी टेक्नोलॉजी जी 1 मिनिटांत 80 टक्के चार्ज करेल स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सध्या स्मार्टफोन मध्ये अनेक प्रकारच्या टेक्नोलॉजीचा वापर केला जात आहे. पण सर्व टेक्नॉलॉजीच्या मध्ये हँडसेट मध्ये फास्ट चार्जिंग एक असा फीचर आहे जो जवळपास सर्वांची गरज आहे. या टेक्नोलॉजीच्या मदतीने कमी वेळात फोन चार्ज केला जाऊ शकतो. सध्या शाओमी आणि वीवो पण आपल्या फास्ट चार्जिंग टेक्नॉलजी वर काम करत आहे. आणि यूनीवर्सिटी ऑफ साइंस अँड टेक्नॉलजी ऑफ चाइनाचे प्रोफेसर हुआंग युनहुई ने एक नवीन टेक्नॉलजी सादर केली आहे जी स्मार्टफोन फक्त 1 मिनिटांत 80 टक्के चार्ज होईल.

हि टेक्नोलॉजी प्रोफेसरने पेकिंग यूनिवर्सिटी ग्लोबल अलुमनी फोरम मध्ये प्रदर्शित केली आहे. हि नवीन टेक्नॉलजी ‘कंस्ट्रक्शन आणि सिनर्जी मॅकॅनिज्म ऑफ हाई परफॉर्मेंस कंपोजाइट इलेक्ट्रोड मटेरियल्स फॉर एनर्जी स्टोरेज’ प्रजेक्टचा भाग आहे. रिपोर्टनुसार हुवावे P30 मध्ये इस टेक्नॉलजीचा वापर करण्यात आला आहे.

शाओमी आणि वीवो पण आपल्या फास्ट चार्जिंग टेक्नॉलजी वर काम करत आहे. वीवोचा दावा आहे कि कंपनी 120W फास्ट चार्जिंग (फ्लॅश चार्ज) टेक्नॉलजी वर काम करत आहे. शाओमीने पण एक खास टेक्नॉलजी सादर केली आहे. शाओमीच्या या टेक्नॉलजीच्या मदतीने 4,000mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन फक्त 17 मिनिटांत फुल चार्ज होईल.

शाओमी आपल्या 100 W सुपर चार्ज टर्बो टेक्नॉलजी वर गेल्या काही दिवसांपासून काम करत आहे आणि या वर्षांच्या सुरवातीला कंपनीने हि लोकांसमोर ठेवली होती. शाओमीने डेवेलपर कॉन्फ्रेंस मध्ये 100 W फास्ट चार्जिंग टेक्नॉलजी सादर केली होती.

Vivo ने Super FlashCharge 120W टेक्नोलॉजी सादर केली आहे. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने 4,000एमएएच बॅटरी च्या बॅटरीला सपोर्ट करणारा स्मार्टफोन या टेक्नॉलॉजी द्वारे फक्त 5 मिनिटांतच 0 ते 50 टक्क्यांपर्यंत चार्ज केला जाऊ शकतो. या एडवांस टेक्नॉलॉजी बद्दल बोलायचे तर Super FlashCharge नवीन चार्ज पंप टेक्नॉलॉजी द्वारे 120W (20V/6A) पर्यंतच्या स्पीडने फोन चार्ज करते. हि टेक्नॉलॉजी कंपनीच्या एडप्टर आणि यूएसबी टाईप-सी केबल सोबतच चालते. तसेच बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम (BMS) चार्जिंग दरम्यान विजेचा वॉल्ट कंट्रोल करून बॅलेंस करते.

फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीयेत्या काळात अजून चांगली होताना दिसत आहे. सध्या फास्ट चार्जिंग वायरलेस चार्जिंगपेक्षा चांगली मानली जाते. वेळ कमी असल्यामुळे आणि फोनच्या गरजेमुळे फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी खूप यशस्वी पण झाली आहे.

The post गजब, अशी टेक्नोलॉजी जी 1 मिनिटांत 80 टक्के चार्ज करेल स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/new-fast-charge-technology/feed/ 0