चुटकीसरशी फुल चार्ज होणार फोन! 240W fast charging टेक्नॉलॉजी येतेय बाजारात; शाओमीला टाकले मागे

रियलमीनं अधिकृत घोषणा करून सांगितलं आहे की कंपनीनं 240वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी तयार केली आहे तसेच लवकरच ही टेक्नॉलॉजी असलेला स्मार्टफोन बाजारात येईल. रियलमी जगातील पहिला मोबाइल ब्रँड असेल जो ही चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेला फोन लाँच करेल. आतापर्यंत मार्केटमध्ये 200W फास्ट चार्जिंग असलेले फोन आले आहेत परंतु 240W fast charging technology वर कोणताही डिवायस बनला नाही.

कोणत्या फोनमध्ये मिळेल 240वॉट फास्ट चार्जिंग?

जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणता मोबाइल फोन एवढ्या दमदार फास्ट चार्जिंगसह येणार आहे, तर या प्रश्नाचं उत्तर आहे Realme GT Neo 5. रियलमी कंपनीनं सांगितलं आहे की जीटी नियो5 फोन 240वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारा पहिला मोबाइल असेल. हा डिवायस पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारी 2023 मध्ये मार्केटमध्ये एंट्री करू शकतो. पुढे आम्ही या स्मार्टफोनच्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

कसा असेल Realme GT Neo 5?

लिक्सनुसार, Realme GT Neo 5 स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा मोठा डिस्प्ले मिळेल, जो 2,772×1,240 पिक्सेल रिजोल्यूशनला सपोर्ट करणारा 1.5K ओएलईडी डिस्प्ले असेल आणि 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. प्रोसेसिंगसाठी Realme GT Neo 5 स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर देण्यात येईल. जोडीला 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 512GB पर्यंत UFS4.0 स्टोरेज दिली जाऊ शकते.

Realme GT Neo 5 मध्ये Android 13 आधारित रियलमी युआय 4.0 ची स्किन मिळू शकते. या फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Realme GT Neo 5 स्मार्टफोनमध्ये 50MP Sony IMX890 सेन्सर प्रायमरी कॅमेऱ्याचे काम करेल, जोडीला 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि 2MP चा माक्रो कॅमेरा मिळेल. फोनमधील फ्रंट कॅमेऱ्याची माहिती मात्र अद्याप मिळाली नाही.

Realme GT Neo 5 स्मार्टफोन दोन वेगवेगळ्या बॅटरी आणि फास्ट चार्जिंग व्हेरिएंटसह लाँच होईल. यातील एका मॉडेलमध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात येईल जो 150W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. तर दुसऱ्या मॉडेलमध्ये 4,600mAh ची छोटी बॅटरी मिळेल परंतु हा व्हेरिएंट 240W च्या दणकट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल, त्यामुळे काही मिनिटांतच हा हँडसेट फुलचार्ज होईल. हा डिवाइस इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करेल आणि यात एक प्लास्टिक फ्रेम देण्यात येईल. टिपस्टरनुसार, Realme GT Neo 5 मध्ये RBG लाइट्सचं फिचर असेल, जे पहिल्यांदाच कंपनीच्या स्मार्टफोनमध्ये मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here