Galaxy Note 10 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 09 Nov 2020 12:54:10 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy Note 10 ची किंमत झाली 27,000 रुपयांनी कमी, विकत घेण्याची आहे सुवर्णसंधी https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-price-cut-in-india-offline/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-price-cut-in-india-offline/#respond Mon, 09 Nov 2020 12:54:10 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8866 91मोबाईल्सला ऑफलाइन रिटेल स्टोर्स कडून मिळालेल्या माहितीनुसार सॅमसंगने गॅलेक्सी नोट 10 च्या किंमतीत 27,695 रुपयांची कपात करण्यात आली आहे, त्यानंतर याची किंमत फक्त 45,000 रुपये झाली आहे.

The post Samsung Galaxy Note 10 ची किंमत झाली 27,000 रुपयांनी कमी, विकत घेण्याची आहे सुवर्णसंधी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगने फेस्टिवल सीजन पाहता आपल्या अनेक दमदार स्मार्टफोन वर जबरदस्त ऑफर्सची घोषणा केली होती. तसेच आता कंपनीने Samsung Galaxy Note 10 वर बेस्ट डील ऑफर केली आहे. 91मोबाईल्सला ऑफलाइन रिटेल स्टोर्स कडून मिळालेल्या माहितीनुसार सॅमसंगने गॅलेक्सी नोट 10 च्या किंमतीत 27,695 रुपयांची कपात करण्यात आली आहे, त्यानंतर याची किंमत फक्त 45,000 रुपये झाली आहे. या फोन मध्ये प्राईस कटचा फायदा ऑफलाइन रिटेल वरून विकत घेतल्यावर मिळेल. ऑनलाइन विकत घेतल्यास पण या फोन सह डिस्काउंट मिळत आहे, पण ऑफलाइन विकत घेतल्यास जास्त फायदा आहे.

ऑनलाइन किंमत

सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 कंपनीने 69,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. सध्या सॅमसंगच्या ऑफिशियल वेबसाइट वर हा फोन 57,100 रुपयांमध्ये विकला जात आहे. वहीं, अमेझॉन वर फोनची किंमत अजूनही 73,600 रुपये दिसत आहे. आमच्या ऑफलाइन रिटेल सोर्सनुसार, कंपनीने फोनच्या सर्व कलर वेरिएंटच्या किंमतीत कपात केली आहे.

हे देखील वाचा : Samsung Galaxy A12 लवकरच होईल लॉन्च, वेबसाइट वर झाला लिस्ट

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy Note 10 मध्ये 2280 X 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.3-इंचाचा एमोलेड डिस्प्ले आहे जो 401पीपीआई सह HDR10+ क्वॉलिटीला सपोर्ट करती आहे. गॅलेक्सी नोट 10 च्या फ्रंट पॅनल वर अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेंसर पण मिळेल. Galaxy Note 10 चे डायमेंशन 71.8 x 151.0 x 7.9एमएम आहे तसेच याचे वजन 168ग्राम आहे. विशेष म्हणजे Galaxy Note 10 सह येणाऱ्या S Pen चे वजन फक्त 3.04ग्राम आहे.

Samsung Galaxy Note 10 अँड्रॉइड आपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड 9 पाई वर सादर केला गेला आहे. हा डिवायस ऑक्टा-कोर प्रोसेसर सह 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या सॅमसंगच्या एक्सनॉस 9825 चिपसेट वर चालतो. Samsung Galaxy Note 10 4G LTE सोबतच 5G ला सपोर्ट करतो. तसेच गॅलेक्सी नोट 10 मध्ये ब्लूटूथ 5, एनएफसी, जीपीएस व वाय-फाई सोबतच यूएसबी टाईप-सी सारखे ऑप्शन्स आहेत. तसेच पावर बॅकअपसाठी Samsung Galaxy Note 10 मध्ये 3,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Exclusive: Samsung Galaxy M12/ F12 ची लाइव इमेज आणि स्पेसिफिकेशन्स आले समोर, जाणून घ्या याबाबत सर्वकाही

Samsung Galaxy Note 10 फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. डिवायसच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.2 अपर्चर असलेली 16-मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस, एफ/1.5-एफ/2.4 अपर्चर असलेली 12-मेगापिक्सलची वाइड लेंस आणि एफ/2.1 अपर्चर असलेली 12-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी Galaxy Note 10 एफ/2.2 अपर्चर असलेल्या 10-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 व्हिडीओ

The post Samsung Galaxy Note 10 ची किंमत झाली 27,000 रुपयांनी कमी, विकत घेण्याची आहे सुवर्णसंधी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-price-cut-in-india-offline/feed/ 0
256जीबी स्टोरेज आणि पंच-होल डिस्प्ले सह लॉन्च झाले Samsung Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-note-10-launched-in-india-know-price-launch-offers/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-note-10-launched-in-india-know-price-launch-offers/#respond Tue, 20 Aug 2019 13:41:09 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5070 सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 ची भारतात किंमत 69,999 रुपये ठेवण्यात आली आहे

The post 256जीबी स्टोरेज आणि पंच-होल डिस्प्ले सह लॉन्च झाले Samsung Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंगने आज भारतात आपले दोन नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+ लॉन्च केले आहेत. कंपनीने या महिन्याच्या सुरवातीला हे दोन्ही स्मार्टफोन्स न्यूयॉर्क मध्ये सादर केले होते. लॉन्चच्या आधीच सॅमसंगने या दोन्ही डिवाइसच्या भारतीय किंमतींची माहिती पण दिली होती. चला जाणून घेऊया या दोन्ही फोनची वैशिष्ट्ये आणि स्पेसिफिकेशन्स.

प्री-बुकिंग

फोनची प्री-बुकिंग 8 ऑगस्टला सुरु झाली होती जी 22 ऑगस्ट पर्यंत चालू राहील. ऑरा ग्लो, ऑरा वाइट आणि ऑरा ब्लॅक कलर मध्ये आलेला हा फोन विकत घेऊ इच्छित असलेले ग्राहक सॅमसंगच्या वेबसाइट सोबतच फ्लिपकार्ट, अमेझॉन, पेटीएम आणि टाटा क्लिक वर प्री-बुक करू शकतात.

किंमत आणि सेल

किंमत पाहता सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 ची भारतात किंमत 69,999 रुपये ठेवण्यात आली आहे जी 8जीबी रॅम आणि 256जीबी स्टोरेज वेरियंटची आहे. तसेच गॅलेक्सी नोट 10+ च्या 12जीबी रॅम+256जीबी वेरिएंटची किंमत 79,999 रुपये आहे. फोनचा 12जीबी रॅम+512जीबी स्टोरेज असलेल्या टॉप वेरियंटची किंमत 89,999 रुपये आहे. दोन्ही फोन 23 ऑगस्ट पासून सॅमसंग ई-स्टोर, फ्लिपकार्ट, अमेझॉन, पेटीएम, टाट क्लिक आणि रिटेल स्टोर वर मिळेल.

प्री-बुकिंग ऑफर्स

फोनची प्री-बुकिंग वर अनेक आकर्षक ऑफर दिल्या जात आहेत. जर तुम्ही फोन प्री-बुक केला तर तुम्हाला याच्या बुकिंग वर गॅलेक्सी बड्स 9,999 रुपयांच्या ऐवजी 4,999 रुपयांमध्ये मिळतील. तसेच फोन प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांना 19,990 रुपयांचा Galaxy Watch Active फक्त 9,999 रुपयांमध्ये मिळेल.

रिटेल आउटलेट आणि सॅमसंगच्या साइट वर फोन HDFC बॅंकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डने प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांना 6,000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. इतकेच नव्हे तर दुसऱ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर पण कॅशबॅक, नो-कॉस्ट ईएमआई आणि एक्स्ट्रा 10% दिला जात आहे.

स्पेसिफिकेशन्स

Galaxy Note 10 आणि Note 10 Plus बद्दल बोलायचे तर दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये पंच-होल डिजाइन सह इनफिनिटी-ओ डाइनॅमिक AMOLED स्क्रीन देण्यात आली आहे जी HDR10+ सर्टिफाइड आहे. तसेच दोन्ही फोन मध्ये सॅमसंगचा 7एनएम Exynos 9825 प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबतच हे हँडसेट एंडरॉयड 9 पाई वर बेस्ड OneUI ऑपरेटिंग सिस्टम वर चालतात.

फोटोग्राफी साठी गॅलेक्सी नोट 10+ मध्ये 16 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड लेंस सह 12 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस, एक 12 मेगापिक्सलची टेलिफोटो लेंस आणि एक 3डी डेप्थ लेंस देण्यात आली आहे. नोट 10 च्या मागे पण हाच कॅमेरा सेटअप आहे, पण यात 3डी डेप्थ सेंसर नाही.

बॅटरीच्या बाबतीत दोन्ही फोन वेगळे आहेत. गॅलेक्सी नोट 10 मध्ये 3500mAh ची बॅटरी आणि नोट10+ मध्ये 4,300mAh ची बॅटरी आहे. तसेच दोन्ही डिवाइस 25वॉट च्या फास्ट चार्जिंग सह येतात. गॅलेक्सी नोट 10+ चे एक वैशिट्ये असे कि हा 45वॉट च्या फास्ट चार्जिंगला पण सपोर्ट करतो.

सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 वीडियो

The post 256जीबी स्टोरेज आणि पंच-होल डिस्प्ले सह लॉन्च झाले Samsung Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note-10-note-10-launched-in-india-know-price-launch-offers/feed/ 0
बघा Samsung Galaxy Note10 चे एक्सक्लूसिव 5K रेंडर आणि 360डिग्री वीडियो https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note10-5k-renders-and-360-degree-video/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note10-5k-renders-and-360-degree-video/#respond Thu, 06 Jun 2019 14:57:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4517 सॅमसंग Galaxy Note 10 मध्ये 3.5एमएम हेडफोन जॅक नसेल

The post बघा Samsung Galaxy Note10 चे एक्सक्लूसिव 5K रेंडर आणि 360डिग्री वीडियो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही महिन्यात सॅमसंगच्या स्मार्टफोन Samsung Galaxy Note 10 बद्दल अनेक लीक्स समोर आले आहेत. आता पर्यंत मिळालेल्या माहिती नुसतं हा स्मार्टफोन दोन वेरियंट मध्ये लॉन्च होईल. एक वेरियंट LTE आणि दुसरा 5G कनेक्टिविटी सह येईल. सॅमसंग च्या या आगामी डिवाईसचा लुक कसा असेल तसेच हा स्मार्टफोन कोणत्या डिजाईन सह येईल, अश्या सर्व माहितीसह 91मोबाईल्स सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 चा एक्सक्लूसिव 360डिग्री वीडियो आणि काही हाई रेजोल्यूशन फोटोज तुमच्यासाठी घेऊन आला आहे.

91मोबाईल्स ने Samsung Galaxy Note 10 च्या या एक्सक्लूसिव मीडिया कंटेंट साठी प्रसिद्ध टिप्सटर ऑनलीक्स शी हात मिळवणी केली आहे आणि सॅमसंगच्या आगामी हाईएंड फ्लॅगशिप डिवाईसचा पहिला लुक तुमच्यासाठी आणला आहे. Samsung Galaxy Note 10 बद्दल बोलायचे तर यात इनफिनिटी ओ डिस्प्ले मध्ये सेल्फी होल असेल. हा राइट साइड ऐवजी सेंटर मध्ये दिला जाईल. तसेच यात 6.3-इंचाचा डिस्प्ले असेल जो Galaxy Note 9 पेक्षा थोडा छोटा असेल. रेंडर मध्ये दोन्ही साइड कर्व्ड एज सह दाखवण्यात आल्या आहेत. तर चारही बाजूला बारीक बेजल आहेत.

अशा आहे कि फोन मध्ये अमोलेड पॅनल सह एचडीआर10+ सपोर्ट आणि 1,440 x 3,040पिक्सल रेजोल्यूशन असेल. मागची बाजू पाहता Samsung Galaxy Note 10 चा रियर पॅनल ग्लास बॅक सह येईल. सोयाबीतच यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. तसेच सॅमसंग Galaxy Note 10 मध्ये 3.5एमएम हेडफोन जॅक नसेल आणि बिक्सबी बटण वेगळा दिला जाईल. याआधी 3.5एमएम जॅक Apple, Google, आणि OnePlus ने आपल्या स्मार्टफोन्स मधून काढला आहे.

तसेच फोनच्या डाव्या बाजूला पावर आणि वॉल्यूम बटण असतील. सोबतच बॉटम एज वर स्पीकर ग्रिल, एस-पेन, माइक, टाइप-सी पोर्ट चार्जिंग साठी आणि ई-सिम कार्ड ट्रे असेल. हँडसेट 162.6 x 77.4 x 7.9एमएम साइजचा असेल. @onleaks नुसार Galaxy Note 10 मध्ये एक थिन मेटल फ्रॅम असेल जशी आपण Samsung Galaxy S10 5G मध्ये बघितली आहे.

स्पेसिफिकेशन्स पाहता Galaxy Note 10 मध्ये स्नॅपड्रॅगॉन 855/ Exynos 9820 एसओसी, 12जीबी पर्यंत रॅम आणि एंडरॉयड 9 पाई ऑपरेटिंग सिस्टम असेल. सोबत सॅमसंग Galaxy Note 10 Pro पण लॉन्च केला जाऊ शकतो. हँडसेट बद्दल बोलले जात आहे कि कंपनी यात 6.75-इंचाची स्क्रीन, क्वार्ड कॅमेरा सेटअप (टीओएफ सेंसर) आणि 45 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट देईल.

The post बघा Samsung Galaxy Note10 चे एक्सक्लूसिव 5K रेंडर आणि 360डिग्री वीडियो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-note10-5k-renders-and-360-degree-video/feed/ 0