बघा Samsung Galaxy Note10 चे एक्सक्लूसिव 5K रेंडर आणि 360डिग्री वीडियो

काही महिन्यात सॅमसंगच्या स्मार्टफोन Samsung Galaxy Note 10 बद्दल अनेक लीक्स समोर आले आहेत. आता पर्यंत मिळालेल्या माहिती नुसतं हा स्मार्टफोन दोन वेरियंट मध्ये लॉन्च होईल. एक वेरियंट LTE आणि दुसरा 5G कनेक्टिविटी सह येईल. सॅमसंग च्या या आगामी डिवाईसचा लुक कसा असेल तसेच हा स्मार्टफोन कोणत्या डिजाईन सह येईल, अश्या सर्व माहितीसह 91मोबाईल्स सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 चा एक्सक्लूसिव 360डिग्री वीडियो आणि काही हाई रेजोल्यूशन फोटोज तुमच्यासाठी घेऊन आला आहे.

91मोबाईल्स ने Samsung Galaxy Note 10 च्या या एक्सक्लूसिव मीडिया कंटेंट साठी प्रसिद्ध टिप्सटर ऑनलीक्स शी हात मिळवणी केली आहे आणि सॅमसंगच्या आगामी हाईएंड फ्लॅगशिप डिवाईसचा पहिला लुक तुमच्यासाठी आणला आहे. Samsung Galaxy Note 10 बद्दल बोलायचे तर यात इनफिनिटी ओ डिस्प्ले मध्ये सेल्फी होल असेल. हा राइट साइड ऐवजी सेंटर मध्ये दिला जाईल. तसेच यात 6.3-इंचाचा डिस्प्ले असेल जो Galaxy Note 9 पेक्षा थोडा छोटा असेल. रेंडर मध्ये दोन्ही साइड कर्व्ड एज सह दाखवण्यात आल्या आहेत. तर चारही बाजूला बारीक बेजल आहेत.

अशा आहे कि फोन मध्ये अमोलेड पॅनल सह एचडीआर10+ सपोर्ट आणि 1,440 x 3,040पिक्सल रेजोल्यूशन असेल. मागची बाजू पाहता Samsung Galaxy Note 10 चा रियर पॅनल ग्लास बॅक सह येईल. सोयाबीतच यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. तसेच सॅमसंग Galaxy Note 10 मध्ये 3.5एमएम हेडफोन जॅक नसेल आणि बिक्सबी बटण वेगळा दिला जाईल. याआधी 3.5एमएम जॅक Apple, Google, आणि OnePlus ने आपल्या स्मार्टफोन्स मधून काढला आहे.

तसेच फोनच्या डाव्या बाजूला पावर आणि वॉल्यूम बटण असतील. सोबतच बॉटम एज वर स्पीकर ग्रिल, एस-पेन, माइक, टाइप-सी पोर्ट चार्जिंग साठी आणि ई-सिम कार्ड ट्रे असेल. हँडसेट 162.6 x 77.4 x 7.9एमएम साइजचा असेल. @onleaks नुसार Galaxy Note 10 मध्ये एक थिन मेटल फ्रॅम असेल जशी आपण Samsung Galaxy S10 5G मध्ये बघितली आहे.

स्पेसिफिकेशन्स पाहता Galaxy Note 10 मध्ये स्नॅपड्रॅगॉन 855/ Exynos 9820 एसओसी, 12जीबी पर्यंत रॅम आणि एंडरॉयड 9 पाई ऑपरेटिंग सिस्टम असेल. सोबत सॅमसंग Galaxy Note 10 Pro पण लॉन्च केला जाऊ शकतो. हँडसेट बद्दल बोलले जात आहे कि कंपनी यात 6.75-इंचाची स्क्रीन, क्वार्ड कॅमेरा सेटअप (टीओएफ सेंसर) आणि 45 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट देईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here