256जीबी स्टोरेज आणि पंच-होल डिस्प्ले सह लॉन्च झाले Samsung Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+, जाणून घ्या किंमत

सॅमसंगने आज भारतात आपले दोन नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+ लॉन्च केले आहेत. कंपनीने या महिन्याच्या सुरवातीला हे दोन्ही स्मार्टफोन्स न्यूयॉर्क मध्ये सादर केले होते. लॉन्चच्या आधीच सॅमसंगने या दोन्ही डिवाइसच्या भारतीय किंमतींची माहिती पण दिली होती. चला जाणून घेऊया या दोन्ही फोनची वैशिष्ट्ये आणि स्पेसिफिकेशन्स.

प्री-बुकिंग

फोनची प्री-बुकिंग 8 ऑगस्टला सुरु झाली होती जी 22 ऑगस्ट पर्यंत चालू राहील. ऑरा ग्लो, ऑरा वाइट आणि ऑरा ब्लॅक कलर मध्ये आलेला हा फोन विकत घेऊ इच्छित असलेले ग्राहक सॅमसंगच्या वेबसाइट सोबतच फ्लिपकार्ट, अमेझॉन, पेटीएम आणि टाटा क्लिक वर प्री-बुक करू शकतात.

किंमत आणि सेल

किंमत पाहता सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 ची भारतात किंमत 69,999 रुपये ठेवण्यात आली आहे जी 8जीबी रॅम आणि 256जीबी स्टोरेज वेरियंटची आहे. तसेच गॅलेक्सी नोट 10+ च्या 12जीबी रॅम+256जीबी वेरिएंटची किंमत 79,999 रुपये आहे. फोनचा 12जीबी रॅम+512जीबी स्टोरेज असलेल्या टॉप वेरियंटची किंमत 89,999 रुपये आहे. दोन्ही फोन 23 ऑगस्ट पासून सॅमसंग ई-स्टोर, फ्लिपकार्ट, अमेझॉन, पेटीएम, टाट क्लिक आणि रिटेल स्टोर वर मिळेल.

प्री-बुकिंग ऑफर्स

फोनची प्री-बुकिंग वर अनेक आकर्षक ऑफर दिल्या जात आहेत. जर तुम्ही फोन प्री-बुक केला तर तुम्हाला याच्या बुकिंग वर गॅलेक्सी बड्स 9,999 रुपयांच्या ऐवजी 4,999 रुपयांमध्ये मिळतील. तसेच फोन प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांना 19,990 रुपयांचा Galaxy Watch Active फक्त 9,999 रुपयांमध्ये मिळेल.

रिटेल आउटलेट आणि सॅमसंगच्या साइट वर फोन HDFC बॅंकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डने प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांना 6,000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. इतकेच नव्हे तर दुसऱ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर पण कॅशबॅक, नो-कॉस्ट ईएमआई आणि एक्स्ट्रा 10% दिला जात आहे.

स्पेसिफिकेशन्स

Galaxy Note 10 आणि Note 10 Plus बद्दल बोलायचे तर दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये पंच-होल डिजाइन सह इनफिनिटी-ओ डाइनॅमिक AMOLED स्क्रीन देण्यात आली आहे जी HDR10+ सर्टिफाइड आहे. तसेच दोन्ही फोन मध्ये सॅमसंगचा 7एनएम Exynos 9825 प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबतच हे हँडसेट एंडरॉयड 9 पाई वर बेस्ड OneUI ऑपरेटिंग सिस्टम वर चालतात.

फोटोग्राफी साठी गॅलेक्सी नोट 10+ मध्ये 16 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड लेंस सह 12 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस, एक 12 मेगापिक्सलची टेलिफोटो लेंस आणि एक 3डी डेप्थ लेंस देण्यात आली आहे. नोट 10 च्या मागे पण हाच कॅमेरा सेटअप आहे, पण यात 3डी डेप्थ सेंसर नाही.

बॅटरीच्या बाबतीत दोन्ही फोन वेगळे आहेत. गॅलेक्सी नोट 10 मध्ये 3500mAh ची बॅटरी आणि नोट10+ मध्ये 4,300mAh ची बॅटरी आहे. तसेच दोन्ही डिवाइस 25वॉट च्या फास्ट चार्जिंग सह येतात. गॅलेक्सी नोट 10+ चे एक वैशिट्ये असे कि हा 45वॉट च्या फास्ट चार्जिंगला पण सपोर्ट करतो.

सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 वीडियो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here