Idea - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:28:15 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 BSNL आणि Vodafone-Idea ने बदलले आपले नाव, जाणून घ्या संपूर्ण माहिती https://www.91mobiles.com/marathi/bsnl-and-vodafone-idea-have-changed-their-operator-name-awareness-for-coronavirus/ https://www.91mobiles.com/marathi/bsnl-and-vodafone-idea-have-changed-their-operator-name-awareness-for-coronavirus/#respond Thu, 02 Apr 2020 11:59:10 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6973 बीएसएनएल यूजर्सना मोबाईल स्क्रीन वर BSNL Mobile च्या जागी आता ‘BSNL Stay at Home’ दिसत आहे.

The post BSNL आणि Vodafone-Idea ने बदलले आपले नाव, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL आणि प्राइवेट कंपनी Vodafone Idea ने आपल्या नेटवर्क ऑपरेटर नावात बदल केला आहे. हे ऐकून तुम्हाला पण हैराणी होत असेल कि कंपन्यांनी असे का केले असेल. यामागील कारण असे कि जगभरात पसरलेल्या कोरोना सारख्या महामारी बाबत यूजर्सना जागरूक करण्यासाठी कंपन्यांनी आपल्या नेटवर्कच्या नावात बदल केला आहे.

सध्या Covid-19 मुळे चिंताग्रस्त दिसत आहेत. हेच लक्षात घेऊन टेलिकॉम कंपन्या आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. काहींना काही कारण शोधून त्या यूजर्सना घरात थांबण्यासाठी लोकांना जगरुक करत आहेत. कोरोना वायरस संक्रमण रोखण्यासाठी कोणताही उपाय सापडेलला नाही आणि फक्त सोशल डिस्टेंसिंगच्या माध्यमातून या रोगाला मात दिली जाऊ शकते.

नेटवर्कची नवीन नावे

कोरोना वायरस बाबत लोकांना जागरुक करण्यासाठी बीएसएनएल यूजर्सना मोबाईल स्क्रीन वर BSNL Mobile च्या जागी आता ‘BSNL Stay at Home’ दिसत आहे. तर दुसरीकडे वोडाफोन नेटवर्कचे नाव फोनच्या स्क्रीन वर ‘Vodafone-Be Safe’ असे दिसत आहे.

वाढवली वैधता

इतकेच नव्हे तर दोन्ही कंपन्यांनी इतर टेलीकॉम कंपन्यांप्रमाणे एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. लॉकडाउन च्या काळात कोणत्याही यूजरला रिचार्ज करावा लागू नये यासाठी कंपन्यांनी यूजर्सच्या प्रीपेड प्लानची वैधता वाढवली आहे. बीएसएनएलने आपल्या प्रीपेड प्लान्सची वैधता 20 एप्रिल 2020 पर्यंत वाढवली आहे. त्याचबरोबर कंपनी सर्व सब्सक्राइबर्सना 10 रुपयांचा टॉक टाइम पण देत आहे. तर दुसरीकडे वोडाफोन-आइडियाने आपल्या प्रीपेड प्लानची वैधता 17 एप्रिल पर्यंत वाढवली आहे आणि फ्री टॉक टाइम दिला जात आहे.

चीनच्या वुहान मध्ये नोव्हेंबर 2019 पासून कोरोना संक्रमणाची सुरवात झाली होती. आज या वायरसच्या विळख्यात चीन समवेत संपूर्ण जग आले आहे. हा खतरनाक वायरस पाहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी संपूर्ण भारतात 21 दिवसांच्या बंदाची घोषणा केली आहे. म्हणजे 14 एप्रिल पर्यंत संपूर्ण देश लॉकडाउन असेल.

The post BSNL आणि Vodafone-Idea ने बदलले आपले नाव, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bsnl-and-vodafone-idea-have-changed-their-operator-name-awareness-for-coronavirus/feed/ 0
Vodafone Idea यूजर्सना मिळाली भेट, प्रीपेड प्लानची वॅलिडिटी वाढली https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-announces-validity-extension-and-rs-10-balance-for-low-income-users-corona-virus-impact/ https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-announces-validity-extension-and-rs-10-balance-for-low-income-users-corona-virus-impact/#respond Wed, 01 Apr 2020 12:46:19 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6962 कंपनीने फीचर्स फोन्सचा वापर करणाऱ्या कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांसाठी प्रीपेड प्लानची वॅलिडिटी 17 एप्रिल पर्यंतसाठी वाढवली आहे.

The post Vodafone Idea यूजर्सना मिळाली भेट, प्रीपेड प्लानची वॅलिडिटी वाढली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतीय टेलीकॉम कंपनी Vodafone Idea ने पण कोरोनोचा प्रभाव पाहून आपल्या प्रीपेड यूजर्सची वॅलिडिटी वाढवण्याची घोषणा केली आहे. वोडाफोन आइडियाच्या आधी BSNL, Jio आणि Airtel ने अशीच घोषणा केली आहे. वोडाफोन आइडियाच्या मते ते कमी इनकम असलेल्या यूजर्ससाठी आपल्या प्लानची वैधता वाढवत आहेत.

कंपनीने फीचर्स फोन्सचा वापर करणाऱ्या कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांसाठी प्रीपेड प्लानची वॅलिडिटी 17 एप्रिल पर्यंतसाठी वाढवली आहे. तसेच अश्या ग्राहकांना 10 रुपयांचा टॉकटाइम पण दिला जाईल.

या घोषणेच्या मागे कंपनीचा उद्देश कोरोना वायरसमुळे चालू असलेल्या लॉकडाउन मध्ये कमी उतपणे असलेल्या ग्राहकांना कॉल करताना कोणतीही अडचण येऊ न देणे हा आहे. याआधी टेलिकॉम कंपनी भारती एयरटेलने सोमवारी घोषणा केली होती कि कंपनी आपल्या 8 कोटी प्रीपेड ग्राहकांची वॅलिडिटी 17 एप्रिल पर्यंत वाढवत आहे. त्याचबरोबर या ग्राहकांना 10 रुपयांचा टॉकटाइम पण देण्यात आला आहे. तसेच जियोफोनच्या ग्राहकांना 17 एप्रिल 2020 पर्यंत कॉलिंगसाठी 100 मिनिट्स आणि 100 SMS फ्री मिळतील.

सरकारी टेलिकॉम कंपन्या BSNL आणि MTNL ने पण आपल्या प्रीपेड मोबाईल सेवेची वॅलिडिटी वाढवण्याची घोषणा केली होती. पण सरकारी टेलीकॉम कंपन्या 20 एप्रिल पर्यंतसाठी BSNL आणि MTNL यूजर्सच्या नंबरची वैधता वाढवत आहेत. सोबतच ग्राहकांना 10 रुपयांचा अतिरिक्त टॉकटाइम दिला जात आहे.

चीनच्या वुहान मध्ये नोव्हेंबर 2019 पासून कोरोना संक्रमणाची सुरवात झाली होती. आज या वायरसच्या विळख्यात चीन समवेत संपूर्ण जग आले आहे. हा खतरनाक वायरस पाहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी संपूर्ण भारतात 21 दिवसांच्या बंदाची घोषणा केली आहे. म्हणजे 14 एप्रिल पर्यंत संपूर्ण देश लॉकडाउन असेल.

The post Vodafone Idea यूजर्सना मिळाली भेट, प्रीपेड प्लानची वॅलिडिटी वाढली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-announces-validity-extension-and-rs-10-balance-for-low-income-users-corona-virus-impact/feed/ 0
वोडाफोन आइडिया ने 50 टक्क्यांपर्यंत वाढवल्या प्रीपेड प्लानच्या किंमती, द्यावे लागतील जास्त पैसे https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-hike-prepaid-recharge-prices-check-new-plans-here/ https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-hike-prepaid-recharge-prices-check-new-plans-here/#respond Mon, 02 Dec 2019 11:50:35 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5931 आता 365 दिवसांची वॅलिडिटी असलेले दोन, 84 दिवसांची वॅलिडिटी असलेले तीन, 28 दिवसांची वॅलिडिटी असलेल्या 4 प्लानच्या व्यतिरिक्त दोन कॉम्बो प्लानचा पण समावेश झाला आहे, ज्यात डेटा आणि टॉकटाइम बेनिफिट मिळतात.

The post वोडाफोन आइडिया ने 50 टक्क्यांपर्यंत वाढवल्या प्रीपेड प्लानच्या किंमती, द्यावे लागतील जास्त पैसे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vodafone-Idea ने आपल्या नवीन आणि महाग झालेल्या टॅरिफ प्लान्सची घोषणा केली आहे. महाग प्लान 3 डिसेंबर पासून लागू होतील. कंपनीने गेल्या महिन्यात सांगितले होतेकि त्यांना बिजनस मध्ये होत असलेल्या तोट्यामुळे टॅरिफच्या किंमती वाढवल्या जातील. टॅरिफच्या किंमतीत वाढल्यावर वोडाफोन-आइडियाचा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान 19 रुपयांचा झाला आहे. तसेच कंपनीने आता दुसऱ्या नेटवर्क्स वर केल्या जाणाऱ्या कॉल्स साठी FUP लिमिट सेट केली आहे.

प्लान रिवाइज झाल्यानंतर वोडाफोनच्या पोर्टफोलियो मध्ये आता 365 दिवसांची वॅलिडिटी असलेले दोन, 84 दिवसांची वॅलिडिटी असलेले तीन, 28 दिवसांची वॅलिडिटी असलेल्या 4 प्लानच्या व्यतिरिक्त दोन कॉम्बो प्लानचा पण समावेश झाला आहे, ज्यात डेटा आणि टॉकटाइम बेनिफिट मिळतात. पुढे तुम्हाला प्लान मध्ये मिळणाऱ्या फायद्यांची माहिती देत आहोत.

कॉम्बो वाउचर

वोडाफोन आइडियाच्या कॉम्बो वाउचर मध्ये 49 रुपये आणि 79 रुपयांच्या रिचार्जचा समावेश आहे. 49 रुपयांच्या वाउचर मध्ये यूजर्सना 38 रुपयांचा टॉकटाइम, 28 दिवसांची वैधता आणि 100MB डेटा मिळेल. तर 79 रुपयांच्या प्लान मध्ये ग्राहकांना 64 रुपयांचा टॉकटाइम, 200MB डेटा आणि 28 दिवसांची वैधता मिळेल.

28 दिवस वैधता असलेले नवीन वाउचर

टॅरिफ रिवाइज केल्यानंतर वोडाफोन-आइडिया यूजर्सना 28 दिवसांची वॅलिडिटी असलेले चार अनलिमिटेड पॅक दिले जात आहेत. यात 149 रुपये, 249 रुपये, 299 रुपये आणि 399 रुपयांच्या प्लानचा समावेश आहे. 149 रुपयांच्या प्लान मध्ये 2जीबी डेटा सह 300 एसएमएस आणि वोडाफोन नेटवर्क साठी अनलिमिटेड कॉलिंग मिळेल. तर 249 रुपयांच्या प्लान मध्ये अनलिमिटेड ऑन-नेट (वोडाफोन-आइडिया नेटवर्क) साठी अनलिमिटेड कॉलिंग, प्रतिदिन 100 एसएमएस सह रोज 1.5जीबी डेटा मिळेल. 299 रुपयांच्या प्लान मध्ये रोज 2जीबी डेटा आणि 399 रुपयांच्या प्लान मध्ये 3जीबी डेली डेटा मिळेल.

84 दिवसांची वैधता असलेले नवीन वाउचर

वोडाफोन-आइडियाने आता 84 दिवसांची वैधता असलेले तीन प्लान कंपनीने सादर केले आहेत. यात 379 रुपये, 599 रुपये आणि 699 रुपयांचे प्लान आहेत. 399 रुपयांच्या प्लान मध्ये ग्राहकांना संपूर्ण वैधतेसाठी 6जीबी डेटा दिला जात आहे. प्लान अनलिमिटेड ऑन-नेट वॉइस कॉलिंग आणि 1000 फ्री एसएमएस सह येतो. 599 रुपयांच्या प्लान बद्दल बोलायचे तर यात प्रतिदिन 1.5जीबी डेटा आणि 699 रुपयांच्या प्लान मध्ये डेली 2जीबी डेटा मिळत आहे. दोन्ही प्लान अनलिमिटेड ऑन-नेट कॉलिंग डेली 100 फ्री एसएमएस सह येतात.

तसेच 379 रुपये, 599 रुपये आणि 699 रुपयांच्या प्लान मध्ये यूजर्सना 3000 मिनिट्स मिळतात, ज्याचा वापर ते दुसऱ्या नेटवर्क वर कॉल करण्यासाठी करू शकतात. 70 दिवसांची वॅलिडिटी असलेले सर्व प्लान्स बंद करण्यात आले आहेत.

365 दिवस वैधता असलेले वाउचर

वोडाफोन-आइडियाने दोन नवीन वार्षिक पॅक सादर केले आहेत. हे प्लान 1,499 रुपये आणि 2,399 रुपयांचे आहेत. दोन्ही प्लान्स मध्ये दुसऱ्या नेटवर्क्स वर कॉल करण्यासाठी 12,000 मिनिट्स मिळतात. तर वोडाफोन आइडियाच्या नेटवर्क वर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. दोन्ही प्लान्सची वैधता 365 दिवसांची आहे. 1,499 रुपयांच्या प्लान मध्ये एकूण 24जीबी डेटा सह एक वर्षासाठी 3600 फ्री एसएमएस मिळतील. तसेच 2,399 रुपयांच्या प्लान मध्ये रोज 1.5जीबी डेटा मिळेल.

वोडाफोन-आइडियाने सांगितले आहे कि ऑन-नेट कॉलिंगची FUP (fair usage policy) लिमिट संपल्यावर प्रत्येक कॉल साठी 6 पैसे प्रति मिनिट द्यावे लागतील.

The post वोडाफोन आइडिया ने 50 टक्क्यांपर्यंत वाढवल्या प्रीपेड प्लानच्या किंमती, द्यावे लागतील जास्त पैसे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-hike-prepaid-recharge-prices-check-new-plans-here/feed/ 0
टेलीकॉम इंडस्ट्री मध्ये भूकंप, सामान्य ग्राहकांवर येणार बोझा, महाग होतील सर्व प्लान्स https://www.91mobiles.com/marathi/indian-telecom-industry-major-loss-agr-decision-supreme-court-dot-vodafone-idea-airtel-jio-explained-marathi-price-hike/ https://www.91mobiles.com/marathi/indian-telecom-industry-major-loss-agr-decision-supreme-court-dot-vodafone-idea-airtel-jio-explained-marathi-price-hike/#respond Tue, 19 Nov 2019 11:58:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5807 कंपनी Idea च्या बिर्ला ग्रुप ने म्हटले आहे कि त्यांच्याकडे शुल्क देण्यासाठी पैसे नाहीत, आता ते अजून गुंवणूक करू शकत नाहीत.

The post टेलीकॉम इंडस्ट्री मध्ये भूकंप, सामान्य ग्राहकांवर येणार बोझा, महाग होतील सर्व प्लान्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Reliance Jio ने जेव्हा भारतीय बाजारात एंट्री घेतली होती तेव्हा टेलीकॉम सेक्टर मध्ये नवीन क्रांती झाली होती. Jio मुळे टेलीकॉम सेवा खूप स्वस्त झाल्या होत्या आणि सर्व कंपन्यांनी स्वस्त टॅरिफ प्लान सादर केले होते. पण आता पुन्हा एकदा इंडियन टेलीकॉम डिपार्टमेंट मध्ये मोठा बदल होणार आहे. यावेळी हा बदल चांगला नाही तर वाईट असणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या एका निर्यणयामुळे टेलीकॉम सेक्टर हादरून गेले आहे आणि याचा थेट परिणाम ग्राहकांना भोगावा लागणार आहे. Vodafone Idea आणि Airtel ने सांगितले आहे कि 1 डिसेंबर पासून ते आपले प्लान्स महाग करणार आहेत. इतकेच नव्हे तर टेलीकॉम यूजर्सना अनेक सेवांसाठी मोठी रक्कम द्यावी लागू शकते. प्लान्स स्वस्त केल्यानंतर आता या कंपन्या इतका कठोर निर्णय का घेत आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे.

सर्वात आधी सांगायचे तर सध्या इंडियन टेलीकॉम इंडस्ट्री इतिहासातील सर्वात मोठ्या तोट्याचा सामना करत आहे. या तोट्याची कुऱ्हाड देशातील 15 टेलीकॉम कंपन्यांवर पडली आहे आणि आता सामान्य यूजर्सना पण टेलीकॉम कंपन्यांच्या तोट्याचा मार सहन करावा लागेल. Vodafone Idea आणि Airtel ला या बदलामुळे मोठा तोटा झाला आहे. बोलले जात आहे कि Vodafone Idea ला 50,921 कोटी तोटा झाला आहे तर Airtel ला पण 23,044 कोटींचे नुकसान झेलावे लागेल आहे. टेलीकॉम कंपन्यांना हादरवणारे नाव आहे AGR!

AGR म्हणजे काय

ऍडजेस्टेड ग्रॉस रेवेन्यू (AGR) म्हणजे समायोजित सकल महसूल. ऍडजेस्टेड ग्रॉस रेवेन्यू दूरसंचार विभागला मिळणार कर आहे, जो वापर आणि लाईसेंस संबंधित सेवांच्या बदल्यात टेलीकॉम कंपन्यांकडून घेतला जातो. हा सर्व वाद AGR चा आहे. 2003 पासून चालू असलेला हा वाद यावर्षी संपवण्यात आला आहे. 24 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टाने एजीआरच्या व्याख्येत बदल केला. कोर्टाने हा वाद संपवत डीओटी च्या बाजूने निर्णय दिला. कोर्टाने आदेश दिले कि सर्व टेलीकॉम कंपन्यांना 3 महिन्यांच्या आत सर्व थकबाकी द्यावी लागेल.

कसला आहे वाद

कोणकोणत्या सेवा ऍडजेस्टेड ग्रॉस रेवेन्यू मध्ये याव्यात याचा हा वाद 15 वर्ष जुना आहे जो साल 2003 पासून चालू आहे. टेलीकॉम कंपन्यांच्या मते फक्त लाईसेंस प्राप्त सेवांवर मिळणारा महसूल AGR च्या अंतर्गत यावा आणि कंपन्या तोच भाग सरकारला देऊ इच्छित होत्या. पण दूरसंचार विभागाचे म्हणणे होते कि AGR अंतर्गत टेलीकॉम कंपन्यांच्या सर्व सेवा याव्यात आणि त्या सर्वांवर आधारित कर वसुली व्हावी.

आतापर्यंत अशी स्थिती होती

AGR अंतर्गत आधी फक्त फोन सेवा संबंधित कमाईचा समावेश करण्यात आला होता. म्हणजे सिम विकणे, कॉलिंग, इंटरनेट, मेसेज, रिंगटोन, अलर्ट व रोमिंग सारख्या सर्विसेज मधून टेलीकॉम कंपन्यांची जी कमाई होत होती, त्याच कमाईच्या होशोबाने कंपन्या सरकारला कर देत होत्या. जुन्या व्याख्येनंतर्गत 5 टक्के स्पेक्ट्रम उपयोग शुल्क आणि 8 टक्के लाईसेंसिंग शुल्कच ऍडजेस्टेड ग्रॉस रेवेन्यू म्हणजे समायोजित सकल महसूलात दिला जात होता.

हा झाला नवीन बदल

DOT म्हणजे दूरसचांर विभागाच्या याचिकेनंतर सुप्रीम कोर्टाने ठरवले आहे कि ऍडजेस्टेड ग्रॉस रेवेन्यू (AGR) अंतर्गत फोन सेवेसोबतच कंपन्यांना मिळणाऱ्या व्याजावर पण टॅक्स घेतला जाईल. इतकेच नव्हे तर नवीन व्याख्येनंतर्गत टेलीकॉम कंपन्या आता आपली मालमत्ता विकून मिळणाऱ्या पैशांवर तसेच एखादी मालमत्ता भाड्याने दिल्यास त्यातून मिळणाऱ्या पैशांवर पण सरकारला टॅक्स देतील. हे सर्व आता पासून AGR अंतर्गत येईल.

1,34,000 कोटींची थकबाकी

दूरसचांर विभागाने जुलै मध्ये सुप्रीम कोर्टात आपला रिपोर्ट दिला होता, ज्यात 15 टेलीकॉम कंपन्यांच्या नावाचा समावेश होता. या लिस्ट मध्ये भारतातील सध्याच्या टेलीकॉम कंपन्यांसोबतच गेल्या अनेक वर्षात इंडियन मार्केट मध्ये गेलेल्या टेलीकॉम कंपन्यांच्या नावांचा पण समावेश होता. या रिपोर्ट मध्ये DOT ने संपूर्ण माहिती दिली होती कि कोणत्या कपंनीचा किती महसूल येणे बाकी आहे. आता ऑक्टोबर मध्ये सुप्रीम कोर्टच्या निर्णयामुळे या टेलीकॉम कंपन्यांना हि रक्कम भरावी लागेल.

यादीतील 15 टेलीकॉम कंपन्यांनी एकूण 1,34,000 कोटी रुपये देणे आहेत. यात 93,000 कोटी रुपये फक्त लाईसेंस टॅक्स, फाईन आणि व्याजाची रक्कम आहे तर 41 हजार कोटी रुपये या कंपन्यांना स्पेक्ट्रम वापरासाठी द्यावे लागतील. या रिपोर्टनुसार Vodafone Idea व Airtel सरकारला 80,000 कोटी रुपये देणे आहेत. तर अनिल अंबानींची R Com 20,000 कोटी रुपये आणि आणि Tata टेलीसर्विसला महसूल म्हणून 13,000 कोटी रुपये द्यावे लागतील.

टेलीकॉम कंपन्यांमध्ये भीतीचे वातावरण

Vodafone कंपनीचे सीईओ Nick read ने सुप्रीम कोर्टाच्या निर्याणानंतर असे म्हटले होते कि कंपनी आता भारतात आता जास्त गुंतवणूक करणार नाही. नंतर टीकाझाल्यामुळे निक यांनी स्पष्टीकरण दिले आणि पंतप्रधान मोदींची माफी मागत म्हटले कि त्यांच्या विधान चुकीच्या अर्थाने सादर करण्यात आले होते. Vodafone च्या पार्टनर कंपनी Idea च्या बिर्ला ग्रुप ने म्हटले आहे कि त्यांच्याकडे शुल्क देण्यासाठी पैसे नाहीत, आता ते अजून गुंवणूक करू शकत नाहीत.

The post टेलीकॉम इंडस्ट्री मध्ये भूकंप, सामान्य ग्राहकांवर येणार बोझा, महाग होतील सर्व प्लान्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/indian-telecom-industry-major-loss-agr-decision-supreme-court-dot-vodafone-idea-airtel-jio-explained-marathi-price-hike/feed/ 0
Jio च्या 149 रुपयांच्या प्लान पेक्षा चांगले आहेत का एयरटेल आणि वोडाफोनचे हे रिचार्ज प्लान, जाणून घ्या यांचे फायदे https://www.91mobiles.com/marathi/comparison-between-reliance-jio-airtel-and-vodafone-prepaid-plan-under-170-rs-know-what-is-best-for-you/ https://www.91mobiles.com/marathi/comparison-between-reliance-jio-airtel-and-vodafone-prepaid-plan-under-170-rs-know-what-is-best-for-you/#respond Fri, 15 Nov 2019 13:40:13 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5798 आम्ही रिलायंस जियोच्या या प्लानची तुलना एयरटेल आणि वोडाफोनच्या या रेंज मधील प्लानशी केली आहे.

The post Jio च्या 149 रुपयांच्या प्लान पेक्षा चांगले आहेत का एयरटेल आणि वोडाफोनचे हे रिचार्ज प्लान, जाणून घ्या यांचे फायदे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेलिकॉम कंपन्यांमध्ये ग्राहकांच्या प्रिय रिलायंस जियो ने अलीकडेच आपल्या 149 रुपयांच्या प्रीपेड प्लान मध्ये बदल केला आहे. यात आधी मिळत असलेले बेनिफिट्स कमी करण्यात आले आहेत. पण बेनिफिट्स कमी कारण्यासोबतच कंपनीने या प्लान मध्ये 300 नॉन-जियो कॉलिंग मिनिट्स दिले आहेत. तर दुसऱ्या कंपन्या जसे कि एयरटेल आणि वोडाफोन आपल्या यूजर्स कडून आईयूसी चार्ज घेत नाहीत. त्यामुळे आम्ही रिलायंस जियोच्या या प्लानची तुलना एयरटेल आणि वोडाफोनच्या या रेंज मधील प्लानशी केली आहे. चला तर जाणून घेऊया कि कोणत्या प्लान मध्ये यूजर्सना काय मिळत आहे.

जियोचा रिवाइज 149 रुपयांचा प्लान

Reliance Jio ने अलीकडेच आपल्या 149 रुपयांच्या प्रीपेड प्लान मध्ये बदल केला आहे. जियोच्या या साझा या प्लान मध्ये यूजर्सना आता 300 नॉन-जियो कॉलिंग मिनिट्स मिळतील. या प्लानची वैधता 28 दिवसांवरून कमी करून 24 दिवस करण्यात आली आहे. प्लान मध्ये आधीप्रमाणे अनलिमिटेड जियो-टू-जियो कॉलिंग, प्रति दिन 1.5 GB 4G डेटा आणि 100 SMS मिळतील. तसेच प्लान मध्ये जियोच्या प्रीमियम ऍप्सचे कॉम्प्लीमेंट्री सब्सक्रिप्शन पण मिळेल.

एयरटेलचा 169 रुपयांचा प्लान

एयरटेल ने जियोला टक्कर देण्यासाठी 169 रुपयांचा प्रीपेड प्लान सादर केला होता. या प्लानची वैधता 28 दिवस आहे. प्लान अंतर्गत यूजर्सना प्रतिदिन 1 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. या कॉलिंगचा लाभ कोणत्याही नेटवर्क वर घेता येईल. इतकेच नव्हे तर यूजर्सना प्रतिदिन 100 मेसेज पण फ्री मिळतील. एयरटेलच्या या प्लान मध्ये यूजर्सना Airtel Xstream ऍप आणि Wynk म्यूजिकचा पण ऍक्सेस मिळतो. तसेच या प्लान मध्ये 20 रुपये जास्त देऊन 4 दिवस जास्त वैधता आणि अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतो.

वोडाफोनचा 169 रुपयांचा प्लान

वोडाफोनच्या 169 रुपयांच्या प्रीपेड प्लानची वैधता 28 दिवस आहे. यात पण एयरटेल प्रमाणे कंपनी यूजर्सना 1 जीबी 4G किंवा 3G डेटा देत आहे. रिचार्ज मध्ये तुम्हाला अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलिंगची सुविधा मिळते. इतकेच नव्हे तर यात प्रति दिन 100 मेसेज फ्री मिळतील. तसेच या प्लान मध्ये यूजर्सना Vodafone Play ऍपचा एक्सेस पण मिळतो.

The post Jio च्या 149 रुपयांच्या प्लान पेक्षा चांगले आहेत का एयरटेल आणि वोडाफोनचे हे रिचार्ज प्लान, जाणून घ्या यांचे फायदे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/comparison-between-reliance-jio-airtel-and-vodafone-prepaid-plan-under-170-rs-know-what-is-best-for-you/feed/ 0
बंद होत आहे MNP सर्विस, सरकारने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या कधी आणि कशाप्रकारे करता येईल दुसऱ्या कंपनीत नंबर पोर्ट https://www.91mobiles.com/marathi/mobile-number-portability-mnp-new-rules-from-11-november-trai-india-jio-airtel-vodafone-idea-bsnl/ https://www.91mobiles.com/marathi/mobile-number-portability-mnp-new-rules-from-11-november-trai-india-jio-airtel-vodafone-idea-bsnl/#respond Mon, 04 Nov 2019 11:35:01 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5660 हि सर्विस 11 नोव्हेंबर नंतर पुन्हा सुरु होईल.

The post बंद होत आहे MNP सर्विस, सरकारने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या कधी आणि कशाप्रकारे करता येईल दुसऱ्या कंपनीत नंबर पोर्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन टेलीकॉम कंपन्या मोबाईल यूजर्सना आकर्षित करण्यासाठी तसेच जास्तीत जास्त ग्राहक टिकवण्यासाठी नवनवीन व आर्कषक प्लान्स घेऊन येतात, पण तरीही भारतात मोबाईल नंबर पोर्टेबलिटी सर्विसचा वापर खूप जास्त केला जातो. काही भारतीय यूजर आपल्या सर्विस प्रोवाइडरमुळे नाखुश आहेत तर काही ग्राहकांना दुसऱ्या कंपनीचे आकर्षक प्लान्स हवे असतात. भारतात Mobile Number Portability म्हणजे MNP लवकरच नवीन रूप घेणार आहे. MNP ची हि नवीन प्रणाली तयार झाली आहे पण तिचा लाभ घेण्याआधी यूजर्सना थोडी वाट बघावी लागेल. स्पष्ट बोलायचे झाले तर आज म्हणजे 4 नोव्हेंबर पासून 11 नोव्हेंबर पर्यंत संपूर्ण देशात MNP सर्विस बंद केली जात आहे.

टेलीकॉम रेग्यूलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे TRAI ने देशात मोबाईल नंबर पोर्टेबलिटी सर्विस बदलण्याची घोषणा केली आहे. TRAI च्या आदेशाचे पालन देशातील सर्व टेलीकॉम कंपन्यांना करावे लागेल. ट्राईच्या निर्णयानंतर भारतात MNP सर्विसचा चेहरामोहरा बदलून जाईल पण त्याआधी Reliance Jio, Bharti Airtel तसेच Vodafone Idea सहित BSNL च्या उपभोक्त्यांना काही काळ आपला नंबर पोर्ट करता येणार नाही.

आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून ही सर्विस बंद

TRAI च्या आदेशानुसार आज म्हणजे 4 नोव्हेंबर संध्याकाळी 6 वाजल्यापासूनच देशात मोबाईल नंबर पोर्टेबलिटी बंद केली होईल. पण हि बंदी काही काळासाठी आहे जी 11 नोव्हेंबरला उठवली जाईल. 4 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर पर्यंत कोणताही यूजर MNP अंतर्गत आपला नंबर दुसऱ्या नेटवर्क वर पोर्ट करू शकणार नाही. लक्षात असू दे कि ज्या युजर्सना 4 नोव्हेंबर संध्याकाळी 6 वाजल्याच्या आधी आपल्या फोन मधून पोर्ट मेसेज पाठवून UPC कोड जेनरेट केला आहे त्यांच्यासाठी MNP सर्विस चालू राहील.

पोर्ट प्रक्रियेबद्दल बोलायचे तर आपला नंबर दुसऱ्या कपंनीत पोर्ट करण्यासाठी 1900 वर आपल्या नंबर सह अशी PORT 91xxxxx पोर्ट रिक्वेस्ट पाठवावी लागत होती. हा मेसेज केल्यानंतर ऑपरेटर कडून UPC कोड पाठवला जायचा, जो काही दिवसांसाठी वैध असायचा आणि मग एक्सपायर व्हायचा. हा UPC कोड दुसऱ्या नेटवर्क ऑपरेटरला दाखवून त्या कंपनीत नंबर पोर्ट व्हायचा. पण आता 11 नोव्हेंबर पर्यंत कोणत्याही यूजरला PORT रिक्वेस्ट पाठवून UPC कोड मिळणार नाही. हि सर्विस 11 नोव्हेंबर नंतर पुन्हा सुरु होईल.

फक्त 2 दिवसांत होईल नंबर पोर्ट

आता पर्यंत आपला नंबर पोर्ट करण्यासाठी यूजरला साधारणतः एका आठवड्यची वाट बघावी लागत होती. पण आता TRAI च्या नवीन नियमांतर्गत सर्व कंपन्यांना असा आदेश दिला जाणार आहे कि नंबर पोर्ट करण्याच्या प्रक्रियाच वेळ 7 दिवसांच्या ऐवजी फक्त 2 दिवस केला जावा. TRAI येत्या 11 नोव्हेंबरला आपले नवीन दिशानिर्देश आणि नियम सार्वजनिक करणार आहे. आणि त्यानंतर भारतात MNP सर्विस मध्ये मोठा बदल मिळेल.

रिंग टाईमची मर्यादा झाली 30 सेकंद

तुम्हाला सांगू इच्छितो कि TRAI ने सर्व ऑपरेटर्स साठी 30 सेकंदांची रिंग टाइम निर्धारित केली आहे. मागे झालेल्या टेलीकॉम जगातील उलथापालथानंतर ट्राई ने नवीन नियम जाहीर करून सर्व कंपन्यांना रिंग टाईम 30 सेकंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ट्राईचा हा निर्णय Reliance Jio, Bharti Airtel, Vodafone Idea आणि BSNL सर्वांना पाळावा लागेल तसेच हा नियम इनकमिंग आणि आउटगोइंग दोन्ही कॉल्स वर लागू होईल.

The post बंद होत आहे MNP सर्विस, सरकारने घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या कधी आणि कशाप्रकारे करता येईल दुसऱ्या कंपनीत नंबर पोर्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/mobile-number-portability-mnp-new-rules-from-11-november-trai-india-jio-airtel-vodafone-idea-bsnl/feed/ 0
रिलायंस जियो ने जून मध्ये जोडले इतके लाख ग्राहक, जाणून घ्या एयरटेल आणि वोडाफोन आइडियाची स्थिती https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-bsnl-gain-subscribers-in-june-2019/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-bsnl-gain-subscribers-in-june-2019/#respond Tue, 20 Aug 2019 12:14:44 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5063 देशात वायरलेस ग्राहकांची (जीएसएम, सीडीएमए आणि एलटीई) एकूण संख्या जून 2019 मध्ये 116.54 कोटींवर गेली आहे, जी मे 2019 मध्ये 116.18 कोटी होती.

The post रिलायंस जियो ने जून मध्ये जोडले इतके लाख ग्राहक, जाणून घ्या एयरटेल आणि वोडाफोन आइडियाची स्थिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Reliance ने गेल्या आठवड्यात आपल्या 42व्या ऍन्युल जनरल मीटिंग (AGM) मध्ये कंपनीच्या अनेक यशस्वी कारनाम्यांबद्दल चर्चा केली होती. अलीकडेच टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राई) च्या रिपोर्ट मध्ये समोर आले होते कि Jio 4G डाउनलोड स्पीडच्या बाबतीत भारतातील सर्व कंपन्यांपेक्षा पुढे आहे. तसेच आता ट्राई च्या अजून एका रिपोर्ट मध्ये समोर आले आहे कि रिलायंस जियो ने जून मध्ये 82 लाख नवीन यूजर्स जोडण्यासोबतच मोबाईल ग्राहकांच्या संख्येत सतत वाढ नोंदवली आहे.

याच काळात इतर टेलीकॉम कंपनी जसे कि एयरटेल ने 29,883 आणि वोडाफोन आइडिया ने जवळपास 41 लाखांपेक्षा जास्त ग्राहक गमावले आहेत. आणि हे काही पहिल्यांदा नाही जेव्हा जियोच्या ग्राहकांच्या संख्येत वाढ दिसली आहे. ट्राई ने जाहीर केलेल्या रिपोर्ट मध्ये हे आकडे सादर करण्यात आले आहेत.

जियो एकटी कंपनी नाही जिचे ग्राहक वाढले आहेत. सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएल ने पण जून मध्ये नवीन ग्राहक जोडले आहेत. सरकारी ऑपरेटरने जून मध्ये 2.66 लाख नवीन ग्राहक जोडले आहेत. मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (एमएनपी) साठी जून 2019 मध्ये एकूण 43.4 लाख अर्ज मिळाले. तसेच देशात वायरलेस ग्राहकांची (जीएसएम, सीडीएमए आणि एलटीई) एकूण संख्या जून 2019 मध्ये 116.54 कोटींवर गेली आहे, जी मे 2019 मध्ये 116.18 कोटी होती.

4जी स्पीड मध्ये जियोची कमाल

TRAI नुसार जुलै 2019 मध्ये Reliance Jio ने 4G नेटवर्क वर सरासरी 21.0 एमबीपीएस चा डाउनलोड स्पीड दिला आहे. या स्पीड सह Jio ने पुन्हा एकदा देशातील सर्वात वेगवान 4जी नेटवर्क असल्याचे सिद्ध झाले आहे. Jio नंतर Airtel कंपनी दुसऱ्या नंबर वर आहे. जुलै महिन्यात Airtel नेटवर्क वर सरासरी 4G डाउनलोड स्पीड 8.8 एमबीपीएस मोजण्यात आला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या नंबर वरील कंपन्यांच्या मध्ये दुपटीपेक्षा जास्त अंतर आहे.

The post रिलायंस जियो ने जून मध्ये जोडले इतके लाख ग्राहक, जाणून घ्या एयरटेल आणि वोडाफोन आइडियाची स्थिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-bsnl-gain-subscribers-in-june-2019/feed/ 0
4G सिम अपग्रेड केल्यावर कोणती टेलीकॉम कंपनी देत आहे कोणते फायदे https://www.91mobiles.com/marathi/3g-to-4g-sim-mobile-upgrade-offer-plans-airtel-vodafone-idea-bsnl/ https://www.91mobiles.com/marathi/3g-to-4g-sim-mobile-upgrade-offer-plans-airtel-vodafone-idea-bsnl/#respond Sat, 29 Jun 2019 08:41:53 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4696 4G च्या पोस्टपेड ग्राहकांना बिल साइकल मध्ये 30जीबी 4G डेटा मिळेल.

The post 4G सिम अपग्रेड केल्यावर कोणती टेलीकॉम कंपनी देत आहे कोणते फायदे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Airtel ने इंडियन टेलीकॉम बाजारात आज मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने घोषणा केली आहे कि ते देशात आपली 3G सर्विस बंद करणार आहेत. Airtel ने हि सर्विस बंद करण्याची सुरवात कोलकात्यापासून केली आहे 3G नेटवर्क हटवून तो 4G वर अपग्रेड केला जात आहे. एयरटेलने केलेली हि सुरवात भारतीय दूरसंचार बाजारासाठी मोठी बातमी आहे. ज्यामुळे फक्त प्रतिस्पर्धी नव्हे तर मोबाइल यूजर्स पण आश्चर्यचकित झाले आहेत. जर तुम्ही पण आपला नंबर 3G वरून 4G मध्ये अपग्रेड करू इच्छित असाल तर पुढे आम्ही सविस्तर सांगितले आहे कि कोणती टेलीकॉम कंपनी आपल्या नवीन 4G कस्टमर्सना कोणते बेनिफिट देत आहे.

Airtel

सर्वात आधी एयरटेल बद्दल बोलायचे तर 3G वरून 4G मध्ये अपग्रेड करणाऱ्या ग्राहकांना सर्वात जास्त फायदा हीच कंपनी देत आहे. Airtel च्या 3G नेटवर्क वरून 4G नेटवर्क वर अपग्रेड करणाऱ्या पोस्टपेड यूजर्सना कंपनी 30 दिवसांसाठी 4जी डेटा देत आहे जो रोज 1जीबी या हिशोबाने कस्टमर्सच्या नव्या 4जी सिम वर क्रेडिट होईल. त्याचप्रमाणे 4G च्या पोस्टपेड ग्राहकांना बिल साइकल मध्ये 30जीबी 4G डेटा मिळेल.

IDEA

तसे पाहत वोडाफोन आणि आइडिया एक झाले आहेत पण तरीही IDEA नेटवर्क वर 3G सिम 4G नेटवर्क वर अपग्रेड केल्यावर कंपनी यूजर्सना अतिरिक्त फायदे देत आहे. कंपनीने नवीन 4G यूजर्स साठी एक खास प्लान सादर केला आहे. IDEA चा हा प्लान 392 रुपयांचा आहे जो 84 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. या प्लान अंतर्गत कंपनी 4G यूजर्सना एकूण 84जीबी डेटा देत आहे जो रोज 1जीबीच्या हिशोबाने यूजर्सच्या नंबर वर क्रेडिट होईल. या प्लान मध्ये वॉयस कॉल पण अनलिमिटेड फ्री दिले जात आहेत.

Vodafone

वोडाफोन पण आपल्या यूजर्सना 3G नेटवर्क वरून 4G नेटवर्क वर नंबर अपग्रेड केल्यावर अतिरिक्त बेनिफिट देत आहे ज्यात फ्री इंटरनेट डेटाचा समावेश आहे. Vodafone ने 4G नेटवर्क वर अपग्रेड करणाऱ्या प्रीपेड कस्टमर्सना 4जीबी 4G इंटरनेट डेटा दिला जात आहे. हा डेटा पूर्णपणे मोफत असेल जो 10 दिवसांत वापरावा लागेल. त्याचप्रमाणे पोस्टपेड नंबर वर 4G अपग्रेड करणाऱ्या यूजर्सना पुढच्या बिल साइकल मध्ये 4जीबी अतिरिक्त 4G डेटा मिळेल.

BSNL

देशातील सरकारी टेलीकॉम कंपनी भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड बद्दल बोलायचे तर हि कंपनी पण 3G नंबर 4G नेटवर्क वर अपग्रेड केल्यावर अतिरिक्त बेनिफिट देत आहे. बीएसएनएल यूजर्सना 2जीबी अतिरिक्त 4G इंटरनेट डेटा देत आहे. विशेष म्हणजे बीएसएनएल चा नवीन 4G सिम विकत घेण्यासाठी ग्राहकांना 20 रुपये दयावे लागतील.

The post 4G सिम अपग्रेड केल्यावर कोणती टेलीकॉम कंपनी देत आहे कोणते फायदे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/3g-to-4g-sim-mobile-upgrade-offer-plans-airtel-vodafone-idea-bsnl/feed/ 0
400 रुपयांपेक्षा कमी किंमतीत अनलिमिटेड कॉलिंग वाले हे आहेत बेस्ट प्रीपेड प्लान, बाग किती मिळेल डेटा आणि कोणते मिळतील फायदे https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-vs-airtel-vs-vodafone-vs-idea-vs-bsnl-best-prepaid-recharge-plans-under-rs-400/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-vs-airtel-vs-vodafone-vs-idea-vs-bsnl-best-prepaid-recharge-plans-under-rs-400/#respond Fri, 12 Apr 2019 15:23:51 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4090 त्या प्लान्स बद्दल सांगणार आहोत ज्यांची किंमत 400 रुपयांपेक्षा कमी आहे आणि या प्लान मध्ये तुम्हाला शानदार डेटा आणि कॉलिंग मिळेल.

The post 400 रुपयांपेक्षा कमी किंमतीत अनलिमिटेड कॉलिंग वाले हे आहेत बेस्ट प्रीपेड प्लान, बाग किती मिळेल डेटा आणि कोणते मिळतील फायदे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रिलायंस जियो टेलिकॉम सेक्टर मध्ये आल्यानंतर टेलिकॉम कंपन्यांमध्ये डेटाची लडाई अजून वाढली. या वाढत्या लढाईत जवळपास रोज एयरटेल, वोडाफोन आइडिया आणि बीएसएनएल सारख्या कंपन्या नवीन आकर्षक प्लान लॉन्च करत आहेत. ते पाहता आज आम्ही तुम्हाला रिलायंस जियो, एयरटेल, वोडाफोन आइडिया आणि बीएसएनएल च्या त्या प्लान्स बद्दल सांगणार आहोत ज्यांची किंमत 400 रुपयांपेक्षा कमी आहे आणि या प्लान मध्ये तुम्हाला शानदार डेटा आणि कॉलिंग मिळेल.

Jio
रिलायंस जियो बद्दल बोलायचे तर कंपनीच्या 399 रुपयांच्या प्लान मध्ये यूजर्सना 1.5जीबी डेटा प्रतिदिन सह 84 दिवसांची वैधता मिळते. तसेच कंपनी कडून यूजर्सना प्रतिदिन 100एसएमएस मिळतील. या प्लान मध्ये यूजर्सना अनलिमिटेड वॉयस कॉल मोफत मिळतील. तसेच सर्व जियो ऍप्सचा कॉम्प्लिमेंट्री एक्सेस मिळेल, ज्यात जियोसिनेमा, जियोटीवी आणि इतर जियो सर्विस मिळतील.

400 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्लान मध्ये जियोचा 349 रुपयांचा प्लान पण येतो. या प्लान मध्ये यूजर्सना 1.5जीबी डेटा प्रतिदिन, अनलिमिटेड कॉल, 100 फ्री एसएमएस आणि जियो ऍप्सचे सब्सक्रिप्शन मिळेल. सोबत या प्लान मध्ये 70 दिवसांची वैधता मिळेल.

Airtel
एयरटेल कडून 400 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या प्लान बद्दल बोलायचे तर यात पण तुम्हाला जवळपास जियोच्या प्लान प्रमाणे लाभ मिळतील. या प्लान मध्ये अनलिमिटेड लोकल आणि नॅशनल कॉल्स मिळत आहेत, त्यांची वॅलिडिटी 84 दिवस आहे. या प्लान मध्ये तुम्हाला प्रतिदिन 1जीबी 3जी/4जी डेटा मिळेल. तसेच वॅलिडिटी मध्ये तुम्हाला एकूण 84जीबी डेटा मिळेल. तसेच डेली 100एसएमएस पण मिळत आहेत. याआधी या प्लान मध्ये 70 दिवस वॅलिडिटी सह 1.4जीबी डेटा दिला जात होता. काही यूजर्सना 84 दिवस वॅलिडिटी पण मिळत होती.

Vodafone
399 रुपयांच्या प्लान मध्ये कंपनी 84 दिवसांसाठी 84जीबी डेटा देते. याचा अर्थ असा कि या प्लान मध्ये यूजर्सना 1जीबी डेटा प्रतिदिन मिळतो. तसेच कंपनी कडून यूजर्सना प्रतिदिन 100एसएमएस मिळतील. या प्लान मध्ये यूजर्सना अनलिमिटेड वॉयस कॉल मोफत मिळतील.

Idea
आइडिया ने आपला 392 रुपयांचा प्लान लॉन्च केला आहे. याची वैधता 60 दिवस आहे. या प्लान मध्ये यूजरला 250 मिनिटे रोज आणि 1000 मिनिटे आठवड्याला टॉकटाइम मिळतो. तसेच कंपनी कडे 399 रुपयांचा प्लान पण आहे. ज्यात यूजरला 1जीबी डेटा रोज मिळतो. यात पण यूजरला 250 मिनट मिनिटे रोज आणि 1000 मिनिटे आठवड्याला मिळतात. याची वैधता 84 दिवस आहे. या प्लान मध्ये अनलिमिटेड लोकल आणि नॅशनल कॉल्स मिळतात.

BSNL
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) सध्या सर्वात जास्त टक्कर जियो आणि एयरटेलला देत आहे. सरकारी टेलीकॉम कंपनी असूनही कंपनी आपल्या नवीन प्लानने ग्राहकांना आकर्षित करत आहे. बीएसएनएल च्या 349 रुपयांच्या प्लान मध्ये यूजर्सना 64 दिवस वैधता मिळते. तसेच या पॅक मध्ये यूजर्सना प्रतिदिन 3.2जीबी डेटा मिळतो. तर अनलिमिटेड फ्री कॉलिंग सोबत ग्राहकांना 100 एसएमएस डेली फ्री मिळतात. पण हा प्लान मुंबई आणि दिल्ली सर्कल मध्ये वैध नाही.

The post 400 रुपयांपेक्षा कमी किंमतीत अनलिमिटेड कॉलिंग वाले हे आहेत बेस्ट प्रीपेड प्लान, बाग किती मिळेल डेटा आणि कोणते मिळतील फायदे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-vs-airtel-vs-vodafone-vs-idea-vs-bsnl-best-prepaid-recharge-plans-under-rs-400/feed/ 0
‘गँग्स ऑफ वासेपुर’ मधील धनबाद 4जी मध्ये अव्वल, बघा तुमच्या शहराची परिस्तिथी https://www.91mobiles.com/marathi/dhanbad-leads-the-country-in-overall-4g-availability/ https://www.91mobiles.com/marathi/dhanbad-leads-the-country-in-overall-4g-availability/#respond Fri, 29 Mar 2019 12:18:35 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3965 हा डेटा 1 नोव्हेंबर 2018 ते 30 जानेवारी 2019 दरम्यान एकत्र करण्यात आला आहे.

The post ‘गँग्स ऑफ वासेपुर’ मधील धनबाद 4जी मध्ये अव्वल, बघा तुमच्या शहराची परिस्तिथी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ग्लोबली इंटरनेट स्पीड ट्रॅक करणाऱ्या वाली कंपनी ओपनसिग्नल ने भारतात 50 मेट्रो शहरांत आयोजित एक नवीन 4जी उपलब्धता रिपोर्ट जाहीर केला आहे आणि जवळपास 95.3 टक्के 4 जी उपलब्धते सह हाई-स्पीड नेटवर्कसाठी धनबाद इतर शहरांच्या तुलनेत भारतात टॉपला आहे.

धनबाद नंतर रांची 95 टक्के 4 जी उपलब्धतेसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर श्रीनगर – भारताच्या दुर्गम क्षेत्रांपैकी एक – 94.9 टक्क्यांसह तिसऱ्या स्थान वर आहे. रिपोर्ट त्या सर्व ऑपरेटर्ससह एका संयुक्त स्कोर वर आधारित आहे, ज्यांच्याकडे या 50 शहरांत 4 जी नेटवर्क आहे. तसेच हा डेटा 1 नोव्हेंबर 2018 ते 30 जानेवारी 2019 दरम्यान एकत्र करण्यात आला आहे.

हे देखील वाचा: शाओमीचा पोको एफ1 बनला देशातील नंबर वन स्मार्टफोन, वनप्लस 6 ला टाकले मागे

कंपनी ने भारतातील शहरांत 4जी नेटवर्क व सर्विसच्या उपलब्धतेच्या आधारावर हि लिस्ट तयार केली आहे. लिस्ट मधील 50 शहरांत 4जी उपलब्धता 87 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. मोठ्या शहरांबद्दल बोलायचे झाले तर कोलकात्यात 93.3 टक्के, बेंगलुरु मध्ये 92.3 टक्के, चेन्नई मध्ये 91.1 टक्के, लखनऊ मध्ये 93.1 टक्के, दिल्ली मध्ये 89.8 टक्के आणि मुंबई मध्ये 89.7 टक्के 4G उपलब्धता आहे.

विशेष म्हणजे कंपनी ने 4जी डिवाइस आणि सब्सक्रिप्शन असलेल्या यूजरला सर्वात जास्त जागी नेटवर्क कनेक्शन मिळू शकते याचे प्रमाण तपासले आहे. नवीन 4जी उपलब्धाता वाली लिस्ट पाहता यात टॉप 10 शहरांत धनबाद, रांची, श्रीनगर, रायपुर, पटना, ग्वालियर, गुवाहाटी, कानपुर, भोपाळ आणि लुधियाना यांचा समावेश आहे.

हे देखील वाचा: 6जीबी रॅम आणि दमदार प्रोसेसर सह लॉन्च होईल सोनी एक्सपीरिया 2

अलीकडेच दूरसंचार नियामक ट्राई ने फेब्रुवारी महिन्यातील ताजा आकडे जारी केले होते. या रिपोर्ट नुसार सरासरी 4जी डाउनलोड स्पीड मध्ये रिलायंस जियो ने पुन्हा एकदा बाजी मारली होती. फेब्रुवारीत जियोचा सरासरी डाउनलोड स्पीड 20.9 एमबीपीएएस होता, जो जानेवारीतील 18.8 एमबीपीएस स्पीड पेक्षा जास्त आहे.

गेल्यावर्षी म्हणजे 2018 मध्ये सर्वात वेगवान 4 जी ऑपरेटर चा खिताब पण रिलायंस जियो कडेच होता, जियोचा डाउनलोड स्पीड संपूर्ण वर्षभरात जास्त होता. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राई) च्या आकड्यांनुसार, भारती एयरटेलचा डाउनलोड स्पीड फेब्रुवारी मध्ये 9.5 एमबीपीएस वरून 9.4 एमबीपीएस झाला आहे.

The post ‘गँग्स ऑफ वासेपुर’ मधील धनबाद 4जी मध्ये अव्वल, बघा तुमच्या शहराची परिस्तिथी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/dhanbad-leads-the-country-in-overall-4g-availability/feed/ 0